निरोगी जीवनासाठी मेंदूचे कार्य सुरळीत चालणं खूप गरजेचं आहे. जसं शरीराला सुदृढ राहण्यासाठी संतुलित आहार, व्यायामाची गरज असते. तसंच मेंदूचा विकास होण्यासाठी काही गोष्टी आवर्जून करायला हव्या. चांगले विचार, सकारात्मक वातावरण, वाचन, संगीत ऐकणे यामुळे मेंदूला आराम आणि चालना मिळते. मात्र काही सवयी अशाही असतात. ज्यामुळे तुमच्या मेंदू्च्या कार्यात अडचणी येऊ शकते. यासाठी जाणून घ्या कोणत्या सवयी मेंदूसाठी घातक ठरू शकतात.
पुरेशी झोप न घेणे-
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला चांगली आणि शांत झोप दुरापास्त झाली आहे. काही लोक खूप वेळ झोपतात पण रात्री कधीच वेळेवर झोपत नाहीत. तर काही लोक उशीरा झोपतात आणि लवकर उठतात त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. कारण काही असलं तरी तुमच्या अपूऱ्या झोपेचे परिणाम हळू हळू मेंदूवर जाणवू लागतात. कारण गाढ झोपेतच मेंदूला काही काळ आराम मिळत असतो. इतर वेळी सतत विचार करण्यामुळे मेंदू कार्यरत असतोच. यासाठी दिवसभरात कमीत कमी सात ते आठ तास शांत झोप घ्या. यासाठी लवकर झोपण्याची आणि लवकर उठण्याची सवय स्वतःला लावा. का आणि कोणत्या स्लीपिंग पोझिशनमध्ये पडतात भितीदायक स्वप्न
आहारात साखरेचे प्रमाण अधिक असणे –
तुम्ही जे खाता त्याचा तुमच्या शरीरावर आणि पर्यायाने मनावर परिणाम होत असतो. काही संशोधनात असं आढळलं आहे की जे लोक खूप साखरेचे पदार्थ खाता त्यांच्या मेंदूवर याचा हळू हळू परिणाम दिसू लागतो. ज्यामुळे पुढे मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठीच जर वेळीच सावध व्हा आणि आहारातून साखरेचे सेवन नियंत्रित करा. त्वचेला येत असेल सतत खाज तर तुम्हाला असू शकतो मधुमेहाचा धोका
सकाळचा नाश्ता न करणे –
सकाळचा नाश्ता खूप महत्त्वाचा आहे. कारण रात्रभर कमीत कमी आठ तास आपण उपाशी असतो. ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. दिवसभर अॅसिडिटी होऊ नये यासाठी सकाळी उठल्यावर चांगला आणि भरपूर पौष्टिक नाश्ता प्रत्येकाने करायला हवा. सकाळी नाश्ता न केल्यामुळे तुमच्या शरीरावरच नाही मेंदूच्या कार्यावरही वाईट परिणाम होतो. यासाठी सकाळचा नाश्ता कधीच स्किप करू नका.
अती चिंता काळजी करणे –
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला ताणतणावाला सामोरे जावेच लागते. मात्र जर तुम्ही सतत विनाकारण चिंता, काळजी करत बसला तर याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. एकदा मानसिक आरोग्य बिघडले की शरीर प्रकृती खराब होण्यास वेळ लागत नाही. यासाठी ताणतणाव योग्य पद्धतीने हाताळा. जाणून घ्या संगीत ऐकण्याचे हे अफलातून फायदे, आजारपणातून मिळेल मुक्ती
मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi)