ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
Year Ender: 2019 मधील सर्वात फिट ठरल्या या अभिनेत्री

Year Ender: 2019 मधील सर्वात फिट ठरल्या या अभिनेत्री

बॉलीवूड दिवा केवळ आपल्या फॅशनसाठीच नाही तर आपल्या फिटनेससाठीही प्रसिद्ध असतात. यापैकी बऱ्याच अभिनेत्री या आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक फिटनेस व्हिडिओदेखील पोस्ट करत असतात. अभिनयासह आपल्या आरोग्याचाही व्यवस्थित काळजी घेतात आणि सामान्य माणसांनीही आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घ्यावी असं या अभिनेत्रींना वाटत असतं. जिममध्ये तासनतास घाम गाळणाऱ्या या अभिनेत्री योगादेखील करतात. तसंच आपल्या डाएटचीदेखील काळजी घेतात. तुम्हालाही जर या अभिनेत्रींना फॉलो करत फिट राहायचं असेल तर तुम्हीदेखील या अभिनेत्रींचा आदर्श ठेवू शकता. यावर्षी 2019 मध्ये कतरिना कैफपासून ते शिल्पा शेट्टी, मलायका अरोरा या सगळ्या दिवा आहेत त्यांनी  आपल्या वर्कआऊट आणि योगाचे अनेक फोटोज आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. त्यांचे हे व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांनाही खूपच आवडले आहेत. नवं वर्ष येत आहे आणि आता आपण पाहूया यावर्षी कोणत्या अभिनेत्री ठरल्या आहेत सर्वात जास्त फिट. 

कतरिना कैफ

कतरिना कैफ आपल्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. काहीही असो कतरिना जिममध्ये ट्रेनिंग घेणं सोडत नाही. जिमसंदर्भात ती कोणतीही तडजोड करत नाही. जिममध्ये जाऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणं कतरिनाला प्रचंड आवडतं आणि ती नेहमीच त्याचे व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवरही पोस्ट करत असते. इतकंच नाही ती आपल्या बरोबरील अन्य अभिनेत्री जशा आलिया भट, परिणिती चोप्रा यांनादेखील जिममध्ये जाऊन ट्रेनिंग घेण्यासाठी प्रोत्साहित करताना अनेकदा दिसली आहे. त्यामुळे यावर्षीची सर्वात फिट अभिनेत्री म्हणून कतरिनाचं नाव सर्वात पहिले घेण्यात येत आहे. आपल्याबरोबरच इतरांनीही फिट असायला हवं हे कतरिनाने नेहमीच दाखवून दिलं आहे. तिचे बरेच व्हिडिओ तिची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाबरोबर असतात आणि कतरिना ते नेहमी पोस्ट करते.  केवळ सामान्य माणसांसाठीच नाही तर अगदी अनेक बॉलीवूड अभिनेत्रींसाठीही कतरिना फिटनेससाठी प्रेरणा आहे. 

तुमच्या मोबाईलमध्ये हवीत ही 2019ची पावर पॅक गाणी

मलायका अरोरा

मलायका 45 व्या वर्षीदेखील अगदी फिट आहे. मलायका अरोराचे नेहमीच जिममधून येताना अथवा योगाचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. तिला पाहून ती 18 वर्षाच्या मुलाची आई आहे असं कोणीही म्हणणार नाही. रोज नियमित स्वरुपात जिम आणि योगा करून मलायका अरोराने स्वतःला फिट ठेवलं आहे. तसंच ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेक व्यायामाचे व्हिडिओ पोस्ट करत असते. इतकंच नाही लोकांनाही फिटनेसचं महत्त्व कळावं म्हणून मलायकाने स्वतःचं फिटनेस सेंटरही सुरू केलं आहे. मलायका फिट असल्यामुळेच तिचं वय दिसून येत नाही. याशिवाय फिट राहिल्यास आरोग्य चांगलं राहातं यावर मलायकाचा पूर्ण विश्वास असून मलायका कधीही वर्कआऊट चुकवत नाही. 

ADVERTISEMENT

2019 संपायच्या आत पाहा हे बेस्ट चित्रपट

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टी बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती स्वतः तर फिट आहेच त्याशिवाय ती आपल्यासह असणाऱ्या लोकांनाही फिट राहण्यासाठी प्रेरणा देते. शिल्पाचे अनेक योगाचे व्हिडिओ आहेत. शिल्पा केवळ व्यायामच नाही तर योगासन करण्यासाठीही प्राधान्य देते. ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असते. शिल्पा ही फिटनेस फ्रिक असून ती बऱ्याच जणींसाठी प्रेरणाही आहे. तिचे व्हिडिओ बघून अनेक जण फिटनेस फॉलो करत असतात. 

YEAR ENDER : बॉलीवूडमधल्या या जोड्यांचं झालं ब्रेकअप

 

ADVERTISEMENT

करिना कपूर खान

करिना कपूर खान ही बॉलीवूडची हॉटेस्ट आई असं म्हटलं जातं.  करिनाने तैमूरच्या जन्मानंतर काही महिन्यातच आपलं वजन कमी करत आपण फिटनेसलाही महत्त्व देत असल्याचं दाखवून दिलं. बेबो आपल्या डाएटची खास काळजी घेते. न्यूट्रिशन अँड एक्सरसाईज स्पेशालिस्ट ऋतुजा दिवेकरने आखून दिलेलं डाएट फॉलो करत नेहमीच करिना कपूर खानने फिटनेसबाबतची जागरूकता दाखवून दिली आहे. तसंच गरोदरपणानंतर पुन्हा एकदा आपण योग्य फिटनेस फॉलो केल्यास, योग्य आकारात राहू शकतो हेदखील दाखवून दिलं आहे. 

Year Ender : या कलाकारांनी घेतला यंदा जगाचा निरोप

दिशा पाटनी

दिशा पाटनीदेखील कथित बॉयफ्रेंड टायगर श्रॉफप्रमाणेच फिटनेस फ्रीक आहे. बरेचदा दिशाचे अनेक जिममधील व्हिडिओ व्हायरल होत असतात. तसंच ती आपल्या सोशल मीडियावर आपली परफेक्ट फिट बॉडी नेहमीच फ्लॉन्ट करत असते. योग्य फिटनेस ठेवत दिशाने आपलं शरीर योग्य आकारात ठेवलं आहे. त्याशिवाय दिशा नेहमीच आपले फिटनेसचे व्हिडिओदेखील शेअर करत लोकांना फिटनेसबद्दल जागरूक करत असते. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

ADVERTISEMENT
19 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT