ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
फुलांचे डेकोरेशन

फुलांच्या डेकोरेशनच्या भन्नाट आयडियाज, वाचेल पैसा

फुलांचे डेकोरेशन हे कोणत्याही समारंभात आकर्षकच दिसते. विशेषत: खरी फुलं ही अधिक सुंदर दिसतात. साधारण श्रावण महिन्यापासून सुरु होणाऱ्या सणांच्या दरम्यान घरात वेगवेगळे उत्सव सुरु होतात. श्रावणी पूजा, सत्यनारायण, लग्न, समारंभ, काही खास सोहळ्याच्या प्रसंगी फुलांचे डेकोरेशन विकत घ्यायचे म्हटले की, त्यावेळी त्याच्या किंमती ऐकून चक्कर येते. कारण या दिवसात तयार हार, डेकोरेशन हे फारच महाग असते. पण घरी काही सोप्या पद्धतीने आणि सहज मिळणारी फुलं घेऊन तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या डेकोरेशनपेक्षाही सुंदर डेकोरेशन करता येईल.

जाणून घ्या टेरेस गार्डनिंग मराठी टिप्स (Terrace Gardening Tips In Marathi)

कार्डबोर्ड फुलं डेकोरेशन

Instagram

कार्डबोर्ड किंवा कोणत्याही पुठ्ठ्याचा उपयोग करुन तुम्हाला अशा सारखे सुंदर डेकोरेशन करता येऊ शकते.  त्यासाठी तुम्हाला गोंड्याची फुलं घेता येतील. शिवाय तुम्हाला या पासून वेगळे काही करायचे असेल तर निशिगंध आणि  आंब्याची पानं देखील वापरु शकता. हे तुम्हाला हँगिंग आणि कुंडीत किंवा भांड्यात आधार देऊन खोवता सुद्धा येईल. 

कृती :
तुम्हाला आवडत असलेली फुलं निवडा. तुम्हाला झेंडूची केशरी, पिवळी फुलं चालतील. अशी चांगली मोठी फुलं निवडा. 

ADVERTISEMENT

वर फोटोत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला आवडीचा आकार कार्डबोडचा कापा. त्यावर हॉट ग्लू गनच्या मदतीने फुलं चिकटवा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुलं लावू शकता. यामध्ये थोडी कलात्मकता आणली तर ती अधिक चांगली दिसतील.
जर तुम्ही कडांना आंब्याची पाने लावून त्यावर मग फुलं लावू शकता त्यामुळे त्याचा आकार चांगला दिसतो. जर तुम्हाला ते लटकवायचे असतील तर तुम्ही त्याला मोठा जाड दोरा लावून त्यामध्येही वेगवेगळी फुलं ओवू शकता. त्यामुळे ते तुम्हाला लहान-मोठा आकार करुन लावता येईल. 

लग्नसोहळ्यासाठी आकर्षक मंडप डिझाईन्स (Mandap Designs For Wedding In Marathi)

फुलांचे गोळे आणि माळा

Instagram

फुलांचे गोळे आणि माळा असा प्रकारही तुम्ही आतापर्यंत पाहिला असेल. जर तुम्हाला थोडं हेव्ही डेकोरेशन हवं असेल तर गुलाबाचे फुलं किंवा मस्त झेंडूची फुले वापरुन तु्म्ही हे करु शकता. यासाठी तुम्हाला खूप फुलं लागतील. 

कृती : फुलं गोलाकार ओवण्यासाठी तुम्हाला सुई दोरा लागणार आहे. पण तो आकार मिळवण्यासाठी तुम्हाला कागदाचा बोळा करुन घ्यायचा आहे. त्यावर गोलाकार फळ ओवायला घ्यायची आहेत.  आता गोलाकार ओवलेल्या या गोळ्यांना तुम्ही गोंड्याच्या फुलांची सरही सोडू शकता जी दिसायला फारच सुंदर दिसतात. 

ADVERTISEMENT

फुलांच्या माळा

Instagram

गुलाबांच्या उपयोग करुनही तुम्ही फुलांच्या माळा बनवू शकता. बाजारात गुलाबांची फुले त्याची जुडी मिळते. ही अशी फुलं घेऊन तुम्ही ओवून त्याच्या माळा तुम्ही मस्त सोडू शकता. तुम्हाला त्या नक्कीच दिसायला सुंदर वाटतील. अगदी सहज तुम्हाला या ओवाळून घेता येईल. 

आता असे डेकोरेशन नक्की करा.

डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही ’10’ ठिकाणं आहेत परफेक्ट (Destination Wedding Places In Maharashtra In Marathi)

30 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT