ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
अॅव्होकॅडो तेलाचे आहेत अद्भूत फायदे, सौंदर्यासाठी करा असा वापर

अॅव्होकॅडो तेलाचे आहेत अद्भूत फायदे, सौंदर्यासाठी करा असा वापर

अॅव्होकॅडो फळाचे फायदे अनेक असल्यामुळे ते खाण्यासाठी खूपच लाभदायक ठरतं. मात्र एवढंच नाही अॅव्होकॅडोच्या तेलाचा वापर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी एखाद्या प्रभावी  उपचाराप्रमाणे करू शकता. अॅव्होकॅडो तेल तुमच्या त्वचेवरील एक्ने, काळसरपणा, डार्क सर्कल्स, सुरकुत्या कमी करण्यासाठी औषधाप्रमाणे काम करतं. यासाठीच जाणून घ्या अॅव्होकॅडो तेलाचे त्वचेवर काय फायदे होतात आणि त्याचा कसा वापर करावा. 

अॅंटि एजिंग क्रीम

जस जसे तुमचे वय वाढू लागते तस तसे त्वचेवर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. त्वचेतील कोलेजीनची निर्मिती कमी झाल्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते आणि त्वचेवर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स येतात. मात्र त्वचेवरील एजिंग मार्क्स कमी करण्यासाठी अॅव्होकॅडो तुमच्या चांगलंच फायद्याचं ठरू शकतं. कारण या तेलामुळे तुमच्या त्वचेला कोरडेपणा कमी होतो, पुरेसे कोलेजीन निर्माण होते आणि त्वचा पुन्हा चिरतरूण दिसू  लागते. 

फ्री रेडिकल्सपासून बचाव

वातावरणातील फ्री रेडिकल्समुळे फक्त आजारपण येतं असं नाही तर तुमचं सौंदर्यही खराब होतं. त्वचेवरील डाग, सुरकुत्या, काळेपणा हा फ्री रेडिकल्सचा परिणाम असतो. यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो. मात्र अॅव्होकॅडो तेलातील पोषक गुणधर्म तुमचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण करतात. यासाठी नियमित त्वचेवर या तेलाने मालिश करायला हवी.

 

ADVERTISEMENT

सनबर्नपासून सुटका होते

सूर्याच्या प्रखर किरणाच्या संपर्कात आल्यास तुमच्या त्वचेवर सनबर्नचे डाग निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचा रापल्यामुळेही सनटॅन अथवा सनबर्न होते. मात्र अॅव्होकॅडो तेलामध्ये अससलेल्या व्हिटॅमिन ई, बीटा  कॅरोटीन, व्हिटॅमिन डी आणि प्रोटिन्समुळे तुमच्या त्वचेचं सनबर्नपासून संरक्षण होतं. शिवाय सनबर्न झाल्यास हे तेल लावण्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळतो. तुम्ही या तेलाचा वापर नैसर्गिक सनस्क्रिनप्रमाणे करू शकता.

 

भाजलेल्या त्वचेवर मलम

बऱ्याचदा काम करताना अथवा इतर कारणांमुळे तुमची त्वचा भाजते अथवा सूजते अशा त्वचेवर अॅव्होकॅडो तेल लावण्यामुळे चांगला आराम मिळतो. कारण या तेलामुळे त्वचेला थंडावा आणि पोषण मिळते. ज्यामुळे तुमचे भाजलेले व्रण कमी होतात आणि सूजलेल्या त्वचेची सूज कमी होण्यास मदत होते. 

एक उत्तम मॉईस्चराईझर

त्वचेची नियमित काळजी घेण्यासाठी तुमच्या स्कीन केअर रूटिनमध्ये चांगले मॉईस्चराईझर असणं गरजेचं आहे. अॅव्होकॅडोचे पोषक गुणधर्म या  तेलात असतात. ज्यामुळे त्वचेला चांगले पोषण आणि मऊपणा मिळतो. शिवाय या तेलामध्ये अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या  सहज कमी होतात. 

ADVERTISEMENT

त्वचेसाठी असा बनवा अॅव्होकॅडो तेलापासून फेसमास्क

त्वचेवर अॅव्होकॅडो तेलाचा वापर करण्याचा बेस्ट पर्याय म्हणजे नियमित त्वचेवर अॅव्होकॅडो मास्क लावणे

मास्क तयार करण्याची पद्धत

  • पिकलेले अॅव्होकॅडो घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून  ते अॅव्होकॅडो तेलात मिसळा
  • काटेरी चमच्याने या दोन्ही घटकांची एक छान पेस्ट तयार करा
  • चेहऱ्यावर ही पेस्ट अथवा मास्क कमीत कमी पंधरा ते वीस मिनीटे लावा
  • कोमट पाण्याने चेहरा धुवा आणि फरक पाहा
  • चांगल्या परिणामांसाठी हा मास्क आठवड्यातून दोनदा लावा

फोटोसौजन्य – Pixels

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

सुपरफूड अवकॅडोचे आरोग्यदायी फायदे (Avocado Benefits In Marathi)

केसगळती थांबवण्यासाठी उत्तम हेअर कंडिशनर (Best Anti Hair Fall Conditioner)

चेहऱ्याला चमक देतील हे फ्रूट पील्स – Fruit Peels in Marathi

04 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT