तुमच्या मोबाईलमध्ये हवीत ही 2019 ची पावर पॅक गाणी

तुमच्या मोबाईलमध्ये हवीत ही 2019 ची पावर पॅक गाणी

गाणं कोणतंही असो तुमचा मूड चांगला करण्यासाठी ते कधीही कामी येतात. तुमचा खराब मूड चांगला करण्यासाठी आणि तुमच्यामधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी गाणी चांगलीच उपयोगी येतात. तुम्हालाही गाणी ऐकायला आवडत असतील. तर आम्ही तुमच्यासाठी गाण्याची एक यादीच तयार केली आहे. ही गाणी आहेत 2019 मधील पावर पॅक गाणी… ही गाणी ऐकल्यानंतर तुमचा मूड चांगला होणारच ही खात्री आम्हाला आहे. जाणून घेऊया कोणती गाणी तुमच्या फोनमध्ये असायलाच हवी.

ही Remix गाणी एकेकाळी होती फारच प्रसिद्ध, तुम्हाला ही गाणी आठवतात का

तुमच्यासाठी ही पावर पॅक 20 गाणी

  अपना टाईम आएगा 

तुमचे हे वर्ष फार चांगले गेले नसेल तरी लक्षात ठेवा येणारा काळ हा तुमचा आहे. ‘गली बॉय’ चित्रपटात रणवीर सिंहवर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. कितीही अपयश आलं तरी आपला चांगला काळ येणारच फक्त मेहनत करायला विसरु नका हे सांगणार हे गाणं तुम्ही नक्की ऐका.

शैतान का साला 

‘हाऊसफुल्ल 4’ चित्रपटातील हे गाणं एकदम तुफान आहे. कारण हे गाणं ऐकल्यानंतर तुमचा मूड चांगला होणारच. हे गाणं अक्षय कुमारवर चित्रित करण्यात आलं अलं तरी हे गाणं एकदम मूड बदलणारे आहे.

जय जय शिवशंकर  

तुमचा मूड एकदम भयंकर करायचा आहे तर मग तुम्ही वॉर या चित्रपटातील जय जय शिवशंकर हे गाणं ऐका. एका झटक्यात तुमचा मूड हे गाणं एकदम चांगला करते. मस्त प्रवासात असाल बसायला मिळालं नसेल तर काय झालं मस्त हे गाणं तुमचा मूड एकदम झक्कास करुन टाकेल.

शहर की लडकी 

सोनाक्षी सिन्हचा खानदानी शफाखाना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच चालला नाही. पण या चित्रपटातील बादशाहने गायलेलं ‘शहर की लडकी’ हे गाणं अनेकांना आवडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे गाणं तुमच्या फोनमध्ये नक्कीच ठेवा. 

तुझे कितना चाहने लगे हम 

यंदा ज्या चित्रपटाची जास्त चर्चा झाली असेल तो चित्रपट म्हणजे शाहीद कपूरचा कबीर सिंह हा चित्रपट. या चित्रपटाने सगळ्याच प्रेमी युगुलांना वेड लावले. तुमच्याही रिलेशनशीपमध्ये अशी वेळ येते की, तुम्हाला तुमचे प्रेम दाखवण्याची गरज असते. अशावेळी तुम्ही हे रोमँटीक गाणं ऐकू शकता. 

 हॉली हॉली 

अजय देवगण, तब्बू यांच्या ‘ दे दे प्यार दे’ या चित्रपटातील हे गाणं फुल टू पार्टी साँग आहे. हे गाणं पार्टी साँग असलं तरी तितकंच कानाला आनंद देणारं आहे.

एक चुम्मा 

हाऊसफुल्ल 4 हा संपूर्ण चित्रपटच फुल टू कॉमेडी होता. या चित्रपटातील हे एक हॅपनिंग साँग आहे. तुमच्या प्रवासात तुमचा मूड लाईट करणारं असं हे गाणं असेल. 

मेरे सोनेया 

कबीर सिंह या चित्रपटातील हे आणखी एक गाणं फारच प्रसिद्ध आहे. हे गाणंही फुल ऑन रोमँटीक असून एखादी गोष्ट मनापासून हवी असेल तर ती तुम्हाला मिळतेच. प्रेम ही तसेच आहे. तुमचे प्रेम खरे असेल तर तुम्हाला ते मिळेलच.   तुमच्यामध्ये सकारात्मक उर्जा भरणारे हे गाणं आहे. 

कोका कोला तू 

कार्तिक आर्यन  हल्ली सगळ्याच तरुणींचा फेव्हरेट आहे. त्याच्या लुका छुपी चित्रपटातील हे गाणं फारच प्रसिद्ध आहे. पार्टीसाठी हे गाणं बेस्ट आहे.

दिल ही तो है 

स्काय इज पिंक या चित्रपटातील हे रोमँटीक गाणं तुम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. हे गाणं खूप साधं सोपं आणि रिफ्रेशिंग आहे.

स्लो मोशन 

सलमान वर्षातून एक ते दोन चित्रपट करत असला तरी त्याची गाणं एकदम झक्कास असतात.स्लो मोशन हे गाणं तुम्हाला मस्त पार्टी फिल देऊ शकेल. त्यामुळे तुम्हाला हे गाणं तुमच्या फोनमध्ये ठेवायलाच हवे. 

फर्स्ट क्लास 

कलंक हा चित्रपट फार चालला नसला तरी त्यातील गाणी ही अनेकांना आवडणारी होती. या चित्रपटातील इतर गाण्यांना थोडी पिरियॉडीक झलक असली तरी हे गाणं एकदम फर्स्ट क्लासच वाटलं. वरुण धवनने या गाण्यामध्ये फारच धम्माल केली होती. उडत्या चालीचे हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल. 

पल पल दिल के पास 

धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओलच्या ‘पल पल दिल के पास’ चित्रपटातील हे गाणं आहे. धर्मेंद्र यांचं एक जुनं गाणं  पल पल दिल के पास या गाण्याला थोडा रिमिक्स टच देण्यात आला आहे.

वे माही 
केसरी या चित्रपटातील हे गाणं तुम्हाला नक्की आवडेल. हे गाणं अर्जित सिंहने गायलं असून त्याचं हे गाणं ऐकल्यानंतर तुमच्या जवळच्या व्यक्तीची आठवण आल्यावाचून राहणार नाही. 

तेरे दिल का टेलिफोन बजता

यंदाचे वर्ष आयुषमानसाठी चांगले होते. त्याने या वर्षात अनेक चांगले चित्रपट केले आहेत. त्याचा ड्रिम गर्ल हा चित्रपट चांगला चालला त्यातील हे गाणं. जर तुम्ही लग्नासाठी चांगली गाणी शोधत असाल तर तुम्हाला हे गाणं चालू शकेल. 

दिल की अखियो से गोली मारे 

रवीना टंडन आणि गोविंदा यांचं प्रसिद्ध गाणं दिल की, अखियोंसे गोली मारे हे गाणं पुन्हा एकदा कार्तिक आर्यनच्या चित्रपटातील आहे. हे गाणं तुम्हाला जुन्या गाण्यांची नक्कीच आठवण करुन देईल.

इक मुलाकात मैं

आयुषमान खुरानाच्या चित्रपटातील हे आणखी एक गाणं. पहिल्या प्रेमाची चाहुल तुम्हाला वेगळा आनंद देऊन जाते. हे गाणं अगदी तसचं आहे.

तू ही आना 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि तारा सुतारीया यांच्या मरजावा चित्रपटातील हे गाणं आहे. हे रोमँटीक साँग तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडू शकेल. 

 साकी साकी

 जर तुम्ही संजय दत्तचे जुन्या चित्रपटातील गाणं ऐकलं असेल तर या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन 2019 मध्ये रिलीज झाले. नोरा फतेही या गाण्यामध्ये कमाल दिसत आहे.या गाण्यामुळे मरगळलेल्या तुमच्या आयुष्यामध्ये थोडा उत्साह येईल. कारण या गाण्याचे बीट्स एकदम मस्त आहेत. 

घुंगरु तुट गये

हृतिक रोशन उत्तम डान्स करतो हे सांगायलाच नको. वॉर या चित्रपटातील हे गाणं तुम्ही नक्कीच तुमच्या फोन मध्ये ठेवायला हवे. तुम्हाला हे गाणं ऐकून नक्कीच थोडे फ्रेश आणि रिफ्रेशिंग वाटेल.

मराठीतील बहारदार लावण्या (Best Marathi Lavani Songs In Marathi)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.