आई हा घराचा जीव असते तर बाबा आयुष्याचा आधार, असं म्हटलं तर नक्कीच ते वावगं ठरणार नाही. आई ही कुटुंबाला वडिलांच्या आधारामुळे व्यवस्थित सांभाळून ठेवत असते हा विचारही मुलांनी नीट करायला हवा. आईसाठी कोट्स आपण वाचतोच. यावर्षी तुम्ही तुमच्या वडिलांना फादर्स डे कोट्स (fathers day quotes in marathi) पाठवून करा आनंदी. आईसाठी तर आपण बरंच काही करत असतो, पण या पितृदिनाची माहिती करून तुम्ही तुमच्या वडिलांना पाठवा प्रेमपूर्वक संदेश (fathers day Wishes in marathi). काही जणांनी आपल्या वडिलांना गमावलेले असते. पण या दिवशी साहजिकच आहे त्यांची आठवण येणे. बाबांसाठी कोट्स (Father Day quotes in Marathi) खूपच कमी असतात. पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा (happy fathers day wishes in marathi) देत जाणून घ्या आपल्या बाबांसाठी खास कोट्स (happy fathers day quotes in marathi). बाबांसाठी खास शुभेच्छा द्या मराठीतून
Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठी
फादर्स डे साठी काही कोट्स (Happy fathers day quotes in marathi) तुम्ही तुमच्या वडिलांना आनंदी करण्यासाठी गिफ्ट देताना वापरू शकता. बाबा हा नेहमीच आपला पहिला हिरो असतो. बाबांशिवाय कुटुंब हे अपूर्ण आहे. अशाच आपल्या प्रिय बाबांसाठी काही खास कोट्स.
1. निसर्गाचा अमूल्य ठेवा म्हणजे वडील.
2. आयुष्यात वडिलांनी एक असं गिफ्ट दिलं आहे ते म्हणजे माझ्यावर कायम विश्वास ठेवला
3. माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे
4. आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
5. कसं जगायचं आणि कसं वागायचं हे तुम्ही शिकवलंत आणि त्यामुळेच आज या जगात जगायला शिकलोय
6. कितीही अपयशी झाल्यावरही विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो तो म्हणजे बाबा (Happy fathers day quotes in marathi)
7. जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात (fathers day quotes in marathi)
8. तुम्हीही कितीही मोठे झालात तरी असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूसच म्हणून पाहणार आणि तो म्हणजे तुमचा बाबा
9. माझ्या वडिलांनी मला कसं जगायचं शिकवलं नाही, पण त्यांना बघून मी जगायला शिकलो – क्लेरेन्स बलिंग्टन केलंड
10. आपलं मनच आहे जे कायम आपल्याला मुलगा आणि वडील म्हणून एकत्र ठेवतं – जोहान स्किलर
fathers day wishes in marathi | fathers day शुभेच्छा मराठी
वडील म्हटलं की जितका जिव्हाळा असतो तितकीच भीतीही वाटते. ही अर्थातच आदरयुक्त भीती असते. पण आता वडील आणि मुलीचं अथवा मुलाचं नातं बदलताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी आईप्रमाणेच वडील आपल्या मुलांचे मित्र म्हणून वागतात. आपल्या वडिलांसाठी असेच काही भावनात्मक कोट्स (fathers day wishes in marathi)
1. खिसा रिकामा असला तरीही कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा श्रीमंत मी कधी पाहिला नाही
2. स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
3. बाप हा बाप असतो,
वरून कणखर पण मनातून तो फक्त आपला असतो
4. बाबांचा मला कळलेला अर्थ
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन
मुलांसाठी झटणारं अंतःकरण
(fathers day wishes in marathi)
5. आपल्या संकटावर निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस बाप म्हणतात
6. कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा
7. आपले दुःख मनात ठेऊन
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे ‘वडील’
8. घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेने नमस्कार –
Happy Fathers Day In Marathi
9. बाप जिवंत आहेत तोपर्यंत परिस्थितीचे काटे कधीच आपल्या पायापर्यंत पोहचत नाहीत
10. एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो …तो म्हणजे बाबा (fathers day wishes in marathi)
वाचा वडिलांसाठी भावनिक कोट्स – Emotional Quotes On Father In Marathi
fathers day miss You quotes in marathi | Miss You पप्पा कोट्स मराठी
बाबा ही अशी व्यक्ती असते ज्याच्याशी मतभेद होतात. कधीतरी पटतही नाही. पण त्याचा सर्वात जास्त आधार असतो. बाबा असेपर्यंत कोणत्याही परिस्थितीशी सामना करताना आधार असतो. पण बाबा गेल्यानंतर मात्र त्यांची उणीव जास्त भासते. फादर्स डे च्या दिवशी तर बाबांची अधिक आठवण येते. अशावेळी काही स्टेटस ठेवायचे असतील तर तुम्हाला या लेखाचा उपयोग होईल.
1. तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात श्वासात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे
2. आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला
पण तुमच्या जाण्याने आनंदच हरवला – miss you papa
3. तुमची आठवण तर रोज येते
पण तुम्ही यायला हवं असंही रोज वाटते
4. बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते
5. आयुष्य तर जगत आहे
पण तुम्ही गेल्यानंतर त्यात तो आनंद मात्र राहिला नाही
6. प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…Happy Fathers Day In Marathi
7. बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे
आजच्या दिवशी तर अधिक पोरकं वाटतं
8. बाबा तुम्ही परत या….
9. आता फक्त आठवणी शिल्लक राहिल्या आहेत…Miss u Baba
10. बाबांची खरी किंमत त्यांच्या नसण्याने कळते – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा!
Fathers Day Messages In Marathi | बाबांसाठी मराठीतून संदेश
बाबांसाठी या फादर्स डे ला तुम्ही मराठी संदेश पाठवा आणि त्यांना आनंदी करा. तुमच्या बाबांना द्या खास शुभेच्छा.
1. आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं
तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे
2. तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे बाबा – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
3. आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की, तुमची साथ मला लाभली – Happy fathers day
4. माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे – पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
5. कोण म्हणतो बापाचा धाक असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर
6. हिरो हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात आणि तुम्ही माझे हिरो आहात – happy fathers day
7. आईसाठी खूप लिखाण केलं जातं
पण बाबांसाठी व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास म्हणूनच
तुम्हाला तुमचे महत्व सांगण्याचा घेतलाय ध्यास – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
8. बाबा तुम्ही बरोबर आहात आणि तुमची साथ आहे
म्हणूनच माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत आहे
9. माझे पाय मी घट्ट रोवून उभा आहे
कारण माझ्यासाठी भक्कम असा वडिलांचा खांदा आहे – पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
10. मुलगी असूनही कधीही मुलापेक्षा कमी न समजणारा,
स्वतःची झोप आणि भूक न विचार करता आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न असणारा बाबा
Fathers Day Wishes For Father In Law In Marathi | सासऱ्यांसाठी फादर्स डे च्या शुभेच्छा
सासरे हे आपल्या घरातील आधारस्तंभ असतात. आपल्या घरातील वडिलधारी व्यक्ती असलेल्या सासऱ्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा तुम्हालाही येतील.
परक्या घरात येऊनही तुम्ही मला कधी काही उणीव भासू दिली नाहीत. नशीबवान आहे मी जी तुमच्या घरची सून झाले. हॅपी फादर्स डे सासरेबुवा
मी या जगात स्वःतला लकी समजते की वडिलांच्या रूपात मला तुमच्यासारखे सासरे मिळाले. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.
जेव्हा देव तुमच्यावर खूष असतो तेव्हा तुमच्या आयुष्यात सासऱ्यांच्या रूपातही चांगली व्यक्ती पाठवतो. जी तुम्हाला वडिलांसारखे प्रेम देते. अशा देवदूतासमान सासऱ्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा
तुम्ही मला नेहमी मुलीप्रमाणे वागवलंत. याबद्दल मी तुमचे आणि देवाचे आभार मानते. पितृदिनाच्या शुभेच्छा सासरेबुवा.
फादर्स डे च्या शुभेच्छांच्या निमित्ताने आज मला तुमच्यावरील प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे. हॅपी फादर्स डे पप्पा.
तुम्ही फक्त एक चांगले सासरेच नाहीतर एक चांगली व्यक्तीही आहात. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.
आज तुमचा दिवस आहे आणि देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. हॅपी फादर्स डे आप्पा.
वडिलांसमान असणाऱ्या सासऱ्यांना हॅपी फादर्स डे, देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
एका अद्भूत आणि शानदार सासरे असणाऱ्या माझ्या वडिलांना खूप धन्यवाद आणि फादर्स डे कोट्स मराठी तून मी भरपूर शुभेच्छा देते.
माझ्या जीवनातील खास व्यक्तींमध्ये तुमचा समावेश होतो. सासऱ्यांना फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.
New Fathers Day Miss U Quotes In Marathi | फादर्स डे मिस यू कोट्स इन मराठी
जरी आपल्यासोबत आज आपले वडील नसले तरी त्यांना आपण पदोपदी मिस करत असतो. तेव्हा फादर्स डे च्या निमित्ताने हे कोट्स तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.
जीवनातील प्रत्येक पायरीवर मी तुमची नक्की आठवण काढते बाबा. कारण तुम्हीच माझा आदर्श आणि जीवन प्रेरणा आहात मिस यू बाबा. हॅपी फादर्स डे.
वडिलांमध्ये मित्र मिळणं कधीकधी कठीण असतं. पण तुम्ही ते शक्य करून दाखवलंत. हॅपी फादर्स डे आणि मिस यू पप्पा.
तुम्ही आज जिथे असाल तिथे नक्कीच आनंददायी वातावरणात असाल. आज फादर्स डे ला तुम्हाला खूप मिस करते. फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
जगातील सर्वात चांगली आणि दयाळू व्यक्ती होतात तुम्ही. तुमची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. हॅपी फादर्स डे अप्पा.
तुम्ही आम्हाल या जगात कसं जगायचं ते शिकवलंत आणि आम्ही पायावर उभं राहिल्यावर एका क्षणी आमच्यापासून दूर गेलात. मिस यू बाबा. हॅपी फादर्स डे
तुम्ही माझ्यासाठी आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. जितके आधी होतात. जिथे असाल तिथून मला नक्कीच आशिर्वाद द्याल. जागतिक फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.
आज मी तुमच्यापासून दूर परक्या शहरात आणि परक्या घरात आहे पप्पा. पण तुमची राणी आजही तुमच्यावर तेवढचं प्रेम करते. हॅपी फादर्स डे बाबा.
सासरी गेले तरी ओढ माहेरची आहे. कारण माझे वडील माझे दैवत आहेत. मिस यू बाबा.
तुम्ही मला नेहमी मुलासमान वागवलंत. कधीच कोणत्याही गोष्टीला नकार दिला नाहीत. अशा माझ्या देवासमान वडिलांना मी खूप मिस करते. हॅपी फादर्स डे पप्पा.
Fathers Day Whatsapp Status In Marathi | फादर्स डे वॉट्सअप स्टेटस इन मराठी
फादर्स डे ला वॉट्सअपच्या स्टेटसला ठेवण्यासाठी खालील कोट्स तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्हीही वाचा आणि तुमच्या वॉट्सअपला स्टेटस म्हणूनही नक्की ठेवा.
आपल्या अनुभवाने आम्हाला नेहमी मार्ग दाखवणाऱ्या पप्पांना फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.
डोळ्यांत कधीही अश्रू न येणाऱ्या पण मनात नेहमी आमच्यासाठी काळजी करणाऱ्या बाबांना आजच्या जागतिक फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.
आज सुविचार मनात येत आहेत, औचित्य आहे ते जागतिक फादर्स डे चं. पप्पा तुम्ही आमच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी शतशः आभार.
लग्न होवो, मुलीला मुलं होवो पण वडिलांसाठी ती नेहमी छकुलीच असते. तुमच्या लाडक्या छकुलीकडून बाबाला खूप खूप शुभेच्छा.
फादर्ड डे आमचा रोजच असतो. कारण आमचे बाबा आमच्या घरातील सर्वात प्रिय व्यक्ती आहेत. तरीही आज पुन्हा एकदा जागतिक फादर्स डे च्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
फणसासारखे माझे बाबा. वरून काटेरी पण आत मिळतात रसाळ गरे. माझ्या बाबाला फादर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा.
Fathers Day Status In Marathi | वडिलांसाठी खास स्टेटस
फादर्स डे च्या निमित्ताने आपण बाबांबद्दल लिहायचा प्रयत्न करत असतो. बाबांसाठी वेगवेगळी शायरी (fathers day shayari in marathi) करण्याचा प्रयत्न करतो. मग भावनात्मक काही स्टेटस ठेवायचे असतील तर तुम्हाला नक्की आमच्या लेखाचा उपयोग होईल. वडील स्टेटस नक्की काय असतो हे तुम्हालाही माहीत आहेच. बाबांसाठी हेच योग्य गिफ्ट असेल
1. आज बाबांसाठी काय स्टेटस ठेवावे
आज माझं जे काही स्टेटस आहे ते त्यांच्यामुळेच आहे
2. मी कधी बोलले नाही, सांगितले नाही तरीही बाबा
तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट बाबा आहात
3. बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षणाला
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला!
4. बाबा म्हणजे अशी व्यक्ती जी स्वतः दुःखी असतानाही
मुलाच्या चेहऱ्यावरच्या आनंदासाठी दिवसभर काबाडकष्ट करतो
5. बाबा जेव्हा बरोबर असतात
तेव्हा आयुष्यातला प्रत्येक आनंद आपल्यासह असतो
6. माझ्यासाठी माझं संपूर्ण जग तुम्ही आहात बाबा… पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
7. तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार बाबा
8. तुम्ही दिलेला वेळ, तुम्ही घेतलेली काळजी आणि तुम्ही दिलेले प्रेम
याची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही बाबा – Happy Fathers Day
9. तुमच्या घरात मी जन्म घेतला आणि तुम्ही माझे वडील आहात याचा मला सार्थ अभिमान आहे – Happy Fathers Day
10. आनंदाचा प्रत्येक क्षण माझा असतो
जेव्हा माझ्या बाबाचा हात माझ्या हाती असतो – Happy Fathers Day
Latest Fathers Day Wishes In Marathi | पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मराठीतून
बाबांसाठी खास संदेश या दिवशी देण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी गुगल करतो. पण आपल्या भाषेतील भावना पटकन पोहचते. असेच काही खास शुभेच्छा संदेश मराठीतून.
1. घरातल्या बापमाणसाला कृज्ञतेचा नमस्कार…पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
2. आपल्या कुटुंबाला नेहमी एकत्र ठेवणारा आणि जपणारा असा माणूस म्हणजे बाबा…Happy Fathers Day
3. माझं आयुष, प्रेम आणि काळजी हे सर्व तुम्ही आहात याचा मला अभिमान आहे बाबा
4. बाबा – बाळाचा बाप अर्थात बाबा – तुम्ही कायम माझे सर्वस्व आहात
5. तुमच्यासारखा बाबा या जगात शोधूनही सापडणार नाही. मला कायम साथ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार
6. आयुष्यभर माझ्यासाठी कष्ट केलेत आता मला तुमच्यासाठी कष्ट करून तुम्हाला सुखात ठेवायचे आहे – Happy Fathers Day
7. अशी एक वेळ होती जेव्हा मी तुम्हाला ओळखू शकले नाही. पण प्रत्येक क्षणी माझ्या चुका पोटात घालून तुम्ही मला माफ केलंत. आज मी जी काही आहे तुमच्यामुळेच आहे आणि यासाठी मी जन्मभर ऋणी राहीन – Happy Fathers Day
8. सर्व आनंद आणि प्रेम तुम्हाला मिळो याच सदिच्छा – Happy Fathers Day
9. नेहमी मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबा – Happy Fathers Day
10. माझ्या आयुष्यातला सर्वात पहिला आणि शेवटचा हिरो तुम्हीच असाल बाबा – Happy Fathers Day
Fathers Day Quotes In Marathi From Daughter | मुलीकडून बाबांसाठी फादर्स डे कोट्स
मुली या प्रत्येक वडिलांसाठी खास असतात आणि मुलीसाठीही वडील म्हणजे सर्व काही असते. एकवेळ इतर कोणालाही दुखावलेले मुलीला चालते पण बाबांसाठीची जागा ही कायम अढळ असते. लाडक्या बाबांना पाठवा ‘फादर्स डे’ च्या कविता
1. जाताना मुलगी सासरी
धाय मोकलून रडत असते
पण माझ्या चिऊला सुखात ठेवा
असं हात जोडून सांगणारा असतो तो बाप
2. स्वप्नं तर माझी, पण ती साकारण्याची ताकद दिली तुम्ही
खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी, तुमच्याही पाठिशी मी असाच राहीन खंबीरपणे उभा
फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा
3. मी कुठेही गेले, कितीही लांब गेले तरी माझ्यासाठी पहिल्या क्रमांकावर कायम बाबाच असतील
4. प्रत्येक मुलगी तिच्या पतीची राणी असू शकते
परंतु तिच्या वडिलांची ती राजकुमारीच असते, पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
5. मुलगी असले तरीही मला योग्य दिशा दाखवलीत आणि कायम माझा आदर केलात याबद्दल धन्यवाद बाबा – Happy Fathers Day In Marathi
6. इतर कोणाहीपेक्षा तुम्ही दाखविलेला विश्वास मला अधिक मोठं करतो
7. मुलगी झाली असं म्हणून तोंड फिरणाऱ्यांना दिली तुम्ही चपराक
कायम दिली मला साथ
कधीही न फिटणारं ऋण आहे तुमचं माझ्यावर – Happy Fathers Day In Marathi
8. इतर कोणाहीसाठी कशीही असले तरीही
माझ्या बाबांसाठी मात्र मी त्यांची परीच आहे
9. आयुष्यात जोडीदार म्हणून कदाचित राजपुत्र सापडेल, पण संपूर्ण साम्राज्य लुटविणारा पिता मिळणं कठीणच
10. हाताच्या फोडाप्रमाणे जपणारी एकच व्यक्ती ती म्हणजे बाबा
वाचा मुलगी आणि वडिलांसाठी खास शुभेच्छा – Marathi Quotes On Father And Daughter
Fathers Day Caption In Marathi | फादर्स डे कॅप्शन मराठीतून
हल्ली कोणत्याही डे च्या दिवशी स्टेटस, फोटोला कॅप्शन हे सर्व महत्वाचे झाले आहे. सोशल मीडियावर कधी कधी कॅप्शन काय द्यायची, भावना काय मांडायच्या कळत नाहीत. अशावेळी या मराठी कॅप्शन तुम्हाला उपयोगी पडतील
1. आयुष्यातील सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा
2. देवाने सर्व काही दिलं आहे, अजून काही मागावं वाटत नाही. फक्त माझ्या बाबांना नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना
3. कोणत्याही शब्दामध्ये इतकी ताकद नाही जो माझ्या बाबांच्या प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकतो
4. वडिलांविना माझे जीवन हे निर्जन आहे
5. बाप हा असा व्यक्ती आहे जो आधार असूनही कधी जाणवू देत नाही. त्याला आपण चुकीचा समजतो पण वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं.
6. पितृ देवो भव
7. चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप असतो…
Father’s Day च्या शुभेच्छा!
8. मी कधी मोठी झालेच तर त्यात केवळ तुमचा महत्वाचा वाटा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे
9. माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही वेळात वेळ काढून कायम कर्तव्य पूर्ण केले
तुमच्यासाठी मी माझा जन्म वाहीन हे माझं वचन आहे तुम्हाला – happy fathers day
10. कितीही बोलला तरीही बापाचं काळीज ते, आपल्या काळजीसाठीच सर्व काही असतं
पुढे वाचा –