ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
आयब्रो स्लिट्सचा ट्रेंड, जाणून घ्या काय आहे स्टाईल

आयब्रो स्लिट्सचा ट्रेंड, जाणून घ्या काय आहे स्टाईल

रोज वेगवेगळे नवे ट्रेंड्स आणि फॅशन येत असतात. यामध्ये काही फॅशन्स आपल्याला आवडतात तर काही फॅशन्स आणि ब्युटी ट्रेंंड्स (Beauty Trends) आपल्याला आवडत नाहीत. आधुनिक (Modern) फॅशन आणि ट्रेंड्स आपल्या मनात वेगवेगळे विचारही आणतात. कधी स्मोकी आईज मेकअप (smokey eyes makeup) तर कधी गडद मेकअप (Dark Makeup) तर कधी न्यूड मेकअप (Nude Makeup) असे ट्रेंड्स येतच असतात. तर सध्या नवा आलेला ट्रेंड म्हणजे आयब्रो स्लिट्स (Eyebrow slit). तुम्हाला याबाबत काही माहीत आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला या नव्या वेगळ्या ट्रेंडबद्दल माहिती देत आहोत. त्यापूर्वी आयब्रो स्लिट म्हणजे काय ते आधी जाणून घेऊया. 

आयब्रो स्लिट्स म्हणजे काय (Eyebrow slits)

आयब्रो अर्थात भुवयांवर एक पातळ आणि उभा असा कट दिला जातो, त्याला आयब्रो स्लिट्स असे म्हणतात. प्रोफेशनल अथवा पार्लरमधये तुम्हाला ब्युटिशियन (beautician) कडून हा कट करून देण्यात येतो. ही स्टाईल खरं तर 90 च्या दशकात हिपहॉप कलाकारांद्वारे प्रचलित झाली. पण आता हा ट्रेंड पुन्हा एकदा ब्लॉगर्सद्वारे आणण्यात आला आहे. वास्तविक हिपहॉप करणारे कलाकार अथवा ब्लॉगर्स हे नेहमीच वेगळ्या आणि अतरंगी स्टाईल्स आणतात. अशीच ही अतरंगी स्टाईल म्हणजे आयब्रो स्लिट्स. केवळ मुलीच नाही तर अगदी मुलंही ही स्टाईल करतात. वेगवेगळ्या हेअरस्टाईलसहदेखील ही स्टाईल करण्यात येते. याच्या कोणत्या वेगळ्या स्टाईल्स आहेत आपण पाहूया. 

पहिल्यांदाच करणार असाल आयब्रो थ्रेडिंग तर लक्षात ठेवा

1. आयब्रो स्लिट विथ हेअरकट जॉईनिंग (Eyebrow slit with haircut joining)

आयब्रो स्लिट ट्रेंड हा नक्कीच वाईल्ड ट्रेंड आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा ट्रेंड नक्कीच ट्राय करू शकता. पण तुम्हाला याची लाज वाटता कामा नये. तसंच तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमच्या हेअरकटप्रमाणेदेखील भुवयांना असा आकार देऊ शकता. भुवई आणि केस कापताना तुम्हाला याचा एकच अँगल आहे की नाही याची काळजी घ्यावी लागते. यामध्ये वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. पण हे करताना तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्टचीच मदत घ्यावी हे उत्तम.

ADVERTISEMENT

आयब्रोजचा आकार सतत बदलत असाल तर मग एकदा वाचाच

2. डबल स्लिट विथ हेअरकट (Double slit with haircut)

हा ट्रेंड वर दिलेल्या ट्रेंडच्या पुढची पायरी आहे. तुम्ही जर तुमची हेअरस्टाईल वेगवेगळी करण्यात माहीर असाल आणि तुम्हाला कोणाचाही भीती वाटत नसेल तर तुम्ही ही स्टाईल नक्कीच करून पाहू शकता. हा ट्रेंड नक्कीच तुमच्यासाठी आहे. ही स्टाईल अतिशय स्टायलिश असून तुमच्या भुवईमध्ये एकच कट न करता दोन स्लिट करण्यात येतात. दिसायला हे अत्यंत सुंदर दिसते. तुमच्या भुवया जाड असतील तर ही स्टाईल अधिक उठावदार दिसते हे नक्की. 

सुंदर लुक हवा असल्यास, आयब्रोजचा आकार ठेवा योग्य, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी – Eyebrow Shaping Tips In Marathi

3. सिंगल आयब्रो स्लिट (Single Eyebrow Slit)

ही अत्यंत साधी आणि सोपी स्टाईल आहे. पण दिसायला अत्यंत सुंदर दिसते. सिंगल आयब्रो ट्रेंड तुम्ही अगदी सहज फॉलो करू शकता. कारण ही स्टाईल कूल दिसण्यासह अत्यंत सुरक्षितही आहे. यामुळे दिसण्यात तितकासा काही फरक पडत नाही. तसंच तुम्हाला ही स्टाईल सहज सूट होते. यामुळे तुमच्या डोळ्यांकडे सर्वांचे लक्ष पटकन वेधले जाईल आणि तुम्ही यामुळे केलेला आय मेकअपदेखील अत्यंत सुंदर दिसेल. 

ADVERTISEMENT

 

असे करू शकता आयब्रो स्लिट्स

आयब्रो स्लिट्स तुम्ही कायमस्वरूपी अथवा अगदी तात्पुरते असे दोन्ही स्वरूपात करून घेऊ शकता. तुमच्या मनानुसार याची काळजी तुम्ही घ्या. तुम्हाला स्वतःहून हे करायचे असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक शेव्हर अथवा टेपने करा. आयब्रोच्या शेवटच्या भागात तुम्ही तिरके मार्क करून घ्या. जास्त कट करू नका अन्यथा खराब दिसेल. शक्यतो स्वतः न करता प्रोफेशनल कडूनच करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला हवा तसा आकार देण्यासाठी तुम्ही कन्सीलरचाही वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही आयब्रोवर योग्य लाईनिंग करून घ्या. पावडरने फिल करा आणि मग ब्रश करून घ्या. हे योग्यरित्या ब्लेंड करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

14 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT