आपल्याकडे भारतीय जेवण हे जगभरात प्रसिद्ध आहे ते त्यामध्ये वापरण्यात येत असलेल्या मसाल्यामुळे. यातील एक महत्त्वपूर्ण मसाला म्हणजे कसूरी मेथी. विशेषतः पंजाबी भाज्यांमध्ये कसूरी मेथीचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. याचा वापर केल्यानंतर त्याचा येणारा सुगंध आणि यामुळे भाजीला येणारी चवही अप्रतिम असते. पनीरची भाजी असो वा घरातील साधी टॉमेटोची भाजी, कोणत्याही भाजीमध्ये कसूरी मेथी घातली की, मग त्याचा स्वाद आणि सुगंध दोन्ही मनाला भावेल असेच असते. साधारणतः लोक बाजारामधून कसूरी मेथी विकत आणतात. पण तुम्ही घरच्या घरीही कसूरी मेथी तयार करू शकता. घरच्या घरी शुद्ध आणि ताजी मेथी आणून तुम्ही कसूरी मेथी तयार करू शकता. हे कसे तयार करायचे हे आम्ही तुम्हाला सांगतो.
आहारात अति गरम मसाला वापरणे आरोग्यासाठी धोक्याचे
कशी तयार करावी कसूरी मेथी
स्टेप 1 – कसूरी मेथी बनविण्यासाठी सर्वात पहिले मेथीची ताजी पाने काढा आणि मग ही पाने मिठाच्या पाण्यात साधारण दहा मिनिट्स तुम्ही भिजवून ठेवा. त्यानंतर ही पानं नीट धुऊन घ्या. एका मोठ्या टॉवेलमध्ये मेथीची पानं सुकवून घ्या. त्यासाठी तुम्ही मेथीची पाने थोडा वेळ टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा.
स्टेप 2 – त्यानंतर मेथीची पानं कापून घ्या. एखाद्या पेपरमध्ये अथवा मोठ्या आकाराच्या टिश्यू पेपरमध्ये पानं पसरवा आणि तीन दिवस अशीच पानं सुकू द्या. लक्षात ठेवा की, पानं सूर्यप्रकाशाच्या संपर्कात ठेऊ नका
स्टेप 3 – पाने सुकू द्या कारण सावलीमध्ये पाने सुकल्यावर याचा रंग आणि पाने याचा सुगंध चांगला राहतो. तुम्ही पंख्याखालीही पाने सुकवू शकता. पंख्याखाली सुकायला साधारण दोन दिवस लागतात. यानंतर पाने कुरकुरीत होण्यासाठी साधारण एक तास उन्हात ठेवा
स्टेप 4 – पाने व्यवस्थित सुकल्यानंतर तुम्ही एका चाळणीमधून ही पाने चाळून घ्या. जेणेकरून त्यावर कोणतीही धूळ असेल तर ती निघून जाईल. आता मायक्रोवेव्हमध्ये ही पाने ठेवा आणि साधारण 30 सेकंदसाठी गरम करा. नंतर पाने थंड होऊ द्या
स्टेप 5 – घरच्या घरी कसूरी मेथी तयार आहे. तुम्ही ही पानं हातांनी कुस्करून एका टाईट कंटेनरमध्ये भरून ठेऊ शकता. झिपलॉक बॅगमध्येही ही कसूरी मेथी ठेऊ शकता.
DIY: हिवाळ्यात केसगळतीची असेल समस्या तर घरीच बनवा मेथी दाण्याचं तेल
मायक्रोवेव्हमध्ये कशी बनवाल कसूरी मेथी
- तुम्ही कसूरी मेथी बनविण्यासाठी केवळ दहा मिनिट्ससाठी मायक्रोवेव्हचा उपयोग करून घेऊ शकता
- यासाठी तुम्ही मेथीची ताजी पाने वेगळी करा आणि मग मेथीची पाने धुवा आणि यातील घाणेरडे पाणी काढून टाका
स्वच्छ करून एका प्लेटवर ठेवा आणि मग टॉवेलवर सुकवा - सुकल्यावर ही पाने मायक्रोवेव्ह सेफ बाऊलमध्ये ठेवा. हे समान स्वरूपात पसरवा. मायक्रोवेव्हच्या आत ठेवा आणि मग साधारण जास्त तापमानावर तीन मिनिट्स तुम्ही भाजून घ्या
- मेथीची पाने बाहेर काढा आणि मग एक स्पेट्युलाचा वापर करून मेथीची पाने पलटा
- पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि मग पुन्हा तीन मिनिट्स तसंच करा. बाहेर काढा आणि व्यवस्थित हलवून घ्या
- पुन्हा ही पाने मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि दोन मिनिट्स रोस्ट करा
- बाहेर काढा आणि पूर्ण थंड होऊ द्या. त्यानंतर तुमची कसूरी मेथी तयार आहे
Benefit of Fenugreek Seeds For Hair, Skin & Health in Marathi
कसूरी मेथी कशी कराल स्टोअर
कसूरी मेथी एका स्वच्छ काचेच्या जारमध्ये तुम्ही ठेवा. तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये साधारण सहा महिने ही स्टोअर करून ठेऊ शकता. तसंच याचा वापर तुम्ही सहा महिने करू शकता. त्यानंतर याचा रंग बदलू लागतो आणि याचा स्वादही खराब होतो. लक्षात ठेवा की, सुकलेली ही पाने दमटपणापासून दूर ठेवा आणि याचा वापर करा. कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता.