ADVERTISEMENT
home / सौंदर्य
fruits to be eat for healthy and shiny teeth in Marathi

दात पडले असतील पिवळे तर खा ही फळं

स्मितहास्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अधिक भर पडते. पण त्यासाठी तुमचे दात सुंदर आणि चमकदार असायला हवे. कारण पिवळे पडलेले दात तुमच्या सौंदर्यात बाधा निर्माण करतात. दातांची योग्य काळजी घेतली नाही तर दात पिवळे पडतात. दात पिवळे पडले तर तुमच्या दातांचे आरोग्यही कमी होते. कारण अस्वच्छतेमुळे दातांवर जीवजंतू पोसले जातात. अशा वेळी दात पुन्हा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी अनेक महागड्या ट्रिटमेंट केल्या जातात. मात्र तुमच्या आहारात थोडे बदल करून आणि काही फळं समाविष्ठ करून तुम्ही तुमचे दात नैसर्गिक पद्धतीने चमकदार करू शकता. ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते आणि तुमचे दात मोत्यासारखे चमकदार होतात.

अक्कल दाढ दुखीवर उपाय (Home Remedies For Wisdom Tooth Pain In Marathi)

दातांची चमक कायम राखण्यासाठी खा ही फळं

आहारात काही फळं समाविष्ठ करून तुम्ही तुमच्या दातांचे आरोग्य तर वाढवता शिवाय त्यामुळे तुमचे दात पुन्हा मोत्यासारखे चमकू शकतात.

स्ट्रॉबेरी

fruits to be eat for healthy and shiny teeth in Marathi

हिवाळ्यात मुबलक प्रमाणात स्टॉबेरी मिळतात. स्टॉबेरी हे एक रसाळ आणि स्वादिष्ट फळ आहे. थंड हवेच्या ठिकाणी स्टॉबेरीची लागवड केली जाते. स्टॉबेरीमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या दातांचे आरोग्य वाढते. शिवाय स्टॉबेरी खाण्यामुळे तुमच्या दातांवरील पिवळेपणा निघून जातो आणि दात पुन्हा चमकदार होतात.

ADVERTISEMENT

सफरचंद 

निरोगी राहण्यासाठी दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो.सफरचंद चवीला उत्तम आणि रसाळ असतं. यात असलेल्या अॅसिडयुक्त घटकांमुळे तोंडात लाळ निर्माण होते. सहाजिकच याचा परिणाम तुमच्या दातांवर होतो आणि दात चमकदार आणि मजबूत होतात.

संत्री

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम असते. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी संत्री खाणे गरजेचं आहे. जेवल्यानंतर दातांची योग्य निगा राखली नाही तर दातांवर जीवजंतू पोसले जातात. ज्यामुळे तुमचे दात पिवळे दिसू लागतात शिवाय दातांना कीड लागण्याचा धोका वाढतो. मात्र जर तुम्ही नियमित संत्री खात असाल तर तुमचे दात नैसर्गिक पद्धतीने चमकदार आणि निरोगी होतात.

तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे घरगुती उपाय | Tondachi Durgandhi Upay

केळं

fruits to be eat for healthy and shiny teeth in Marathi

निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने केळं खायलाच हवं. केळ्यामध्ये असलेले पोटॅशिअम, मॅग्नेशिअम शरीरासाठी गरजेचे असतात. एवढंच नाही तर त्यामुळे तुमच्या दातांवरील जीवजंतू नष्ट होतात आणि दात पुन्हा चमकदार होतात. केळ्यामध्ये असलेलं कॅल्शिअम तुमच्या दातांना पुन्हा मजबूत करतचं. त्यामुळे दात स्वच्छ राखण्यासाठी ही काही फळं आहारात असणं खूप गरजेचं आहे. 

ADVERTISEMENT
03 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT