बॉलीवूडमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. कधी ब्रेकअपमुळे दोन सेलेब्समध्ये बोलणं बंद होतं तर कधी ब्रेकअपनंतरही एक्स कपल पुन्हा एकत्र काम करताना दिसतात. असंच सध्या Ranbir Kapoor बाबत सुरू आहे. रणबीर आता बॉलीवूडमध्ये स्थिरावून बराच काळ झाला आहे पण त्याचं खाजगी आयुष्य मात्र अजून स्थिर असल्याचं दिसत नाही. मग ती त्याची सो कॉल्ड अफेअर्स असो वा त्याच्या बाबा ऋषी कपूर यांचं आरोग्य असो.
रणबीर आणि कतरिना पुन्हा आले एकत्र
2016 साली Katrina Kaif आणि रणबीर कपूरचा ब्रेकअप झाला होता. दीपिकाशी ब्रेकअप होण्याचं कारण होती कतरिना कैफशी वाढलेली रणबीरची जवळीक. कतरिनाबाबत कळताच Deepika Padukone रणबीरपासून वेगळी झाली. त्यानंतर अनेक महिने एक्स लव्हर्स रणबीर आणि कतरिना लिव-इन मध्ये राहत होते. मुंबईत त्यांना एकत्र फ्लॅटही घेतला होता. पण ही जोडी काही जास्त काळ एकत्र राहू शकली नाही. त्यांचा ब्रेकअपही बराच गाजला. पण ब्रेकअपनंतरही जोडी जग्गा जासूस या चित्रपटात दिसली. अगदी कोणत्याही इव्हेंटला भेटल्यावरही हे दोघं एकमेकांना स्माईल देतात. त्यामुळेच की काय या जोडीच्या चाहत्यांना त्यांना एकत्र पाहायची वारंवार इच्छा होते. जर तुम्ही या जोडीचे फॅन असाल तर तुमच्यासाठी आहे खूषखबर. या दोघांचा चित्रपट नाही पण एका मोबाईलच्या जाहिरातीत हे दोघं सध्या एकत्र झळकत आहेत. या जाहिरातीत दोघांसोबत प्रसिद्ध रॅपर बादशाहही दिसत आहे.
आधी दीपिका आता कतरिना
आलियासोबत वेकेशनवर गेल्याचे रणबीरचे फोटोज काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. पण नेमकं रणबीरच्या मनात आणि कामाच्याबाबतीत काय सुरू आहे, याचा मात्र थांगपत्ता लागत नाही किंवा रणबीर आपल्या खाजगी आयुष्याची आणि प्रोफेशनल वर्कची सरमिसळ करत नाही, हेच खरं. कारण रणबीर फक्त कतरिनासोबतच नाहीतर एका रंगांच्या ब्रँडच्या जाहिरातीत दीपिकासोबतही झळकला आहे. आता यावर आलियाचं रिएक्शन कसं असतं हे जाणून घ्यायला कोणत्याही फॅन्सना नक्कीच आवडेल नाही का?
रणबीर आहे प्रोफेशनल
वरील सर्व गोष्टींवरून आपल्याला हे कळलंच आहे की, रणबीर किती प्रोफेशनल आहे ते. कामाच्या बाबतीत म्हणायचं झाल्यास रणबीर सध्या आगामी ब्रम्हास्त्र या चित्रपटात आलियासोबत दिसणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एवढंच नाहीतर रणबीर लवकरच अर्जुन रेड्डी आणि कबीर सिंग फेम दिग्दर्शक संदीप वांगाच्या क्राईम थ्रिलर सिनेमातही दिसणार आहे. या प्रोजेक्टबाबत सध्या बॉलीवूडमध्ये बरीच चर्चा आहे.
कतरिनाही आहे कामात व्यस्त
तर दुसरीकडे कतरिनाही रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमात अनेक वर्षांनंतर अक्षयकुमारसोबत दिसणार आहे. नुकताच कतरिनाचा एक डान्स व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कतरिनाचा हॉट अवतार दिसून येत आहे.
हेही वाचा –
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र
कबीर सिंगच्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्यास रणबीर कपूर उत्सुक
रणबीर कपूर खऱ्या आयुष्यातही ‘जग्गा जासूस’, कतरिनाचा खुलासा