ADVERTISEMENT
home / आरोग्य
कोरफडीचा उपयोग

घरात लावा ॲलोवेराचे झाड आणि असे मिळवा फायदे

 घरात वेगवेगळी झाडे लावायला खूप जणांना आवडतात. पण हल्ली फुलझाडंच नाही तर काही जणांना औषधी झाडे लावायला जास्ती आवडतात. घरात अशी झाडं खिडकीत लावली तर त्याचे फायदे मिळण्यास मदत मिळते. उदा. कडिपत्त्याचे झाड, जास्वंदाचे झाड, ओव्याचे झाड ही काही झाडं वाढायला  फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. असेच फायद्याचे झाड म्हणजे कोरफडीचे (Aloe Vera) चे झाड. या झाडाची वाढ व्हायला फारशी मेहनत घ्यावी लागत नाही आणि याचे फायदेही अनेक आहेत. जर तुम्ही हे झाड तुमच्या घरी लावायचा विचार करत असाल तर त्याचा कोरफडीचा उपयोग कसा करायचा ते देखील आपण जाणून घेऊया

 कोरफडीचे झाड लावताना

कोरफडीचे झाड

 सर्वसाधारणपणे आपल्याला कोरफडीचा एखादं दुसरा प्रकार माहीत आहे. पण कोरफडीचे तब्बल 26 प्रकार संपूर्ण देशभरात आढळतात. त्यातील काही ठराविक प्रकार आपल्या देशात मिळतात. त्यापैकी काही व्हेरिएंट म्हणजे snake aloe, sunset aloe, short leaf aloe,zebra aloe, Red Aloe, Bitter Aloe असे काही प्रकार फारच प्रसिद्ध आहेत. या ॲलोवेराचे फायदे हे सर्वसाधारणपणे एकसारखेच आहेत. जे तुम्हाला त्वचा, केस आणि आरोग्यासाठी फारच फायद्याचे ठरतात. भारतात साधारणपणे 18 प्रकारचे कोरफडीचे प्रकार आढळतात. 

घरी झाडं लावायला आवडतात, मग ही 5 झाडे आवर्जून लावा

असा करुन घ्या फायदा

 जर तुम्ही घरात कोरफडीचे झाड लावले असेल तर त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने फायदा कसा करुन घ्यायचा ते आज आपण जाणून घेऊया. कोरफड ही साधारण मोठी झाली की, त्याचा उपयोग तुम्हाला करता येतो. कोरफडीच्या झाडाला फुलं आल्यानंतर ते औषधी वापरासाठी उत्तम असते असे म्हटले जाते. त्यामुळे त्याचा उपयोग कसा करायचा ते जाणून घेऊया 

ADVERTISEMENT
  1. कोरफडीचा रस : कोरफडीचा रस हा खूप जण पितात. कारण या रसामुळे चांगली त्वचा, केस मिळण्यास मदत होते. इतकेच नाही तर जर तुम्हाला पोटाचे काही विकार असतील तर ते आतून चांगले करण्यासाठी मदत करते. घरात फ्रेश कोरफडीचा रस करण्यासाठी तुम्ही कोरफड घेऊन त्याचा गर काढा. तो मिक्सरमध्ये घेऊन चांगला ज्युस करुन घ्या. कोरफडीचा गर हा चिकट असतो. त्याला विशेष अशी काही चव नसते. पण असा ज्यूस प्यायची सवय लागल्यानंतर तुम्हाला तो काही वेगळा लागत नाही. 
  2. कोरफडीची जेल : खूप जण विकतची कोरफड जेल घेतात आणि त्याचा वापर करतात. पण तुम्हाला घरी झाड असेल तर बाजारातील कोरफड जेल वापरण्याची काहीही गरज नाही. उलट तुम्ही घरी असलेल्या कोरफडीचा एक तुकडा काढून तो पाण्यात ठेवा. कोरफड ही गरम असते. पाण्यात ठेवल्यामुळे त्यातील काही उष्णतेचे घटक असतात जे कमी होतात. आता कोरफडीचा तुकडा घेऊन तो कापून त्यातील गर काढून तुम्ही तो थेट चेहऱ्याला लावू शकता. चेहऱ्याला लाली आली असेल तिथे देखील लावता येते. 
  3. कोरफडीचा शॅम्पू :  खूप जणांना केसांसाठीही कोरफड वापरायची सवय आहे. कोरफडीचा ताजा गर घेऊन तुम्ही तो स्काल्पला लावला तर त्यामुळे केसांच्या स्काल्पच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे केस सुंदर राहतात. त्यामुळे तुम्ही कोरफडीचा अस देखील वापर करु शकता. 

आता तुमच्या कुंडीत कोरफडीचे झाड लावा आणि त्याचे भरपूर फायदे मिळवा.

07 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT