ADVERTISEMENT
home / मेकअप
या सोप्या स्टेप्स वापरत तुम्हीदेखील करू शकता नाकावर ब्लश

या सोप्या स्टेप्स वापरत तुम्हीदेखील करू शकता नाकावर ब्लश

मेकअप आणि फॅशनचे ट्रेंड सतत बदलत असतात. सहाजिकच सोशल मीडियावरील अपडेटेड मेकअप ट्रेंड नेहमीच फॉलो केले जातात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे ट्रेंड कसे फॉलो करायचे  याबाबत आम्ही तुम्हाला नेहमीच अपडेट ठेवत असतो. सध्या एक नवा मेकअप ट्रेंड महिला ट्राय करताना दिसत आहेत. तो म्हणजे नाकावर ब्लशचा वापर करणे. आतापर्यंत तुम्ही गालावर ब्लशचा वापर नक्कीच केला असेल पण नाकावर ब्लश कसं वापरावं हे तुम्हाला माहीत नसेल तर या टिप्स तुमच्या नक्कीच फायद्याच्या ठरतील. नाकावर ब्लश करणं अतिशय सोपं असून त्यामुळे तुमचा मेकअप परफेक्ट होतो. कारण नाकावर ब्लश लावण्यामुळे नाकाचा शेंडा हायलाईट होतो आणि तुमचं नाक चाफेकळीसारखं सरळ दिसतं.  यासाठीच फॉलो करा या टिप्स 

कसा करावं नाकावर ब्लश

नाकावर ब्लश करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या काही टिप्स फॉलो करू शकता.

चेहरा तयार करा

मेकअप करण्यापूर्वी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या चेहऱ्याला मेकअपसाठी तयार करा. यासाठी आधी चेहरा माईल्ड फेसवॉशने धुवाव आणि मग तो स्वच्छ पुसून घ्या. चेहऱ्यावर हायड्रेटिंग मॉईस्चराईझर लावा. जर तुमच्या चेहऱ्यावर डेड स्किन असेल तर एखादं फेस स्क्रब लावा ज्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होईल मग चेहऱ्यावर मॉईस्चराईझर लावा. त्वचा हायड्रेट असेल तर तुमचा मेकअप नेहमीच परफेक्ट दिसतो. मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी नेहमी चेहऱ्यावर चांगले प्रायमर लावा. 

बेस सेट करा

मेकअपनंतर फ्लॉलेस लुक हवा असेल तर बेस सेट करणं खूप गरजेचं आहे. कारण या  स्मूथ बेसमुळे तुमचे मेकअप प्रॉडक्ट चेहऱ्यावर बराच काळ टिकून राहतात. चेहऱ्यावरील पिगमेंटेशन आणि काळे डाग लपवण्यासाठीही बेस लावणं फायद्याचं आहे.  यासाठी लक्षपू्र्वक डाग, व्रण असलेल्या भागावर कन्सिलर लावा आणि ब्युटी प्रॉडक्टच्या मदतीने ते ब्लेंड करा. डोळ्याखाली  डार्क सर्कल्स असेतील तर तुम्ही कलर करेक्टरने ते लपवू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान दिसेल. गरज असल्यास फाऊंडेशनचा वापर करा आणि तुमच्या मेकअपचा बेस तयार करा.

ADVERTISEMENT

ब्लशचा वापर कसा कराल

आता वेळ आहे टच अप करत मेकअप पूर्ण  करायची. यासाठी  तुम्ही तुमच्या गालांवर आणि नाकावर ब्लश वापरू शकता. ब्लश वापरताना अगदी हलक्या हाताने ब्लशरचा ब्रश ब्लशरवर डॅब करा आणि लावण्यापूर्वी एक्स्ट्राचे ब्लशर झटकून टाका. त्यानंतर ब्रश गाल आणि नाकावर हलक्या हातानेच फिरवा. नाकावर ब्लश करताना तुम्ही नाक सरळ आणि चाफेकळी दिसावं यासाठी नाकाच्या शेंड्यावर ब्लश करू शकता. ज्यामुळे नाकाच्या शेंड्याकडील भाग हायलाईट होतो. ब्लश केल्यावर मेकअप पूर्ण करण्यासाठी तुम्ही लूज पावडर वापरू शकता. त्यानंतर फक्त आय मेअकप करा, लिपस्टिक लावा आणि बाहेर जाण्यासाठी तयार व्हा. 

आम्ही शेअर केलेल्या या मेकअप टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. यासोबतच मायग्लॅमचे ब्लशर मेकअपसाठी जरूर वापरा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

अॅव्होकॅडो तेलाचे आहेत अद्भूत फायदे, सौंदर्यासाठी करा असा वापर

घरीच करा लिप स्पा, फॉलो करा या सोप्या टिप्स

फेस शीट मास्क वापरण्यासाठी स्टेप बाय स्टेप टिप्स

06 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT