चांगली कामे करण्यासाठी, नव्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही दिवस शुभ मानले जातात. गुरुपुष्यामृत योग हा त्यापैकीच एक. अनेकांनी गुरुपुष्यामृत योग 2022 (Gurupushyamrut Yoga 2022 In Marathi) हा नक्कीच कॅलेंडरमध्ये वाचला असेल. या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते हे अनेकांना माहीत असेल. पण गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय (Gurupushyamrut Yoga Chi Mahiti), गुरुपुष्यामृत योगाचे महत्व (Gurupushyamrut Yoga In Marathi) जाणून घेणेही गरजेचे असते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले की, त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. अनेक चांगल्या कामांसाठी हा दिवस शुभ मानला जातो. तर काही गोष्टींसाठी हा दिवस अशुभ मानला जातो. जाणून घेऊया गुरुपुष्यामृत योगाचे महत्व.
Table of Contents
गुरुपृष्यामृत योग 2022 – Gurupushyamrut Yoga 2022 In Marathi
गुरुपृष्यामृत योग 2022 मुहूर्त वेळ
तारीख | सुरुवात | समाप्ती |
गुरुवार, 30 जून | 25:07:11 | 29:26:31 |
गुरुवार, 28 जुलै | 07:05:24 | 29:40:23 |
गुरुवार, 25 ऑगस्ट | 05:55:13 | 16:17:00 |
ज्योतिष शास्त्रामध्ये 27 नक्षत्र येतात. त्यापैकी एक नक्षत्र आहे ते म्हणजे ‘पुष्य नक्षत्र’ या नक्षत्राचे आपले एक विशेष आहे. हे नक्षत्र ज्यावेळी गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत असे म्हणतात. ज्याप्रमाणे सिंह हा सगळ्या जंगलाचा राजा आहे असे आपण म्हणतो. अगदी तसाच गुरुपुष्यामृत योग हा देखील सगळ्यात मोठा योग मानला जातो. या दिवशी सुरुवात केलेल्या कोणत्याही कार्याला यश मिळण्यास मदत मिळते. म्हणूनच अनेक जण गुरुवारी एखाद्या कार्याची शुभ सुरुवात करतात. या दिवशी चंद्र हा राशीच्या चौथ्या, आठव्या आणि बाराव्या घरात असतो. हा योग अशुभ मानला जातो. पण या दिवशी जुळून येणारा गुरुपुष्यामृत योग या दिवसाला अधिक चांगला आणि शुभ करण्यास मदत करतो. म्हणूनच 27 नक्षत्रांमध्ये हा दिवस हा अत्यंत शुभ (Gurupushyamrut Yoga In Marathi) मानला जातो.
गुरुपुष्यामृत या शब्दाची फोड केल्यानंतर गुरु आणि पुष्य असा होतो. पुष्य याचा अर्थ अधिक उर्जा आणि बळ देणारा असा आहे. त्यामुळेच हा दिवस फारच खास आहे. अनेक ठिकाणी गुरुपुष्यामृत योगाचे कॅलेंडर खास लावले जाते. विशेषत: सोन्याच्या दुकानात या दिवशी खरेदीचा वेग जास्त असतो. प्रत्येक जण त्याला परवडेल इतके सोने या दिवशी खरेदी करते. त्यामुळे त्यात वाढ होते अशी प्रत्येकाची धारणा आहे.
गुरुपृष्यामृत योगाची माहिती आणि पौराणिक कथा – Gurupushyamrut Yoga Chi Mahiti
गुरुपुष्यामृत योग हा अनेक गोष्टींसाठी फायदेशीर आहे असे म्हटले जाते. या दिवशी नेमके काय करावे ते जाणून घेऊया.
- गुरुपुष्यामृत हा दुर्मिळ योग असल्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी करावी. त्यामुळे त्याच वृद्धी आणि वाढ होण्यास मदत होते. सोने घरी आणल्यानंतर ते देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करावी. त्यामुळे ते धन टिकण्यास मदत मिळते.
- एखादे रखडलेले काम पूर्णत्वास न्यायचे असेल तर गुरुपुष्यामृत या दिवसाची निवड करुन ही चांगली असते. या दिवशी कामांची सुरुवात केली तर कामे पूर्ण होतात.
- एखादे नवे काम हाती घ्यायचे असेल तर हा दिवस अगदी योग्य आहे असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही या दिवशी एखादे नवीन काम हाती घेण्यास काहीच हरकत नाही.
- नवीन वाहनं, नवीन गाड्या या दिवशी खरेदी केल्या तरी देखील चालू शकतात.त्यामुळेही चांगला लाभ होतो.
- या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहते. असे देखील म्हटले जाते.
आगामी काळातील गुरुपृष्यामृत योग – Upcoming Gurupushyamrut Yoga
आगामी काळात गुरुपुष्यामृत योग किती आहेत आणि कोणत्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची खरेदी करायला हवी. यासाठी आगामी काळातील गुरुपुष्यामृत योग
2023
तारीख | सुरुवात | समाप्ती |
गुरुवार, 30 मार्च | 22:59:47 | 30:13:04 |
गुरुवार, 27 एप्रिल | 06:59:45 | 29:43:30 |
गुरुवार, 25 मे | 05:25:45 | 17:53:53 |
गुरुवार 28 डिसेंबर | 25:05:21 | 31:12:51 |
2024
तारीख | सुरुवात | समाप्ती |
गुरुवार, 25 जानेवारी | 08:17:31 | 31:12:26 |
गुरुवार, 22 फ्रेब्रुवारी | 06:53:49 | 16:44:13 |
गुरुवार, 26 सप्टेंबर | 23:34:50 | 30:12:09 |
गुरुवार, 24 ऑक्टोबर | 06:27:51 | 31:40:55 |
गुरुवार, 21 नोव्हेंबर | 06:48:52 | 15:36:12 |
2025
तारीख | सुरुवात | समाप्ती |
गुरुवार, 24 जुलै | 16:44:50 | 29:38:10 |
गुरुवार, 21 ऑगस्ट | 5:53:07 | 24:09:24 |
गुरुवार, 18 सप्टेंबर | 06:07:10 | 06:33:08 |
आता हे काही आगामी योग पाहता यानुसार तुम्ही खरेदी अथवा चांगली कामे करावीत.
अधिक वाचा:
तळहातावरील या रेषा असतात फारच शुभ, जाणून घ्या अर्थ