ADVERTISEMENT
home / Diet
Food After Exercise To lose Weight

वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताय, मग या पदार्थांमधून मिळवा शारीरिक ऊर्जा

व्यायाम शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी गरजेचा असतो. यासाठी तुम्हाला माहीत असायला हवं Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे. काही लोक खूप व्यायाम करतात, मात्र असं असूनही त्याचं वजन जैसे थे असतं. याचं कारण हे लोक फक्त  कठीण व्यायाम करतात. मात्र आहाराकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. वजन कमी करण्यासाठी आहार कमी करून अथवा कडक डाएट करून भागत नाही. यासाठी कोणत्या वेळी काय खावं हे तुम्हाला माहीत असायला हवं. व्यायाम केल्यानंतर तुम्ही खूप थकता आणि तुम्हाला खूप भुकही लागते. अशा वेळी व्यायामनंतर अर्धा तासाने तुम्ही काही तरी पौष्टीक खायला हवं. ज्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते आणि ते सुडौलपण होते.

व्यायामानंतर काय खावे

व्यायामानंतर लागणारी भुक खूप महत्त्वाची असते. कारण या वेळेत तुम्ही योग्य पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीरावर त्याचा चांगला फायदा होतो.

भरपूर पाणी प्या –

व्यायामानंतर सर्वात महत्त्वाचं आहे भरपूर पाणी पिणं. कारण व्यायामामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. शरीराला त्वरीत ऊर्जा मिळण्यासाठी याची खूप गरज असते. जर तुम्ही व्यायामानंतर पाणी पिलं तर तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची झीज भरून निघते. म्हणूनच व्यायाम झाल्यावर अर्धा तासाच्या आत लगेच पाणी प्या.

प्रोटिन शेक –

शरीराला सर्व कार्य सुरळीत सुरु ठेवण्यासाठी पुरेशा प्रोटीन्सची गरज असते. व्यायामानंतर यासाठीच प्रोटिन शेक पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र यासाठी चांगल्या गुणवत्तेचं प्रोटिन शेक प्यायला हवं. मात्र जर तुमच्याकडे यासाठी प्रोटीन पावडर नसेल तर तुम्ही फळांचा शेक करून पिऊ शकता. लक्षात ठेवा यामध्ये साखरेचा वापर मात्र करू नका.

ADVERTISEMENT

अंडी –

व्यायामानंतर अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण अंडी प्रोटिनचा एक चांगला स्त्रोत आहे.  स्नायूंना बळकटी मिळण्यासाठी तुमच्या शरीराला या प्रोटीन्सची गरज असते. मात्र लक्षात ठेवा अंड्यातील पिवळा भाग काढून टाका. मांसपेशींना उत्तेजना मिळण्यासाठी दररोज एक ते दोन अंडी खाण्याची सवय स्वतःला लावा. त्यानंतर तुमच्या व्यायामानुसार अंडी खाण्याचे प्रमाण वाढवा.

पनीर –

जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या शरीराला प्रोटीन्स मिळण्यासाठी पनीरची खूप गरज आहे. अंड्याला पनीर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हाडं आणि मांसपेशी मजबूत होण्यासाठी शरीराला पनीर खाण्याची गरज आहे, हे ओळखून आहारात पनीरचे पदार्थ समाविष्ट करा.

पीनट बटर –

जे लोक तासनतास वर्क आऊट करतता. त्यांना शरीराच्या पोषणाकडे तितकंच लक्ष देण्याची गरज असते. शेंगदाण्यांपासून बनवलेल्या या बटरमध्ये प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स असतात. ज्यांची तुमच्या शरीराला गरज असते. शिवाय या बटरची चवदेखील छान असते.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
28 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT