ADVERTISEMENT
home / मनोरंजन
उठा उठा दिवाळी आली.. आठवल्या का या जाहिराती

उठा उठा दिवाळी आली.. आठवल्या का या जाहिराती

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जाहिरातींचे एक वेगळे योगदान आहे. कारण या जाहिराती पाहून आपण वस्तूंची खरेदी करतो. पण काही जाहिराती अशा असतात ज्या आपल्या मनात कायमच घर करुन राहतात. तुम्ही आता ही थोडा विचार करा आणि तुमच्या मनात भरलेली एखादी जाहिरात आठवा. तुम्हाला काहीतरी नक्कीच आठवेल. सणांच्या दिवसात तर काही जाहिराती हमखास ठरलेल्या असायच्या अशाच काही जाहिरातींची पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करुन देणार आहोत. बघा तुम्हाला नक्की आठवतायत का या जाहिराती. कारण दिवाळीच्या शुभेच्छा (diwali wishes in marathi) प्रमाणेच या जाहिरातीही दिवाळीचा अविभाज्या भाग आहेत.

DIY: दिवाळीला स्वतःच्या हाताने घर सजवण्यासाठी सोप्या टीप्स

1. उठा उठा दिवाळी आली (2013)

 दिवाळी म्हटली की, सगळ्यांना हमखास आठवतो तो मोती साबण. इतर वेळी कधीही न लागणारी जाहिरात दिवाळीच्या काळात मात्र पुन्हा एकदा सुरु होते. त्यामुळे कित्येकांचे दिवाळी आणि मोती साबण असे समीकरण आजही ठरलेले आहे. ही जाहिरात त्याचीच साक्ष आहे. बदलत्या दिवाळीच्या स्वरुपामध्ये मोती साबण मात्र बदलेला नाही असा आशय आहे. पण तो सांगताना त्याला एक इमोशनल टच दिला आहे. त्यामुळेच आजही ही जाहिरात लागली की, ते घड्याळ आजोबा आणि मोती साबण आठवल्यावाचून राहात नाही. 

2. सुनहरी दिवाली ( 2014)

दिवाळी म्हटली की दागिने आलेच. महिलांना या दिवसात दागिने अगदी आवर्जून दिले जातात. दागिना कितीही लहान असला तरी तो आईला मुलाने दिलेला दागिना कधीच लहान नसतो.या जाहिरातीमध्येही असेच दाखवण्यात आले आहे. मुलगा आपल्या आईसाठी एक छोटासा दागिना घेऊन येतो. तो आनंदात असतो पण घरी पोहोचल्यावर त्याचे वडील आईला मोठा दागिना देताना दिसत आहे.  त्याच्या हातातील छोटासा दागिना पाहून आईला आवडणार नाही असे वाटते. पण आईसाठी तो दागिना किती खास आहे ते आईच्या अश्रूतूनच कळतं. 

ADVERTISEMENT

दिवाळीत पहिल्या दिवशी आवर्जून घरी केले जातात हे पदार्थ

3. रंग लायी दिवाली (2009)

दिवाळी आली की, अनेक घरात रंगकाम केले जाते. पण घरी कोणता रंग काढायचा याचं एक मोठं चर्चासत्रच भरतं. तुमच्या घरातही अशी चर्चा होत असेल तर तुम्हाला ही जाहिरात नक्की आठवेल. ही जाहिरात जरी वोडाफोनची असली तरीसुद्धा त्यात कुटुंबाने एकत्र येणे गरजेचे असते हेच सांगणारी ही जाहिरात आहे. भारतीय सण हे कुटुंबाना एकत्र आणणारे असतात तेच यामध्ये दाखवण्यात आले आहे.

4. मोलाच्या नात्यासाठी मोलाची भेट ( 2017)

सासू- सुनेचे नाते हे नेहमीच वाईट असते असे नाही. अशाच या सासू- सुनांची ही जाहिरात आहे. एकीकडे सासू आपले सगळे दागिने इतरांना देण्याच्या गोष्टी करत आहे. तर दुसरीकडे त्यांची सून त्यांना दागिनाच भेट म्हणून देते. P & G गाडगीळची ही जाहिरात म्हणूनच थोडी वेगळी आणि लक्षात राहणारी आहे.

5. बुला रही है लाईफ (2008)

दिवाळी सगळ्यांचा सण आहे. यात लहान-मोठा,गरीब- श्रीमंत असा भेद केला जात नाही. कोका कोलाची ही जाहिरात त्याचेच उदाहरण आहे. ही जाहिरात थोडी कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मोगली सदृश्य दिसणारा मुलगा जंगलातून फटाक्यांच्या दिशेने शहरात येतो. शहरात फटाके आणि दिवाळीची मौज सुरु असते. त्याला तेथील लोक कोलाची बॉटल देतात आणि मग काय तो दिवाळी मस्त एन्जॉय करतो.

ADVERTISEMENT
24 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT