home / Family Trips
कोकणातील या पदार्थांमुळे येईल तुम्हाला ‘गावची आठवण’

कोकणातील या पदार्थांमुळे येईल तुम्हाला ‘गावची आठवण’

कोकणचा निसर्ग अनेक पर्यटकांना भूरळ घालतो. म्हणूनच उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण कोकणला जाण्याचा बेत आखतात. निसर्गरम्य कोकणाला अथांग समुद्र किनारे, डोंगरनद्या अशा अनेक गोष्टींचे वरदान लाभलेले आहे. कोकणची खाद्यसंस्कृतीदेखील तितकीच स्वादिष्ट आहे. ज्यांचं बालपण कोकणात गेलं आहे अथवा शहरात राहूनदेखील उन्हाळ्याच्या सुट्टीत ज्यांनी गावी वेळ घालवला अशा सर्वांनाच गावाकडील आठवणी नक्कीच ताज्या असतील. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर कोकणातील हे काही खास पदार्थ तुम्हाला तुमच्या गावची आठवण करून देतील.

कोकणातील खास खाद्यपदार्थ

रसातले घावन

food culture in kokan

कोकणातील घावने हा एक लोकप्रिय पदार्थ आहे. सकाळच्या न्याहारीला गावी हमखास घावने केले जातात. पांढरेशुभ्र, जाळीदार घावने भीडाच्या तव्यावर करण्यासाठी एक अनोखं कौशल्य असावं लागतं. खरंतर घावन चटणी, साखर, गुळ, काळ्या वाटण्याची उसळ असे कशासोबत छानच लागतात. अनेकजण तर नुसतेच घावन खाणं पसंत करतात. पण नातवंडं गावी आल्यावर आजी प्रेमाने रस घावन्यांचा बेत आखते. नारळ आणि गुळाच्या रसात घावन बुडवून खाण्यात एक वेगळीच मौज असते. त्यामुळे रसघावन नाव घेताच मन गावच्या स्वयंपाकघरातील चुलीजवळ रेंगाळू लागतं.

Also Read About संत्रा फळाची पूड

फणसाची भाजी

food culture in kokan 1

कोकणातील आंबा, करवंद आणि फळस ही महत्वाची फळं आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण आंबा-फणसाचा फडशा पाडण्यासाठी गावी जातात. मात्र कोकणातील कच्च्या फणसाची भाजी देखील तितकीच चविष्ठ लागते.  अनेकजण कच्च्या फणसाचं रायतं देखील करतात. मात्र सकाळची न्याहरी भाताची पेज आणि फळसाच्या भाजीसोबत करण्याची मजाच न्यारी आहे. ज्यांनी ज्यांनी कोकणातील या मेव्याचा आनंद लुटला असेल त्यांच्या जीभेवर भाजीची चव तरळू लागली असेल.

वाचा – गुळाचे फायदे 

ओल्या काजूची उसळ

food culture in kokan 1 %281%29

फळसाप्रमाणेच ओल्या काजूची भाजी देखील अनेकांसाठी अगदी जीव की प्राण असेल. कोकणात काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. अनेकांच्या आंबा-फळसाप्रमाणेच काजूच्या बागा असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात ओल्या काजूची भाजी अथवा उसळ कोकणात हमखास केली जाते. ओल्या खोबऱ्याचं आणि कांद्याचं वाटण टाकून केलेली ही उसळ तांदळाच्या गरमागरम भाकरीसोबत अगदी मस्तच लागते. कोकणातील सण-समारंभ ओल्या काजूच्या उसळ केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. त्यामुळे या उसळीमुळेदेखील तुम्हाला तुमच्या गावची आठवण नक्कीच येईल.

तुपाचे आरोग्य सुविधांबद्दल देखील वाचा

आंब्याचं रायतं

भाजी आणि उसळी करण्याचा कंटाळा आला की गावी आंब्याचं तयार रायतं केलं जातं. संध्याकाळी आमटी-भातावर नुसतं आंब्याचं रायतंदेखील मस्त लागतं. ताज्या कैरीच्या फोडींवर जिरं आणि मोहरीची फोडणी आणि हळद तिखट टाकून  केलेलं हे रायतं तुमच्या तोंडाला छान चव देऊन जातं. आंबट चवीच्या या रायत्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी तुमच्या तोंडाला सहज पाणी सुटू शकतं.

माशाचं तिखलं 

food culture in kokan 1 %282%29

जर तुम्ही मांसाहारी असाल कोकणात जाणं ही तुमच्यासाठी अक्षरश: चंगळच असते. समुद्र किनारे जवळ असल्यामुळे अनेक प्रकारचे ताजे मासे अगदी घराजवळच उपलब्ध असतात. तळलेले मासे, माशाचं तिखलं, सार अथवा माशाच्या आमटीमुळे तुम्हाला गावी जणू मेजवानीच मिळते. त्यामुळे शहरात असताना गावाकडील चुलीवर केलेल्या माशांच्या साराची चव तुमच्या आठवणी नक्कीच ताज्या करू शकते.

वाचा – दिवाळीत उरलेल्या मिठाईचे काय करायचे 

गावाकडच्या या पदार्थांची माहिती वाचून तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला गावाकडची आठवण आली का हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

देखील वाचा –

या उन्हाळ्यात साठवणीचे हे हटके पदार्थ करुन पाहा

दररोज काहीतरी नवीन स्वयंपाक करण्यासाठी ट्राय करा या ‘टॉप 25’ भारतीय डिनर रेसिपीज

कमी बजेटमध्ये भारतात फिरण्यासाठी ’25’ पर्यटन स्थळं 

महाराष्ट्रीयन थाळीमध्ये हे पदार्थ करा समाविष्ट

फोटोसौजन्य – इन्टाग्राम

21 May 2019

Read More

read more articles like this
good points logo

good points text