लग्नातील ‘हळद’ हा सोहळा म्हणजे एक वेगळात उत्साह असतो. हळदीची गाणी लागली की पाय आपोआप थिरकायला लागतात. लग्नाआधी केला जाणारा हा समारंभ खूप ठिकाणी इतक्या जल्लोषात साजरा होतो की त्याची झिंग उतरता उतरत नाही. लग्न समारंभ असेल आणि हळदीची तयारी जोरदार नसेल असे अजिबात होत नाही. हिंदू लग्नामध्ये नववधू आणि वराला आदल्या दिवशी हळद लावली जाते. हळद लावल्यामुळे नवरीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते असा पूर्वी समज होता.. महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीने हळद खेळली जाते. डिजेच्या तालावर नाचत या दिवसाचा आनंद साजरा केला जातो तुमच्याही खूप जवळच्या व्यक्तीची हळद असेल आणि हळदीच्या शुभेच्छा (Haldi Ceremony Quotes In Marathi) पाठवून तो आनंद अधिक द्विगुणित करु शकता. लग्नानंतर उखाणे पाठ हवेत त्यातही एक वेगळी मजा असते.
Haldi Ceremony Quotes In Marathi | हळदी समारंभासाठी खास कोट्स
हळदी समारंभासाठी खास कोट्स पाठवायचा विचार असेल तर (Haldi Ceremony Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी निवडले आहेत. जे तुम्हाला नक्कीच पाठवता येतील.
- तुझ्या नावाची हळद लागली सर्वांगाला
आता ओढ कायमची तुझ्या होण्याला
हळदीच्या शुभेच्छा! - हळदीचा रंग तो पिवळा
आनंदाचा आणि उत्साहाचा
तुमच्या आयुष्यात यावा क्षण आनंदाचा
हळदीच्या शुभेच्छा! - हळद लावून झाली लग्नकार्याला सुरुवात
मंगलमयी वातावरणात पार पडू दे तुझ्या लग्नाचा थाट
तुला हळदीच्या खूप शुभेच्छा! - हळद लागली आणि झाली तू खूप सुंदर
लागो न तुला दृष्ट कोणाची
हीच इच्छा आहे आज मनी - लागली तुला हळद
लग्नाची वाजली सनई
तुला भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा! - हळदीने अंग तुझं झालं गोरं गोरं
उत्साह करा सगळीकडे कारण आहे माझ्या भावाचं\ बहिणीचं लग्न - हळद तुझ्या प्रेमाची सख्या,
लग्नाच्या मांडवात अशी लागली,
की त्या हळदीच्या रंगात सख्या
दोघांची मने रंगली, हळदीच्या शुभेच्छा! - उद्यापासून होणार तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात
तुझ्यावर होऊ दे अशीच प्रेमाची बरसात - हळद लागली, आले तुला तेज
तुझ्या आयुष्यात येऊ नवा आनंद - हळद लागली आनंद हा तुझ्या मनी दाटला,
आम्हालाही तुझ्यामुळे आनंद हा झाला
Haldi Ceremony Quotes For Bride In Marathi | नवरीसाठी हळदीचे कोट्स मराठी
खास नवरीसाठी तुम्हाला हळदीचे कोट्स मराठी (Haldi Ceremony Quotes For Bride In Marathi) पाठवायचा विचार असेल तर तुम्हाला हे कोट्स नक्कीच आवडतील. तुम्हाला नवरीची लग्नात पिवळी साडी का असते ते माहीत असेल तर त्यामागेही काही कारण असतातं.
- गोऱ्या गोऱ्या गालावर आज लागली हळद,
नवरीबाई तुम्ही दिसताय आज खूपच सुंदर
नव्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा! - हळद लागली, मेंदी सजली,
नवरीचं रुप आलं खुलून
नव्या आयुष्यासाठी आशीर्वाद तुला भरभरुन - एकमेंकावर तुमचं राहो असचं प्रेम कायम
आज हळदीच्या दिनी ही प्रार्थना
आता हळदीचा आनंद पण घे ना जरा - ढोल ताशे- डीजेच्या तालावर
तुझी हळद झाली पार,
आता लग्नासाठी झालीस तू तयार - तुला पाहून होतो मला आनंद
हळदीने तुझ्या रुपात पडली आनंदाची भर
तुला हळदीच्या शुभेच्छा! - गोऱ्या गोऱ्या गालावरी
चढली लाजची लाली,
ग पोरी नवरी आली,
हळदीच्या शुभेच्छा - हळदीने झालं तुझं अंग गोर गोरं
जणू सोन्यालाही मागे टाकेल तेज हे तुझं
- नवरीला लागली हळद,
आता नाचूया गाऊया लग्नलागेस्तोवर - हळद ही तुला लागली,
डोळ्यात अश्रू दाटले,
तू जावी कुठेही, हेच मला वाटले - हळद लावून नटली नवरी भारी
बघा माझी बहीण आज नवरी झाली
Haldi Ceremony Status In Marathi | हळदी समारंभ स्टेटस मराठी
तुमच्या खास अशा मित्रांसाठी हळदी समारंभाचे खास स्टेटस मराठी ठेवायला काहीच हरकत नाही. वाचा (Haldi Ceremony Status In Marathi).
- हळद लागली, हळद लागली,
बहिणीला आमच्या हळद लागली
हळदीच्या रंगात नवरी नटली
हळदीच्या शुभेच्छा!
- हळदीचा मान आहे तुझा,
आज हळदीतच रंगतो तुला
हळदीच्या शुभेच्छा - चमचमीत जेवणाची मस्त केली तयारी
आज आमच्या लाडक्या दादाची हळद जी आली - आज आहे तुझ्या जीवनाचा खास दिवस
हळदीच्या शुभ रंगाने व्हावी नव्या जीवनाची ओळख - आज माझ्या आनंदाला नाही सीमा,
तुझ्या हळदीत आम्हाला मिळाला पार्टीयुक्त मेवा - हळद लागली, लागली सासरची ओढ
मिळावा तुला आनंद आयुष्यात हीच आहे ओढ - लग्न आहे आयुष्याचा अनमोल सोहळा,
हळदीच्या समारंभाने खास व्हावा - मनी हा हर्ष दाटला तुझ्या हळदीचा दिवस आला,
आता तू होणार परक्या घरची,
होणार सून तू त्या घरची - हळद लावली तुला आले डोळ्यात माझ्या अश्रू
आठवणीने आले मग खुदकन हसू - लग्नाआधी केली जाते हळद
लग्नाआधी केली जाते हळद,
चल धिंगाणा करु उद्यापासून तू काही येत नाही आमच्यात परत
Haldi Ceremony Wishes For Bridegroom In Marathi | नवऱ्या मुलाला हळदीच्या शुभेच्छा
लाडक्या नवऱ्या मुलाला हळदीच्या शुभेच्छा देण्याचा विचार आहे. काहीतरी मस्त अस पाठवायचं असेल तर (Haldi Ceremony Wishes For Bridegroom In Marathi) पाठवून तुम्ही हा आनंद शेअर करु शकता.
- भावाची हळद
तर होणार ना गावभर चर्चा
कोंबडी वडे खाऊन आम्ही करणार गावभर दंगा
भावा हळदीच्या शुभेच्छा! - डीजेच्या तालावर आमचा भाऊ आज नाचणार
स्वत:च्या हळदीला दणाणून सोडणार - हळदीचा कार्यक्रम तुझा
आम्ही कसा मिस करणार
आता तुला चिडवायची संधी
आम्ही कशी मिस करणार
हळदीच्या शुभेच्छा! - लाडका मित्र आमचा होतोय उद्या नवरा
हळदीचा कार्यक्रम त्याचा दणक्यात साजरा करा
हळदीच्या शुभेच्छा! - हळद लावा याला भरभरुन
भाऊ दिसला पाहिजे त्याच्या लग्नात उठून
भावा, तुला हळदीच्या शुभेच्छा! - लागली भावाला हळद,
आता काही तो येणार नाही आमच्यात परत
मित्रा तुला हळदीच्या शुभेच्छा! - भावाच्या हळदीचा आनंद हा झाला,
सगळीकडे पार्टीचा माहोल झाला,
हळदीच्या शुभेच्छा! - आज आहे मुलाच्या गालावर
लाजेची लाली
पोरी लावणार आज दादाला हळद भारी - हळद लावून करा भाऊला चांगला गोरा
लग्नाच्या दिवशी दिसू ते त्याचा तोरा - हळदीचा कार्यक्रम झाला एक नंबर
आता आमच्या भाऊंचा लागला ना आमच्यात नंबर
नांदा सौख्य भरे!
आता हळदीला असे मस्त शुभेच्छा संदेश पाठवून तुमचा आनंद शेअर करा आणि हो… हळदीचा आनंद घ्यायला ही अजिबात विसरु नका