ADVERTISEMENT
home / केस
Hair styling mistakes to take care in summers

उन्हाळ्यात हेअर स्टाईल करताना टाळा ‘या’ चुका

उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा आणि प्रचंड उकाडा… उन्हाळ्यात केस वर बांधून ठेवणे हीच सर्वांची आवडती हेअर स्टाईल असते. पण असं असलं तरी या काळातच वेडिंग सीझन सुरू असतो मुलांच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे वेकेशनचे प्लॅन ठरतात. अशा वेळी  हेअर स्टाईल करणं भाग पडतं. पण हेअर स्टाईल केल्यावर फॅशनेबल दिसण्यासोबत तुम्हाला गरम होणार नाही याचीपण काळजी घ्यावी लागते. म्हणूनच या काळात हेअर स्टाईल करताना या चुका मुळीच करू नका. 

केस कापून खूप लहान करणे

उन्हाळ्यात गरम होऊ नये म्हणून अनेकजणी सरळ केस कापून लहान करतात. पण उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी केलेला हेअर कट योग्य असायला हवा. कारण जर तुम्ही समर फ्रेंडली हेअर कट केला नाही तर तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो. केस वारंवार तोंडावर आले तर त्यामुळे गरम होतच शिवाय एक्नेपण येतात. केसांचा संबंध सारखा चेहरा अथवा मानेसोबत झाला तर ते चिकट होतात. 

अति केस धुणे

उन्हाळ्यात गरम होऊ नये म्हणून काही जणी दररोज केस धुतात. व्यायाम केल्यावर, स्वयंपाक केल्यावर, बाहेरून घरी आल्यावर घामामुळे केस खराब होतात. यासाठी केस धुणं गरजेचं पण असतं. पण केस धुताना दररोज शॅम्पू वापर केला तर त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. दररोज केस धुताना काही जणी कंडिशनर लावणं टाळतात. त्यामुळे केस लवकर खराब होण्याची शक्यता असते.  अशावेळी जर तुम्हाला केस धुवायचे असतील तर शॅम्पू ऐवजी कधी कधी फक्त कंडिशनर लावा. 

केस मोकळे सोडणे

मोकळे केस कितीही छान वाटत असले तरी उन्हाळ्यात अशी हेअर स्टाईल त्रासदायक ठरू शकते.  कारण केस घामामुळे चिकट होतात, धुळ मातीचा संपर्क झाल्यामुळे कोरडे आणि निस्तेज होतात. यासाठीच उन्हाळ्यात शक्य असल्यास केस मोकळे सोडू नका.पोनीटेल, फिशटेल, फ्रेंच ब्रेड अशा हेअर स्टाईलने स्टायलिश दिसा.

ADVERTISEMENT

हिट स्टायलिंग करणे

एखादा लुक आकर्षक करण्यात तुमच्या हेअर स्टाईलचाही तितकाच हात असतो. अशा वेळी स्ट्रेटनिंग, कर्ल अशा हेअर स्टाईल करण्यासाठी केसांना हिट द्यावी लागते. मात्र उन्हाळ्यात शक्य असल्यास अशा हेअर स्टाईल टाळा. कारण त्यामुळे तुमच्या केसांचे अति नुकसान होण्याची शक्यता असते. 

वेकेशनवर असताना…

उन्हाळा सुरु होताच अनेक जण थंड हवेच्या ठिकाणी जातात अथवा अशा रिसॉर्टमध्ये जिथे स्विमिंग पूल असेल. कारण उकाडा टाळण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये डुंबणे जास्त सोयीचे वाटते. पण जर तुम्ही स्विमिंग पूलमध्ये जास्त काळ घालवणार असाल तर केसांची योग्य काळजी घ्या. कारण खूप वेळ ओले राहिल्यामुळे, क्लोरिनयुक्त पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे तुमचे केस खराब होण्याची शक्यता असते. आजकाल केसांसाठीदेखील सनस्क्रीन मिळतं. यासाठी तुम्ही त्याचा वापर पूलमध्ये असताना करावा. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

16 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT