ADVERTISEMENT
home / फॅशन
गरोदरपणात म्हणून वापरायला हवेत ‘प्रेग्नंसी गाऊन’

गरोदरपणात म्हणून वापरायला हवेत ‘प्रेग्नंसी गाऊन’

आई होण्याचा आनंद शब्दात कधीच वर्णन करता येत नाही. पण या आनंदासोबतच काही काळजी आणि जबाबदारी ही संपूर्ण कुटुंबावर येत असते. महिला गरोदर असते त्यावेळी तिचं संपूर्ण घर गरोदर असते. बाळासोबतच आईची काळजी फार महत्वाची असते. बदलणारे मूड्स, होणारे त्रास सगळ्यांना सांभाळून घ्यावे लागतात. या दिवसात महिलांनी त्यांच्या कपड्यात काही बदल करणे अपेक्षित असते. सैलसर कपडे या दिवसात घालणे नेहमीच बेस्ट असते. काही जणांना गरोदरपणात आहे त्या कपड्यांमध्ये अॅडजेस्ट करायची सवय असते. पण हल्ली बाजारात इतके फॅन्सी गाऊन मिळतात ज्याचा उपयोग तुम्ही गरोदरपणात अगदी हमखास करु शकता. जाणून घेऊया याच प्रेग्नंसी गाऊन विषयी

जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता (Pregnancy Symptoms In Marathi)

प्रेग्नंसी गाऊनचे महत्व

Instagram

ADVERTISEMENT
  • गरोदरपणात तुम्ही सैल कपडे घालणे अपेक्षित असते. काही जण या दिवसात कुडता आणि लेगिंग्स घालतात. पण तुम्हाला अगदी आराम हवा असेल तर प्रेग्नंसी गाऊन उत्तम आहे. 
  • आता गाऊन हा शब्द ऐकून तुम्हाला जर तो तुमच्या नाईट गाऊनप्रमाणे वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. हल्ली फॅशनेबल गाऊन मिळतात. जे दिसायला फारच सुंदर असतात.
  • या दिवसांमध्ये लघवीला जाणे फारच कठीण असते. जर तुम्ही गाऊन घातला असेल तर तो काढ घाल करणे फार सोपे जाते.
  • कॉटन मटेरिअल असल्यामुळे हवा कायम खेळती राहते. 
  • तुम्हाला उठ बस करताना फार काही काळजी घ्यावी लागत नाही. 

वेगवेगळे मटेरिअल ट्राय करताना

Instagram

  • आता अनेक महिला या दिवसांमध्ये ऑफिसलादेखील जातात. त्यांना तेच तेच प्रकार घालण्याचा कंटाळा असतो. अशावेळी तुम्ही काही वेगळे प्रकार आणि मटेरिअलही ट्राय करु शकता. 
  • मटेरिअलचा विचार करता जर तुम्हाला कॉटनचा गाऊन बाहेर घालून जाताना इस्त्री करण्याचा कंटाळा असेल तर तुम्ही होजिअरी मटेरिअलचा वापरही करु शकता. 
  • ज्यांना जीन्स मटेरिअल आवडत असतील अशांनी जीन्समधील गाऊन घालायला काहीच हरकत नाही. तुम्हाला यामध्ये व्हरायटी मिळेल. 
  • मटेरिअलचा विचार करता तुम्ही सिंथेटीक मटेरिअलचा वापर टाळा. 

#Pregnancy मध्येही राहा फॅशनेबल

गाऊनची उंची महत्वाची

ADVERTISEMENT

Instagram

  • उंचीचा विचार करता तुम्ही या दिवसांमध्ये थोडे लांब गाऊन घालायला हवेत. जेणेकरुन तुम्हाला कुठेही बसताना किंवा प्रवास करताना फार विटार करावा लागणार नाही. 
  • तुम्ही जितका घेरदार गाऊन घ्याल तितके तुम्हाला अधिक आरामदायी वाटेल. 
  • तुमची उंची कमी असली तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण हल्ली रेडिमेड गाऊनची उंची प्रत्येकाला होईल अशी असते. 
  • जर तुम्ही गाऊन शिवून घेण्याचा विचार करत असाल तर हा पर्यायही उत्तम आहे. 
  • आता गरोदरपणात काहीही कपडे घालण्यापेक्षा तुम्ही मस्त गाऊन घाला आणि गरोदरपण एन्जॉय करा. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच  POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty  लिंकवर क्लिक करा. 

04 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT