किचनमध्ये तुमचा सर्वात जास्त वेळ स्वयंपाकाची तयारी करण्यात जातो. एखादा पदार्थ बनवण्यापेक्षा भाज्या अथवा फळं धुणं, सोलणं आणि चिरणं हे एक टास्कच असते. कारण प्रत्येक पदार्थानुसार निरनिराळ्या पद्धतीने भाज्या चिराव्या लागतात. ऑफिसला जाणाऱ्या अथवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांसाठी कामाच्यावेळी ही कामं करणं थोडं त्रासदायकच असतं. अशा वेळी तुमचा वेळ वाचवणाऱ्या काही झटपट किचन टिप्स तुम्हाला माहीत असतील तर तुमचा वेळ नक्कीच वाचू शकतो. यासाठीच जाणून घ्या भाज्या, फळं झटपट कशा कापाव्या.
चांगल्या चाकूचा करा वापर –
भाज्या कापण्यासाठी तुम्ही जो चाकू अथवा विळी वापरत आहात ती योग्य असेल तर तुमचा वेळ नक्कीच वाचतो. तुम्ही सर्वच प्रकारच्या भाज्या एकाच प्रकारच्या चाकूने कापत असाल तर ही सवय बदला. कारण प्रत्येक भाजीचा कठीणपणा सारखा नसतो. त्यामुळे बटाट्यासाठी लागणारा चाकू तुम्ही टोमॅटोसाठी वापरला तर तुमचा वेळ वाया जातो. बाजारात प्रत्येक वस्तूसाठी निरनिराळ्या आकार आणि धारेचे चाकू मिळतात. यासोबतच भाज्या कापण्याचे चाकू वेळेवर स्वच्छ करा आणि नियमित त्यांना धार काढा. ज्यामुळे ते वापरणं अधिक सोपे होईल. वाचा लिंबू, मिरची आणि आल्याचे सोपे हॅक्स, करा उपयोग
चॉपिंग बोर्ड आहे गरजेचा –
भाज्या अथवा फळं कापण्यासाठी चॉपिंग बोर्ड वापरायला हवा. कारण चॉपिंग बोर्डमुळे तुमचा वेळ तर वाचेलच शिवाय योग्य प्रकारे भाज्या चिरता येतील. चॉपिंग बोर्डवर एकसमान भाजी चिरण्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला घाईच्या वेळी देखील व्यवस्थित भाज्या कापता येतील. वाचा सोलून झाल्यावर आल्याचं साल फेकून न देता असा करा वापर
सुरक्षेची घ्या काळजी –
कामाची घाई आणि वेळेचा अभाव हे असणारच. मात्र यासाठी कामं घाई घाईत करताना स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायला विसरू नका. जर तुम्हाला स्वयंपाकासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर वेळ असेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी भाज्या निवडून, चिरून ठेवा. याशिवाय बाजारात असे अनेक टूल्स मिळतात ज्यामुळे तुम्ही सुरक्षित भाज्या चिरू शकता. या साधनांचा वापर करा ज्यामुळे तुम्ही झटपट आणि सुरक्षित स्वयंपाक करू शकता. कोबीची भाजी कापण्याची सोपी पद्धत, वाचवा वेळ
शिका चाकू हातात धरण्याचे योग्य टेकनिक-
टिव्हीवर एखादा शेफ जेव्हा सपासर कांदा कापतो तेव्हा त्याचे स्किल पाहून तुम्ही तोंडात बोटं घालता. अशा वेळी प्रत्येकाला वाटतं की आपणही असा कांदा चिरला तर… पण त्यासाठी लागणारं स्किल खूप महत्त्वाचं आहे. तु्म्ही कोणत्या भाजीसाठी कोणता चाकू वापरता, तो चाकू कसा पकडता यावर तुम्ही भाजी किती पटपट चिराल हे अवलंबून आहे. कारण कोणतेही काम करताना त्यातील कौशल्य अवगत झाले केले की काम करणे अधिक सोपे होते.