ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
तुम्हाला माहीत आहे का, सौंदर्यप्रसाधनांचा वापर किती वर्ष करू शकता

तुम्हाला माहीत आहे का, सौंदर्यप्रसाधनांचा वापर किती वर्ष करू शकता

मेकअप अथवा सौंदर्यप्रसाधन हा प्रत्येक स्त्री च्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याकडे लिपस्टिक, काजळ, आयशॅडो, लायनर असे आणि अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधनं असतात. साधारणतः ही सौंदर्यप्रसाधनं वापरताना त्याचा उपयोग एक वर्ष करावा असं सांगण्यात येतं. पण प्रत्येक सौंदर्यप्रसाधन नक्की किती काळ टिकतं आणि त्याचा किती वर्ष तुम्ही वापर करू शकता याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्ही जास्त  काळ वापरत असाल तर त्याचा वापर त्वरीत थांबवा. आम्ही तुम्हाला कोणती सौंदर्यप्रसाधनं तुम्ही किती काळ वापरू शकता याची माहिती सांगणार आहोत. तुम्हाला नियमित वापरासाठी ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल. जर तुमच्याकडे जुनी सौंदर्यप्रसाधनं असतील तर वेळीच ती काढून टाका आणि दुसरी विकत घ्या. पाहूया कोणत्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर आपण किती काळ करू शकतो – 

लिपस्टिक आणि लिपग्लॉस

Shutterstock

इतर कोणताही मेकअप आपण नियमित आयुष्यात वापरत नाही. पण लिपस्टिकचा वापर सर्रास केला जातो. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या लिपस्टिक्स असतात. मग या नक्की किती काळ वापरू शकतो असा प्रश्न कधी ना कधी मनात येतोच. तर तुम्ही लिपस्टिक कोणत्याही कंपनीची असो केवळ एक वर्षच त्याचा वापर करा. त्यापेक्षा अधिक वापर करू नका. लिपस्टिकची एक्स्पायरी तारीख अर्थात हमी ही एक वर्षांची असते. त्यानंतर तुम्ही ती लिपस्टिक वापरली तर तुमचे ओठ त्यामुळे काळे पडायला लागतात. त्यामुळे वर्षभरात तुम्ही तुमच्या लिपस्टिकचा वापर करून घ्या. लिपग्लॉस हे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम ठेवायला मदत करतात. पण लिपस्टिकपेक्षा अधिक काळ लिपग्लॉस टिकतात. साधारण दीड वर्ष तुम्ही लिपस्टिकचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

आयलायनर

Shutterstock

आयलायनरमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. तुमच्याकडे जर जेल आयलायनर असेल तर त्याचा वापर तुम्ही सहा महिन्यांपर्यंत करू शकता. त्यानंतर तुम्ही ते बदलायला हवे. कधीतरी हा कालावधी एक वर्षांपर्यंत वाढूही शकतो. तुमच्याकडे जर पेन्सिल आयलायनर असेल तर त्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. तुम्ही साधारण दोन वर्ष पेन्सिल आयलायनरचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

ब्लशर

Shutterstock

आपण पार्टीला अथवा कोणत्या कार्यक्रमाला जाण्यासाठी बहुदा गाल गुलाबी करण्यासाठी ब्लशरचा वापर करतो. ब्लशरदेखील तुम्ही एक वर्ष वापरू शकता. एक वर्षानंतर तुम्ही याचा वापर केल्यास, तुमच्या त्वचेवर याचे कोणतेही वाईट परिणाम तर होत नाही ना याकडे लक्ष द्या. त्याप्रमाणे याचा तुम्ही अधिक वापर करू शकता. 

मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये

ADVERTISEMENT

काजळ

Shutterstock

काजळ ही मेकअपमधील अशी वस्तू आहे जी प्रत्येकीकडे असते. कोणत्याही दुसऱ्या मेकअपचा वापर न करताही फक्त काजळचा वापर करून सुंदर दिसू शकता. पण काजळ साधारण किती काळ तुम्हाला वापरता येतं. तुम्ही वर्षानुवर्ष काजळ वापरू शकत नाही. साधारण दोन वर्ष तुम्ही एक काजळ वापरू शकता. अन्यथा नंतर त्याचा डोळ्यांना त्रास होतो. डोळे काजळ घातल्यानंतर लाल होऊ लागले तर समजून जावं की, काजळ वापरण्याचा कालावधी संपला आहे. 

फाऊंडेशन

ADVERTISEMENT

Shutterstock

बऱ्याच जणांना मेकअप करताना फाऊंडेशनचा वापर चेहरा नितळ दिसावा यासाठी करावा लागतो. तुम्ही जर नियमित फाऊंडेशन वापरत असाल तर ते पटकन संपतं. पण तुम्ही जर केवळ कोणत्या तरी कार्यक्रमाला वापरत असाल तर ती बाटली तशीच पडून राहाते. मुळात फाऊंडेशन हे साधारण तुम्हाला 4-5 थेंब एकावेळी लागतं. त्वचेला इन्फेक्शन होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हे साधारण दीड वर्षांनी अर्थात 18 महिन्यांनी तरी किमान बदलायला हवं. अन्यथा चेहऱ्यावर रॅश येण्यासारखेदेखील दुष्पपरिणाम होऊ शकतात. 

तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

कन्सिलर

ADVERTISEMENT

Shutterstock

कन्सिलरमुळे तुमच्या चेहऱ्यावर असणारे डाग लपतात. त्यासाठी याचा वापर बऱ्याच प्रमाणात केला जातो. कन्सिलर हे एक वर्षापेक्षा अधिक तुम्ही वापरू शकता. पण यामुळे कोणतीही अलर्जी येऊ नये म्हणून तुम्ही एक वर्षानंतर तरी हे बदलायला हवं. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
15 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT