जिंदगी ना मिलेगी दोबारा दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 ला जोया अख्तरने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला तरूणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रोड ट्रिपवर आधारित या चित्रपटात ह्रतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओलने मुख्य भूमिका साकारली होती. याच कैतरिनान कैफ आणि कल्कि कोचलिनचीही महत्त्वाची भूमिका होती. इम्ररान, अर्जुन आणि कबीर अशा तीन जीवलग मित्रांची कथा लोकांना खूपच आवडली होती. तरूणाईवर आधारित या चित्रपटाची लोकप्रियता पाहता आता या चित्रपटाचा सीक्वल करण्याचं निर्मात्यांच्या मनात आहे. या सीक्वलचं दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. फरहान डॉनच्या सीक्वलनंतर जवळजवळ दहा वर्षांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे वळला आहे. तो काही दिवसांपासून त्याची बहीण जोयासोबत या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटाच्या कथेचा ड्राफ्ट तयार करण्यात आला असून यावेळेची कॉन्सेप्ट थोडी वेगळी असणार आहे. ही कथाही रोड ट्रिपवरच आधारित असेल मात्र हे जिंदगी मिलेगी ना दोबाराचं फिमेल व्हर्जन असणार आहे. या चित्रपटासाठी फरहानने आलिया भटची निवड केलेली आहे.
कधी होणार या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात
डॉन 2 नंतर जवळजवळ दहा वर्षे फरहान दिग्दर्शन कधी करणार अशी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती. आता फरहान त्यांच्या आगामी चित्रपटासह दिग्दर्शनासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे त्याने दिग्दर्शनासाठी त्याचाच जिंदगी ना मिलेगी दोबाराचा सीक्वल निवडला आहे. या चित्रपटात आलिया भट मुख्य भूमिकेत दिसणार असून ही कथा तरूणींवर आधारित असणार आहे. मागील चित्रपटाप्रमाणेच यातही तीन मैत्रिणींची कथा दाखवण्यात येईल. शिवाय रोड ट्रिप ही कॉन्सेप्टही या चित्रपटात समानच राहील. चित्रपटाचे नाव अजून ठरवण्यात आलं नसलं तरी या चित्रपटाची कथा नक्कीच फायनल करण्यात आली आहे. या चित्रपटाचे कथानक फरहान आणि जोयाने लॉकडाऊनच्या काळात पूर्ण केलं आहे. आता लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात केली जाईल. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
फरहान आणि आलियाचे आगामी चित्रपट
चित्रपटातील कथेनुसार तीन मैत्रिणींपैकी एक तर आलिया भट असणार आहे. मात्र यापैकी इतर दोन मैत्रिणींच्या भूमिकेसाठी अजून कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही. आलियाला या चित्रपटाचे कथानक आवडले असून ती या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच यातील तीनही अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा केला जाईल आणि चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरूवात होईल अशी आशा आहे. फरहान सध्या राकेश ओमप्रकाश मेहराच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या आगामी चित्रपट तूफानसाठी व्यस्त आहे. यासोबतच राकेश शर्माच्या बायोपिक सारे जहां से अच्छामध्येही त्यांचं शूटिंग सुरू आहे. त्यामुळे या चित्रपटांच्या कामातून मोकळं झाल्यावर लगेचच तो जिंदगी मिलेगी ना दोबाराच्या दिग्दर्शनला सुरूवात करणार आहे. शिवाय सध्या आलियाही तिच्या गंगुबाई काठियावाडीच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. शिवाय लवकरच तिचा आणि रणबीर कपूरचा ब्रम्हास्त्रही प्रदर्शित होणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
परफेक्ट बिकिनी बॉडीसाठी निया शर्मा होती दोन दिवस उपाशी
अभिनेत्री किश्वर मर्चंटने शेअर केला फोटो, आई होणार असल्याची केली घोषणा
गायिका हर्षदीप कौर झाली आई, मुलगा झाल्याचे सोशल मीडियावर जाहीर