लग्न ठरल्यावर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नाची शॉपिंग (Lagnachi Shopping) प्रत्येक वधू आणि वराचे त्यांच्या लग्नसोहळ्यातील लुक आणि इतर गोष्टींबाबत अनेक स्वप्नं असतात. भारतात लग्नसोहळा हा कमीत कमी आठवडाभर चालणारा एक सोहळा आहे. साखडपुडा, मेंदी, हळद, संगीत, लग्नाच्या दिवशी असणारे विविध विधी आणि लग्नाचं रिसेप्शन, पूजा अशा अनेक कार्यक्रमांसाठी निरनिराळे कपडे आणि दागिने परिधान केले जातात. बस्ता बांधणं अथवा लग्नासाठी कपडे (Lagnache Kapde) खरेदी करणं हा तर मोठा कार्यक्रमच असतो. लग्नकार्यात पूर्वतयारीसाठी टिप्स (Wedding Planning Tips In Marathi)
वधू आणि वर या सर्व सोहळ्यात सेंटर ऑफ एटरॅक्शन असल्यामुळे त्यांचा लुक लग्नात सर्वात आकर्षक आणि शोभेल असा असणे गरजेचं असतं. त्यामुळे वधू-वरांचे लग्नाचे कपडे (Lagnasathi kapde) खरेदी करण्यासाठी अनेक मार्केट धुंडाळली जातात. महाराष्ट्रात तर लग्नाची खरेदी लिस्ट Lagnachi kharedi list, लग्नाची भांडी लिस्ट अशी यादी लग्नापूर्वी रितसर तयार केली जाते. थोडक्यात काय तर लग्नाची शॉपिंग करण्यापूर्वी त्याचं नियोजन करणं महत्त्वाचं असतं. मग तुम्ही देखील तुमच्या लग्नाची खरेदी करायला सुरूवात केली असेल तर या गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.
लग्नाचे कपडे बजेट – Lagnache Kapde Budget
कोणतीही शॉपिंग सुरू करण्यापूर्वी बजेट ठरवणं अतिशय महत्त्वाचं आहे. लग्नात वधू आणि वर अशा दोघांच्या खरेदीचं वेगवेगळं बजेट ठरवता येतं. शिवाय यासोबतच तुम्ही तुमच्या लग्नाचे कपडे, दागदागिने, मेकअप, फुटवेअर, सौंदर्य प्रसाधने अशा गोष्टींसाठी निरनिराळं बजेट ठरवायला हवं. कारण लग्न म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी खर्च हा आलाच. त्यामुळे एकदा तुमच्या लग्नाच्या संपूर्ण खर्चाचं बजेट ठरलं की लग्नाच्या शॉपिंग (Lagnachi Shopping)ला सुरुवात करण्यास सुरुवात करायला काहीच हरकत नाही. शिवाय कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराला आपलं बजेट सांगितलं तर ते त्याच रेंजमधील वस्तू ते तुम्हाला दाखवतात. ज्यामुळे विनाकारण बजेट वाढत नाही. लग्नात फक्त वधू आणि वरांनाच नाही तर कुटुंबिय, जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी असं अनेकांना कपडे घ्यावे लागतात. म्हणूनच लग्नाच्या कपड्यांसाठी ठराविक बजेट ठरवायलाच हवं. कमी खर्चात लग्न करण्यासाठी टिप्स (How To Plan A Simple Wedding In Marathi)
सेलिब्रिटी स्टाईल – Celebrity Wedding Style
लग्नात आपण खास दिसावं असं प्रत्येक वधू आणि वराला वाटत असतं. कारण लग्नसोहळा हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात स्पेशल दिवस असतो. या दिवशी त्यांना सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. आपल्याकडे नवरदेव, नववधू असं म्हणण्याची पद्धत आहे. सहाजिकच या दिवशी त्यांना एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे वागवलं जातं. म्हणून या खास दिवशी एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे दिसावं असं कुणालाही वाटू शकतं. आजकाल लग्नात सेलिब्रेटी वेडिंग स्टाईल फॉलो करण्याचा ट्रेंड आहे. म्हणून सेलिब्रेटींच्या लग्नात त्यांनी केलेली स्टाईल लग्नसमारंभात वधू आणि वर फॉलो करतात. जर तुमचं लग्न ठरलं असेल तर या ट्रेंडनुसार कोणत्या सेलिब्रेटीची स्टाईल फॉलो केली जात आहे. यावर थोडा रिसर्च करा आणि मगच लग्नाच्या शॉपिंगला सुरुवात करा. म्हणूनच तुमच्यासाठी खास लग्नसराईसाठी साड्यांचे प्रकार (Marathi Wedding Sarees Shalu)
ऋतूमानानुसार शॉपिंग – Consider The Season
दिवाळीला तुळशीचं लग्न लागलं की लग्नसराईला सुरूवात होते. पुढे अगदी जून, जुलैपर्यंतदेखील लग्नाचे मुहूर्त असू शकतात. त्यामुळे तुमचं लग्न हिवाळा, उन्हाळा की पावसाळा कोणत्या ऋतूत आहे त्याचा विचार खरेदी करताना जरूर करा. कारण जर तुम्ही उन्हाळ्यात लग्न करणार असाल आणि त्याची खरेदी हिवाळ्यापासून सुरू केली असेल तर तुम्हाला लग्नाची खरेदी करताना उन्हाळ्यातील उकाडा आणि गर्मीचा विचार करता आला पाहिजे. शिवाय तुमचं लग्न दुपारी आहे की संध्याकाळी, ए.सी बॅन्क्वॅटमध्ये आहे की लॉनमध्ये, हॉटेलमध्ये आहे की डेस्टिनेशन वेडिंग आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मगच खरेदीला सुरूवात करा. कारण त्यानुसार कपडे खरेदी केले तरच तुम्ही लग्नाच्या कपड्यांमध्ये आकर्षक आणि सुंदर दिसाल. लग्नाची शॉपिंग करताना इतर बाबतीतही हीच गोष्ट लक्षात ठेवावी. लग्नसोहळ्यासाठी आकर्षक मंडप डिझाईन्स (Mandap Designs For Wedding In Marathi) तुम्ही पाहिलेत का ?
लग्नासाठी कपडे शोधमोहीम – Do Enough Research
कोणतीही गोष्ट जेव्हा आपण पेपरवर लिहून त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून करतो तेव्हा ती नेहमी परफेक्ट होते. यासाठी लग्नाच्या शॉपिंगसाठी नीट प्लॅनिंग करा. तुमचा सोहळा किती दिवस चालणार आहे, त्यामध्ये किती विधी कधी आणि कुठे होणार आहेत, प्रत्येक विधीमध्ये तुम्ही कोणता पेहराव करणार आहात, तुम्हा दोघांचा पेहराव एकमेकांना मॅच होत आहे का, कोणत्या पेहरावासोबत कोणते दागदागिने तुम्ही वापरणार आहात, प्रत्येक पेहरावासोबत केला जाणारा मेकअप, तुमच्या लग्नसोहळ्या दरम्यान असलेले नवे ट्रेंड, तुमच्या लग्नाची थीम, तुमच्या कपडे आणि मेकअपची रंगसंगती या सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करा. या सर्व गोष्टी नोंद केलेल्या असल्यामुळे तुम्हाला खरेदी करण्यासाठी मदतच होऊ शकते. यासोबतच तुम्ही ज्या ठिकाणी खरेदी करत आहात त्या शॉपिंग सेंटर्स अथवा मार्केटची लिस्ट, त्यांच्या कपड्यांचा रेट, खरेदीसाठी लागणारा वेळ या सर्व गोष्टींचादेखील आधीच विचार करा. लग्नासाठी खरेदी करताना अशी शोधमोहीम आधीच करून ठेवल्यामुळे केल्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला बजेटमध्ये खरेदी करणं सोपे जाईल. शिवाय नीट प्लॅनिंग केल्यामुळे तुम्हाला खरेदी करताना चांगली सवलत देखील मिळू शकते. यासाठी शॉपिंग करण्याआधी मार्केट आधी फिरून घ्या. कारण तुम्ही खरेदी केली आणि नंतर तुम्हाला दुसरी एखादी गोष्ट आवडली तर तुम्ही निराश होऊ शकता. मनाप्रमाणे खरेदी करण्यासाठी आधी सर्व मार्केट फिरून घ्या. आवडलेले कपडे निवडा आणि मनसोक्त शॉपिंग करा.
लग्नाची शॉपिंग – Lagnachi Shopping
लग्नसोहळा जरी एक दिवस अथवा आठवडाभर चालणारा कार्यक्रम असला तरी लग्नाची शॉपिंग (lagnachi Shopping) ही एक फार वेळकाढू गोष्ट आहे. म्हणूनच लग्न ठरल्यावर खरेदीला कमीत कमी सहा महिने आधीपासूनच सुरुवात करायला हवी. त्यात मुलींना खरेदीला नेहमीच वेळ लागतो. शिवाय तुम्हाला प्रत्येक विधीसाठी साडी, लेंहगा, ड्रेस त्यावर मॅचिंग दागदागिने, मेकअप साहित्य, पर्स, फुटवेअर, इनरवेअर अशा अनेक गोष्टी खरेदी करायच्या आहेत. त्यामुळे यासाठी लागणारा वेळ आधीच ठरवा. लग्नाच्या इतर तयारीमध्ये लग्नाचे कपडे (Lagnache Kapde) खरेदीचं प्लॅनिंग मुळीच करू नका. कधी कधी तुम्हाला इतरांच्या आवडीनुसार कपडे वापरणं आवडत नसेल तर लग्नसोहळ्याच्या खरेदीमध्ये तुम्हाला तडजोड करणं कठीण जाऊ शकतं. यासाठी काही गोष्टींची खरेदी आधीपासूनच करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला लग्नासारख्या आनंदाच्या क्षणी तडजोड करावी लागणार नाही. मात्र असं असलं तरी अगदी फार आधी खरेदी होणार नाही याचीदेखील काळजी घ्या. कारण फॅशन आणि ट्रेंड सतत बदलत असतात. शिवाय तुमच्या बॉडीशेपनुसार खरेदी करताना तुमचा बॉडीशेप बदलणार नाही याची दक्षतादेखील तुम्हालाच ठेवायची आहे. अनेकदा मुली लग्नासाठी वजन कमी करण्याचा विचार करतात. मात्र लग्नाची शॉपिंग तुम्ही आधीच सुरू केलेली असते. म्हणूनच खरेदी करण्यापूर्वी तुम्ही किती वजन कमी करणार आहात आणि तुमचा बॉडीशेप कसा आहे याचा विचार करून खरेदी करा. नाहीतर ऐन लग्नाच्यावेळी तुम्हाला कपड्यांच्या फिटींगची समस्या होऊ शकते. तुम्हाला ट्रेंडनुसार खरेदी करायची असेल तर महत्वाची खरेदी दोन महिने आधी करा आणि इतर गोष्टी तुम्ही चार ते पाच महिने आधापासून खरेदी करून ठेऊ शकता.
लग्नाची खरेदी लिस्ट – Lagnachi Kharedi List
लग्नाची खरेदी करताना सर्वात महत्वाचं आहे लग्नाच्या खरेदीची लिस्ट बनवणं… लग्नाची खरेदी लिस्ट, Lagnachi Kharedi List, लग्नातील दागिन्यांची लिस्ट, लग्नातील आमंत्रिताची लिस्ट, त्यानुसार द्यायच्या भेटवस्तू, लग्नातील इतर खरेदीची लिस्ट, लग्नाची भांडी लिस्ट अशा प्रत्येक खेरदीची लिस्ट तयाक असेल तर तुम्हाला कोणतीही खरेदी करणं सोपं जाईल. शिवाय चेकलिस्ट तयार असेल तर कोणती खरेदी झाली आहे आणि अजून कोणती खरेदी करणं अजून बाकी आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. लग्नातील खरेदी आणि कामं कधीच न संपणारी असली तरी अशी लिस्ट बनवली तर तुमचा वेळ आणि पैसा यात नक्कीच वाचेल.
जास्त कपडे ट्राय करू नका – Don’t Try Too Many Outfits
काही लोकांना एकाच वेळी खूप कपडे ट्राय करण्याची सवय असते. जर तुम्ही शोरूममध्ये अनेक साड्या, लेंहगा अथवा इतर आऊटफिट ट्राय करत बसला तर तुमचा वेळ वाया जाईल. निरनिराळे कपडे ट्राय करून तुम्ही पुरते थकून जाल. सर्वच कपडे ट्राय केल्यामुळे कदाचित नंतर तुम्ही कन्फ्युज व्हाल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेता येणार नाही. म्हणूनच तुम्हाला जो रंग आणि प्रकार खूप आवडेल असे मोजकेच कपडे आधी निवडा आणि त्यातील तुम्हाला खूपच आवडले असतील असे कपडे ट्राय करा. ज्यामुळे खरेदी करताना तुम्ही थकणार नाही. नेळ आणि शारीरिक कष्ट कमी लागले तर तुम्ही आणखी अनेक ठिकाणी फिरून तुमच्या लग्नाचे कपडे (Lagnache Kapde) खरेदी करू शकता.
आरामदायक फुटवेअर निवडा – Choose Comfortable Footwear
वधू वरांचे लग्नाचे कपडे (Lagnasathi kapde) खरेदी करणं हे जितकं महत्त्वाचं काम असतं तितकंच त्यावर मॅचिंग फुटवेअर खरेदी करणं असू शकतं. कारण लग्नातील कपडे नेहमीच भरजरी आणि भडक असतात. त्यामुळे त्याच्यावर मॅच होण्यासाठी हिल्स आणि हेवी वर्क असलेले फुटवेअर निवडले जातात. जर तुम्ही अशा प्रकारचे फुटवेअर निवडणार असाल तर ते आरामदायक असतील याची जरूर काळजी घ्या. कारण लग्नाच्या दिवशी विधी झाल्यावर रिसेप्शनसाठी अथवा गृहप्रवेशासाठी तुम्हाला बराच काळ उभं राहावं लागू शकतं. अशा वेळी तुमचे फुटवेअर जितके आरामदायक असतील तितकं तुम्हाला आनंदी राहणं सोपं जाईल. त्यामुळे फुटवेअर स्टायलिश असण्यासोबत आरामदायक असतील याची काळजी घ्या.
मेकअप किट तयार ठेवा- Have A Makeup Kit Ready
साखडपुडा, लग्नातील विधींसाठी तुम्ही प्रोफेशनल ब्रायडल मेकअप करून घेण्याचा विचार करत आहात का? मात्र लग्नानंतर काही दिवस तुम्हाला विविध कार्यक्रमांसाठी स्वतःचा मेकअप करता येणं गरजेचं आहे. लग्नानंतर काही दिवस तुमच्या नववधूच्या लुकला तुम्हालाच मेंटनेन करावं लागणार आहे. म्हणूनच एक छानसं मेकअप किट आणि त्यात बेसिक मेकअपचं साहित्य जरूर खरेदी करा. या मेकअप किटमध्ये तुमच्या स्कीनला साजेसं फाउंडेशन, बीबी क्रीम, सीसी क्रीम, कॉम्पॅक्ट, ब्रायडल शेड असलेल्या लिपस्टिक्स, आयशॅडो, काजळ, आय लायनर, मस्कारा, हायलायटर, परफ्युम्स, बॉबी पिन्स, हेअर पिन्स, रूमाल, टीश्यू पेपर, मेकअप रिमूव्हर, नेलपेंट, नेलपेंट रिमूव्हर, टिकल्यांचे प्रकार, सिंदूर आणि स्कीन केअर साठी क्लिंझर, फेसवॉश, फेसस्क्रब, मॉइस्चराइझर, सनस्क्रीन, लिपबाम, अंडर आय क्रीम असेल याची काळजी घ्या. लग्नाआधी काही दिवस या सर्व वस्तू तुमच्या मेकअप किटसाठी खरेदी करा. नवरीच्या मेकअप किटची खास यादी | Navricha Makeup Kit List लग्नाआधी तुमच्याजवळ असायलाच हवी.
लग्नाचे कपडे ठरवण्याआधी पाहा हे कपल लुक्स – Celebrity Couple Wedding Looks
लग्नात कसा लुक करायचा, यासाठी सेलिब्रिटी नेहमीच प्रेरणा देत असतात. त्यामुळे तुम्ही देखील या काही लुकमधून तुमच्या लग्नाचा पेहराव कसा असेल ते ठरवू शकता.
आलिया भट आणि रणबीर कपूर
या वर्षीच 14 एप्रिलला रणबीर आणि आलियाचं थाटामाटात लग्न झालं. लग्नाचा जास्त गाजावाजा न करता विधीपूर्वक लग्न पार पडलं होतं. लग्नासाठी ठरवलेल्या पीच आणि पेस्टल थीमनुसार जोडप्याचा पेहराव होता. आलियाने आयव्हरी रंगाची सब्यसाची साडी आणि मनिष मल्होत्राने खास डिझाइन केलेला दुपट्टा परिधान केला होता. तर त्याला साजेसा पेहराव रणबीप कपूरने केला होता. विशेष म्हणजे आलियाने परिधान केलेले दागिने मात्र या लग्नानंतर खूप ट्रेंडमध्ये आहेत. आठ अक्षराचा वापर असलेलं मंगळसूत्र, हिऱ्याची अंगठी आणि तिने केसात माळलेला युनिक मांग टिका त्यानंतर अनेक लग्नात दिसून आला.
कतरिना कैफ आणि विकी कौशल
बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी डिसेंबर 2021 ला राजस्थानमधील सवाई माधवपूरमध्ये लग्न केलं, या विवाहसोहळ्यात पाहुणेमंडळी कमी असली तरी शाही थाटमाट होता. या लग्नासाठी कतरिनाने सब्यसाचीने डिझाइन केलेला लाल रंगाचा खास लेहंगा परिधान केला होता, केसात गजरा, मांगटिका, नथनी, हातात बांगड्या यामुळे तिचं नववधूचं रूप अधिक खुलून आलं होतं. विकीने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली होती.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन
मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैनदेखील लग्नाच्या बंधनात अडकले. हा लग्न सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आणि आठवडाभर सुरू होता. या लग्नसोहळ्यासाठी अंकिताने प्रत्येक कार्यक्रमासाठी खास लुक केला होता. तिचा संगीत, मेंदी आणि लग्न, रिसेप्शन असा सर्व कार्यक्रमातील लुक भावी नववधूंना प्रेरणा देणारा आहे.
ह्रता दुर्गुळे आणि प्रतीक शाह
या वर्षी मे महिन्यात मराठी अभिनेत्री ह्रता दुर्गुळेने तिचा बॉयफ्रेंड दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्न केलं. फुलपाखरू आणि मन उडू उडू झालं या मालिकेतून ह्रता महाराष्ट्रातील प्रत्येक घरात लोकप्रिय झाली. ह्रताने लग्नात खास पारंपरिक पिवळ्या साडीतील लुक केला होता. पिवळ्या रंगाची कांजिवरम साडी त्यावर आणि हिरव्या कंच पैठणीचा शेला पांघरलेला ह्रताचा लुक दिलखेचक होता.
शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी
यावर्षी मे महिन्यात आणखी एक मराठमोळं सेलिब्रेटी कपल लग्नाच्या बेडीत अडकलं ते म्हणजे शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णी. लग्नासाठी शिवानी आणि विराजस यांनी दाक्षिणात्य पेहराव केला होता. शिवानीने नेसलेली लाल रंगाची कांजिवरम तिच्यावर अधिकच खुलून दिसत होती. विराजसने त्याला साजेसा सदरा आणि धोतर परिधान केलं होतं. लग्नाची थीम साऊथ इंडियन असल्यामुळे कुटुंबिय आणि नातेवाईंकांनीही अशाच प्रकारचे आऊटफिट घातले होते.
लग्नाची खरेदी आणि निवडक प्रश्न – FAQs
प्रश्न – लग्नाची शॉपिंग किती आधीपासून सुरू करावी?
उत्तर – तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या लग्नाच्या शॉपिंगला सुरूवात करू शकता. लग्नाची तारीख ठरल्यावर आधी सांगितल्याप्रमाणे शॉपिंगचे व्यवस्थित नियोजन करा. तुम्ही नोकरी अथवा व्यवसाय करत असाल तर विकऐंडला तुम्हाला शॉपिंगसाठी वेळ काढावा लागतो. म्हणूनच कमीत कमी चार ते पाच महिने आधी शॉपिंगला सुरूवात करा. जर अचानक लग्न ठरलं असेल तर सुटी घेऊन तुम्हाला शॉपिंग करावी लागेल. यासाठी व्यवस्थित नियोजन करा ज्यामुळे तुमची फार दगदग होणार नाही.
प्रश्न – लग्नासाठी शॉपिंगचं बजेट कसं ठरवावं?
उत्तर – लग्न ही आयुष्यात एकदाच होणारी आणि महत्त्वाची गोष्ट असली तरी लग्नाच्या शॉपिंगवर वायफळ खर्च होणार नाही याची काळजी घ्या. कारण ते पैसे तुम्हाला इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरता येऊ शकतात. यासाठी लग्न आणि लग्नाच्या खरेदीचं बजेट ठरवा. लग्नाचं बजेट उगाचच वाढवू नका. कारण कमी बजेटमध्येदेखील चांगली खरेदी नक्कीच करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला चांगल्या रेटमध्ये कोणत्या मार्केटमध्ये कोणती खरेदी करता येईल याचा रिसर्च करावा लागेल.
प्रश्न – लग्नासाठी शॉपिंग कुठे करावी?
उत्तर – मुंबई, पुणे आणि ठाणे या ठिकाणी अनेक वेडिंग शॉप आहेत. जिथे तुम्ही नक्कीच लग्नाची खरेदी करू शकता. या शिवाय पैठणी खरेदी करण्यासाठी तुम्ही औरंगाबाद पैठण अथवा येवलाला जाऊ शकता. कांचिपुरम साड्या घेण्यासाठी साऊथला जाणं बेस्ट ठरेल. बनारसी साड्या बनारसमध्ये चांगल्या मिळतात.
Conclusion – यंदा तुमच्या घरातही कर्तव्य असेल आणि लवकरच सनईचे सूर घुमणार असतील तर त्याआधी तुम्हाला लग्नाची शॉपिंग (Lagnachi Shopping) करायला सुरुवात करायला हवी. यासाठीच आम्ही तुम्हाला लग्नाची खरेदी (Lagnachi Shopping), लग्नासाठी कपडे (Lagnache Kapde), लग्नाचे कपडे (Lagnasathi kapde), लग्नाची खरेदी लिस्ट Lagnachi kharedi list, लग्नाची भांडी लिस्टबाबत दिलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, हे आम्हाला जरूर कळवा.