ADVERTISEMENT
home / बिग बॉस
आठवड्याभरात बिग बॉस 14 गाजवणारी मराठमोळी निक्की तांबोळी नक्की आहे कोण

आठवड्याभरात बिग बॉस 14 गाजवणारी मराठमोळी निक्की तांबोळी नक्की आहे कोण

आठवड्याभरात बिग बॉस 14 मध्ये धमाल आणि बवाल करत गाजवणारी निक्की तांबोळी आहे मराठमोळी मुलगी. ‘नेलपेंट जाईल म्हणून मी भांडी घासणार नाही’ असं बिनधास्त सांगणारी, आपली बाजू सडेतोड मांडणारी पण तितकीच लाघवी आणि सर्वांनी जीव लावणारी निक्की तांबोळी सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय झाली आहे. निक्कीने आपल्या एंट्रीपासूनच धमाल उडवून दिली आहे. तर साध्या साध्या गोष्टींसाठी हक्काने भांडण करत निक्कीने घरदेखील हादरवून सोडलं आहे. पण तितक्याच हिमतीने ती घरातील कामंही करत आहे हेदेखील तिने सध्या घरात असलेल्या तिन्ही सिनिअर्सच्या लक्षात आणून दिले आहे. पहिल्या दिवसापासून सर्वांमध्ये असूनही आपला वेगळेपणा तिने दाखवून दिला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भांडण झाल्यानंतरही ते विसरून पुढे जाणारी आणि बालिश तरीही ठसकेबाज अशी निक्की सगळ्यांनाच आवडू लागली आहे. 

कोरोना काळात ‘या’ अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न, दोन महिन्याने केले जाहीर

सलमानलाही केले आकर्षित

पहिल्याच दिवशी अगदी स्टेजवरही सलमान खानलादेखील निक्कीने आपल्या बडबडीने आणि प्रेमळपणाने आकर्षित केले. आपण नक्कीच इतरांपेक्षा वेगळे आहोत हे तिने दाखवून दिले. त्यामुळे सोशल मीडियावर तिची तुलना मागच्या सीझनमधील शहनाझ गिलसह करण्यात येत आहे. पण आपल्या आवाजात एक मराठमोळा ठसका असणारी निक्की सर्वांना पुरून उरेल असं सध्या चित्र पहिल्याच आठवड्यात दिसून येत आहे. 

‘बिग बॉस 14’ मधील सर्व स्पर्धकांची होणार कोरोना चाचणी, राहणार क्वारंटाईन

ADVERTISEMENT

दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून ओळख

दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून निक्की तांबोळीची ओळख आहे. मात्र मुळात निक्की महाराष्ट्रीयन असून तिचा जन्म हा औरंगाबादला झाला  आहे. 1996 मध्ये निक्कीचा जन्म झाला असून तिचं  संपूर्ण शिक्षण औरंगाबाद झाले आहे. मात्र लहानपणापासूनच तिला ग्लॅमरची आवड असल्याने तिने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम मिळवून आपल्या करिअरला सुरूवात केली. 2019 मध्ये तिने तेलुगू चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली. पण तिला खरी ओळख मिळवून दिली ती ‘कंचना 3’ या चित्रपटाने. तसंच ती तेलुगू आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये काम करते. निक्की दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये फारच कमी वेळात स्टार बनली आहे. बिग बॉसची ऑफर तिला मागच्यावर्षीही देण्यात आली होती. मात्र तिच्या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असल्याने तिने नकार दिला होता. निक्कीला जास्त लोक ओळखत नाहीत हाच तिचा फायदा आहे असं तिने बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सांगितलं होतं. 

हिना खानने शेअर केला बिग बॉस 14 च्या सेटवरचा हा व्हिडिओ

सिद्धार्थ शुक्ला आवडता स्पर्धक

सिद्धार्थ शुक्ला आणि गौहर खान हे दोन्ही आपले आवडते स्पर्धक असल्याचं निक्कीने सांगितलं होतं. सध्या 15 दिवस या दोघांबरोबरही तिला राहायला मिळत आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे स्वप्नवतच आहे. इतकंच नाही तर निक्कीचा आत्मविश्वास इतका जबरदस्त आहे की, तिने बिग बॉससाठी 3 स्टायलिस्ट ठेवले आहेत. जे तिची स्टाईल करतील. एकूण 18 लेहंगा तिने बनवून घेतले आहेत. त्यामुळे आता निक्की दर आठवड्याला काय काय करते याची प्रेक्षकांनाही  उत्सुकता वाटायला लागली आहे. बिनधास्त, प्रेमळ, हट्टी आणि तरीही हवीहवीशी अशा वेगवेगळ्या छटा दाखविणारी निक्की पुढे काय करणार हे आता कळेलच. 

निक्कीचा लुक हवा असेल तर तुम्ही वापरू शकता आमचे MyGlamm चे प्रॉडक्ट्स. निक्कीने प्रिमियरला केलेला लुक तुम्ही हे उत्पादन वापरून नक्की मिळवू शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT