ईडीची नजर प्रत्येकावर असते. पैशांची अफरातफर किंवा अचानक येणारा पैसा जाणवला की, इडीची चौकशी लागणारच यात काही शंका नाही. आतापर्यंत अनेकांच इडीची चौकशी झालेली आहे. पण आता या ईडीच्या जाळ्यात विश्वसुंदरी ऐश्वर्या राय अडकली आहे. दिवसभरातील ही सर्वात खळबळजनक अशी ही बातमी होती. कारण अनेक समाजसुधारक कामांसाठी कायम पुढे असणारी ऐश्वर्या ईडीच्या कचाट्यात कधी सापडेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. पण सोमवारी ऐश्वर्याला ईडीच्या चौकशीच्या सामारे जावे लागले आहे. तब्बल 5 तास तिची चौकशी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे. जाणून घेऊया या विषयी अधिक
सारे रंग रंगले, बनारसी साड्यांमध्ये खुलले सोनालीचे सौंदर्य
पैशांच्या गैरव्यवहारामुळे तक्रार
ऐश्वर्या राय बच्चनवर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळेच तिला समन्सदेखील बजावण्यात आला होता. तिला समन्स बजावल्यानंतर ती लगेचच दिल्लीच्या इडीच्या कार्यालयात जाऊन हजर राहिली. तिथे तिची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ही चौकशी तब्बल 5 तासांसाठी चालली. मिळालेल्या माहितीनुसार तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. तिच्या नावावर असलेल्या काही बिझनेमध्ये झालेल्या मोठ्या उलाढाली पाहता तिला या चौकशीसाठी बोलावले आहे असे दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
#WATCH Delhi | Aishwarya Rai Bachchan leaves from Enforcement Directorate office. She was summoned by ED in connection with the Panama Papers case. pic.twitter.com/zqxJlR7iPT
— ANI (@ANI) December 20, 2021
बच्चन कुटुंबियांच्या काही आंतरराष्ट्रीय ठिकाणी कंपन्या आहेत. या कंपन्या बहामाज आणि व्हर्जिन आयलँडमध्ये आहेत. या कंपन्याचे संचालक पद हे ऐश्वर्या आणि तिच्या कुुटुंबातील काही लोकांकडे आहे. या कंपन्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल झालेली आहे. या प्रकरणी ऐश्वर्याला नोव्हेंबर महिन्यात समन्स बजावण्यात आला. त्याप्रकरणाशी संबधित सगळी कागदपत्रे तिने पाठवून दिली होती. पण आज तिला प्रत्यक्ष चौकशीसाठी जावे लागले.
Bigg Boss Marathi: फिनालेच्या इतक्या जवळ असताना सोनाली पाटील झाली एलिमिनेट
पनामामध्ये आली माहिती
पनामा ही आंतरराष्ट्रीय अशी संघटना आहे जी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहाराशी निगडीत लोकांची माहिती देत असते. ही पत्रकारांची एक संस्था असून शोध पत्रकारितेचे एक उत्तम उदाहरण आहे. यामध्ये एका कंपनीच्या व्यवहाराचे काही कागदपत्र लीक झाले होते. भारतातीलच नाही तर इतर देशातील लोकांचा यामध्ये समावेश असतो. यात अभिनेते, राजकारणी आणि श्रीमंत व्यक्तींचा समावेश फार मोठ्या प्रमाणात असतो. त्यांची नंतर कसून चौकशी देखील केली जाते.यामध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांचा देखील समावेश आहे. त्यामुळे ही बातमी ऐकून अनेकांना या संदर्भात चांगलाच धक्का बसला होता. पण कोणत्याही गोष्टीला न घाबरता आणि मीडियाला कोणतीही माहिती न देता तिने ईडीच्या चौकशीला स्वत: सामोरे जाण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तिचे कौतुकही केले जात आहे. या प्रकरणी बच्चन कुटुंबियांची कोणतीही बाजू मीडिया समोर आलेली नाही. पण आता या पुढे काय होईल या कडे मात्र सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
आता ईडीचा ससेमिरा कधी संपेल ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Year End 2021: यावर्षी हे मराठी कलाकार झाले आई-बाबा