ADVERTISEMENT
home / मनोरंजन
एकता कपूरने केली ‘नागिन 6’ ची घोषणा, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

एकता कपूरने केली ‘नागिन 6’ ची घोषणा, ही अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

एकता कपूरचा ‘नागिन’ शो एक लोकप्रिय शो आहे. आतापर्यंत याचे पाच सीझन झालेले आहेत आणि पुढच्या सीझनची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत आहेत. सहाजिकच आधीचे सीझन पाहणाऱ्या प्रेक्षकांना नागिनचा पुढचा सीझन कधी सुरू होणार, त्यात मुख्य नागिण कोण असणार आणि पुढे या सीझनमध्ये नेमकं काय घडणार असे प्रश्न पडले आहेत. एकतानेही तिचा आगामी नागिन सीझन कधी सुरू होणार आणि त्यात मुख्य नागिण कोण असणार याची हिंट चाहत्यांना दिली आहे. 

टिप टिप पानी बरसा’ गाण्यातून गोविंदाचा कमबॅक, चाहत्यांनी दिल्या या प्रतिक्रिया

एकता कपूरने दिली मोठी हिंट

डेली सोप क्वीन एकता कपूर नुकतीच बिग बॉस 15 चा विकेंड का वार मध्ये गेस्ट म्हणून सहभागी झाली होती. तेव्हा सलमानसोबत एकताने तिच्या आगामी नागिन शोची मोठी घोषणा चाहत्यांसमोर केली आहे. लवकरच नागिनचा 6 वा सीझन सुरू होणार असून त्यातील नव्या नागिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव ‘म’ पासून सुरू होते अशी हिंट तिने या कार्यक्रमात दिली आहे. तिच्या या घोषणेनंतर ‘म’ अक्षरावरून नाव सुरू होणाऱ्या अनेक अभिनेत्रीच्या नावाचा अंदाज घेतला जात आहे. 

मराठी चित्रपट पुन्हा नव्याने उभे राहण्याची नांदी “जयंती” पासून

ADVERTISEMENT

कोण असणार एकताची नवी नागिण

एकताने अशी हिंट दिल्यानंतर काही लोकांना मौनी रॉयच पुन्हा नागिण असणार असं वाटत आहे. तर काहींनी अंतिम चित्रपटातील मुख्य अभिनेत्री महिमा मकवाना एकताची नवी नागिण असेल असं वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कदाचित म अक्षरावरून बिग बॉस एक्स कंटेस्टंट महक चहल या शोची लीड अॅक्ट्रेस अशी चर्चा आहे. असं असलं तरी महक, महिमा अथवा मौनी कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. जेव्हा ‘नागिन 6’ ची अधिकृत घोषणा होईल तेव्हाच यापैकी कोणाचेतरी नाव समोर येईल. महकच्या नावाची चर्चा असण्याचं कारण तिचे नाव ‘म’ वरून सुरू होते आणि ती बिग बॉस 5 ची रनर अप होती. त्यामुळेच एकताने बिग बॉसमध्ये या शोची घोषणा केल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी 2022 मध्ये जानेवारी पासून नागिनचा पुढचा सीझन सुरू होत आहेच. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरे लवकरच चाहत्यांना मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मौनी रॉय, सुरभि ज्योती, सुरभि चंदना, अनिता हसनंदानी, हिना खान, अदा खान यांनी एकताची नागिण छोट्या पडद्यावर साकारली आहे. त्यामुळे पुढच्या सीझनसाठी कोणताही अभिनेत्री एकताची नागिण साकारण्यासाठई हसत हसत तयार होईल. तेव्हा आता सर्वांनाच उत्सुकता लागली आहे की या सीझनची नागिण नेमकी असणार कोण?

शिल्पा ठाकरेचा नवा चित्रपट ‘A फक्त तूच’

17 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT