ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
दुपारी ऑफिसमध्ये येत असेल झोप तर करा अशी नियंत्रित, सोप्या टिप्स

दुपारी ऑफिसमध्ये येत असेल झोप तर करा अशी नियंत्रित, सोप्या टिप्स

तुम्हाला पण जेवल्यानंतर दुपारी ऑफिसमध्ये झोप येते का? यावर काही उपचार शोधत आहात का? खरं तर जेवल्यानंतर झोप येणे ही अत्यंत सामान्य बाब आहे. आपल्यामधील कितीतरी लोकांना ही समस्या नक्कीच भेडसावत असते. पण या  झोपेवर तुम्ही नक्कीच नियंत्रण मिळवू शकता. हे  अशक्य नाही. साधारणतः उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या अधिक जाणवते. विशेषतः अति काम असेल तेव्हाच ही समस्या डोकं अधिक वर काढते असा अनुभव सगळ्यांनाच आतापर्यंत आला असेल. त्यामुळे कामात येणारा झोपेचा व्यत्यय तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही आम्ही सांगितलेल्या काही सोप्या टिप्स नक्की करून पाहा. दुपारच्या  जेवणानंतर येणारी झोप कामाकडे दुर्लक्ष होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे थकवाही जाणवतो.  म्हणून तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा आणि स्वतःमध्ये बदल पाहा. 

उर्जा असणारे जेवण जेवा (Eat healthy food for control sleep after lunch)

Shutterstock

रिफाईन्ड असाणारे पदार्थ हे लवकर पचतात आणि परिणामी रक्तामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं आणि उर्जा कमी होते. त्यामुळे ऑफिसमध्ये असताना दुपारी तुम्ही झोप येऊ नये यासाठी आपल्या आहारात उर्जा देणाऱ्या पदार्थांचा समावेश करून घ्या.  पालेभाज्या,  कमी प्रोटीन असणारे पदार्थ (कमी प्रोटीनवाले मांसमच्छी आणि अंडी) आणि फळांचा आहारात समावेश करा. भात खाणे  सहसा टाळा. 

ADVERTISEMENT

झोप येत नसल्यास करा सोपे उपाय, खास टिप्स

जेवणानंतर चघळा च्युईंगम (Chewing gum after lunch)

Shutterstock

फिजिओलॉजी अँड बिहेविअर मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार च्युईंग हे थकवा कमी करण्यास आणि सतर्कता वाढविण्यास मदत करते. च्युईंगम चघळताना सतत तोंड चालू राहतं. त्यामुळे एनर्जी आणि लक्ष झोपेपेक्षा अधिक त्यामध्ये विचलित होते. तसंच तुमचा मूड वेगळा करण्यासाठीही च्युईंगमचा स्वाद तुम्हाला बरा वाटतो. त्यामुळे उर्जा वाढविण्यासाठी तुम्ही पुदीन्याचा स्वाद असणारे च्युईंगम चघळा. तुमची झोपही उडेल. 

ADVERTISEMENT

लगेच कामासाठी बसू नका (do not sit for work after lunch)

ऑफिसमध्ये जेवल्यानंतत झोप येत असेल तर जेवण झाल्यानंतर त्वरीत खुर्चीत जाऊन बसू नका. जेवल्यानंतर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांसह किमान पाच ते दहा मिनिट्स हळूहळू परिसरात चालून या अथवा किमान एकटे असल्यास एक जिन्याचा चढउतार करा. या छोट्याशा व्यायामामुळे रक्तातील ऑक्सिजन स्तर वाढतो आणि तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत मिळते.  त्यामुळे झोप न येण्यासही मदत  मिळते. 

वारंवार झोप येत असेल तर तपासून घ्या, झाला नाही ना ‘हा’ आजार

साखर आणि प्रोसेस्ड फूड खाणे टाळा (avoid suger and processed food after lunch)

Shutterstock

ADVERTISEMENT

बऱ्याचदा जेवल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. पण साखर आणि प्रोसेस्ड फूड जेवल्यानंतर खाण्याचे सहसा टाळा. कारण याचे सेवन तुम्हाला ऊर्जा वाढविण्यासाठी फायदेशीर ठरेल. पण थोड्याच वेळात डोळ्यांवर अधिक प्रमाणात झोप येईल. तुम्हाला अगदीच गोड खायचे असेल तर तुम्ही जेवल्यानंतर एखादे फळ खा. जेणेकरून ऊर्जाही टिकून राहील आणि झोपही येणार नाही. 

थोड्या थोड्या वेळेच्या फरकाने खा (take small meals)

ओव्हर इटिंगची सवय ही तुमची पचनक्रिया नक्कीच कमी करते आणि अंगात सुस्ती निर्माण करते. त्यामुळे दुपारी अगदी भरपेट खाल्ल्यास तुम्हाला झोप येणे हे साहजिक आहे. त्यामुळे तुम्ही दर दोन दोन तासांनी थोडं थोडं खात राहा.  एकाच वेळी सगळं खाऊ नका. यामुळे झोप येणार नाही. तसंच रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित करण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. 

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

जेवणानंतर प्या कॉफी (Drink Coffee after lunch)

ADVERTISEMENT

Shutterstock

कॉफी एक एनर्जी बुस्टर आहे. पण ही पिण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर जास्त काळ वाट पाहू नका. बऱ्याचदा लोकांना वाटतं की,  कॅफेन हे रात्री जेवणापूर्वी योग्य आहे. पण दुपारच्या जेवणानंतर कॉफी पिऊन तुम्ही तुमची झोप नक्कीच घालवू शकता आणि नियंत्रणात आणू शकता. कॉफीने झोप उडते.  त्यामुळे याचं सेवन रात्री करण्यापेक्षा दुपारच्या जेवणानंतर करणं अधिक सोयीस्कर ठरतं. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

29 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT