डोळे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नक्की काय करता? असा प्रश्न जर तुम्हाला अचानक कोणी विचारला तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल आणि तुम्ही भांबावून जाल ना? अथवा यावर तुमचं उत्तर असेल की थंड पाण्याने डोळ्यावर पाण्याचा हबका मारतो अथवा कधी कोमट पाण्यात स्वच्छ कपडा भिजवून त्याने स्वच्छ करून घेतो. पण जर तुम्हाला सांगितलं की आयुर्वेदानुसार डोळे स्वच्छ करण्याची प्रक्रिया जरा वेगळी आहे तर तुम्हाला पटेल का? डोळे स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत. त्या तुम्हाला या लेखातून आम्ही सांगणार आहोत. तसंच एक लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या शरीराप्रमाणेच डोळेही नियमित स्वच्छ करत राहायला हवे. जाणून घेऊया काही सोप्या पद्धती आणि टिप्स.
डोळे स्वच्छ करण्यापूर्वी
डोळे स्वच्छ करण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या टिप्स त्याच व्यक्तींनी फॉलो कराव्या ज्यांचे डोळे अधिक संवेदनशील नाहीत अथवा त्यांना कोणतेही डोळ्यांचे आजार झालेले नाहीत. काही जणांना डोळ्यातून सतत पाणी येण्याचाही त्रास असतो. अशा परिस्थितीत तुम्हाला जर काही त्रास होत असेल तर तुम्ही या खाली देण्यात आलेल्या टिप्स अजिबात वापरू नका. तसंच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल तर तुम्ही याचा अजिबात उपयोग करू नका. डोळे हा संवेदनशील अवयव आहे आणि त्यामुळे याची काळजी घेताना तुम्हाला तितकेच जपावे लागते.
डोळे स्वच्छ करण्यासाठी साहित्य आणि वापरण्याची पद्धत
- 2 – 3 चमचे त्रिफळा चूर्ण
- 3 – 4 कप फिल्टर्ड पाणी
वापरण्याची पद्धत
- सर्वात पहिले तुम्ही त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून घ्या आणि रात्रभर तसंच राहू द्या
- दुसऱ्या दिवशी स्वच्छ कपड्यामध्ये तुम्ही हे पाणी गाळून दुसऱ्या भांड्यात काढून घ्या
- त्यानंतर हे मिश्रण मलमलच्या कपड्याने टिपून घ्या आणि मग तुमचे डोळे या कपड्याने स्वच्छ करा
- एक डोळा स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या डोळ्याची स्वच्छता करा
कसा होतो याचा फायदा
डोळे स्वच्छ करण्यासाठी नक्की याचा कसा फायदा होतो ते जाणून घ्या. या मिश्रणामुळे तुमचे डोळे शांत राहतात आणि डोळ्यांना उष्णतेचा त्रास होत नाही, डोळ्यांवर रांजणवाडीसारखे आजार होत नाहीत अथवा डोळ्यांची जळजळ होत नाही. याशिवाय या त्रिफळा चूर्णाच्या मिश्रणामुळे डोळ्याचे आरोग्य अधिक चांगले राहते. सतत कामात असल्यामुळे आपण मोबाईलवर आणि लॅपटॉपवर असतो. त्यामुळे डोळ्यांवर सतत ताण येत राहातो. मात्र या पद्धतीने तुम्ही डोळे स्वच्छ केल्यास तुमच्या डोळ्यांवर येणारा ताण आणि सूजदेखील कमी होण्यास मदत मिळते. ही अतिशय सोपी आणि त्रासदायक न ठरणारी अशी पद्धत आहे.
टीप – यामुळे डोळे उत्तम राहतातच असा आमचा दावा नाही. मात्र डोळ्यांना त्रास होत नाही. पण तुम्हाला कोणतीही शंका मनात असेल तर तुम्ही डोळे स्वच्छ करण्यासाठी ही पद्धत वापरण्यापूर्वी आपल्या घरगुती डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि मगच त्याचा उपयोग करा. स्वतःच्या मनाने कोणतीही पावले तुम्ही उचलू नका. कारण डोळे हा अतिशय संवेदनशील अवयव आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक