हिवाळ्यात बऱ्याचदा केस गळण्याची समस्या अधिक वाढते. वातावरणातील कोरडेपणामुळे केसांचा मऊपणा कमी होतो आणि केस राठ आणि निस्तेज होतात. शिवाय हिवाळ्यात त्वचाही कोरडी होते ज्याचा दुष्परिणाम केसांच्या मुळांवर होतो. कोरड्या स्काल्पमुळे केसांमध्ये कोंडा होतो आणि इनफेक्शनमुळे केसांचे नुकसान होते. मात्र या दिवसांमध्ये आहारात काही खास पदार्थांचा समावेश केल्यास केसांचे योग्य पोषण होते आणि केस गळणे रोखता येते. हलिम अथवा अळीवच्या बिया आहारातून घेतल्यास केसांवर त्याचा चांगला परिणाम होतो. यासाठीच जाणून घ्या अळवाचे फायदे आणि त्याचा केसांवर कसा होतो परिणाम
अळीव बियांचे केसांवर होणारे फायदे
अळीवच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 9 आणि व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई भरपूर असतं. जे तुमच्या केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतं. शिवाय अळीवच्या बियांमध्ये फायबर्स, फॉलिक अॅसिड आणि लोहचं प्रमाणही पुरेसं असतं. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं. रक्तप्रवास सुधारल्यामुळे केसांच्या मुळांचे योग्य पोषण होते आणि केसांची मुळं मजबूत होऊन केस गळणे रोखता येते. हलिममध्ये असलेल्या अॅंटि ऑक्सिडंटमुळे केस आणि स्काल्पचं नुकसान कमी होतं. हलिमच्या बिया या तेलयुक्त असतात ज्याचा परिणाम तुमच्या त्वचा आणि केसांमधील नैसर्गिक तेलाच्या निर्मितीवर होतो. पीच स्तर आणि सीबमची निर्मिती संतुलित राहण्यासाठी हलिम तुमच्या नक्कीच फायद्याचे ठरतात. यामुळे तुमची त्वचा आणि केस मऊ आणि मुलायम राहतात.
अळीव बियांचे इतर फायदे
अळीवमुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते ज्यामुळे तुमचे वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या इनफेक्शनपासून संरक्षण होते. हलिम खाण्यामुळे वंधत्वावर मात करता येते. किशोरवयीन मुलांना हलिम दिल्यास त्यांच्यात होणारे हॉर्मोनल बदल व्यवस्थित होतात. वजन कमी करण्यासाठी हलिमच्या बिया उपयुक्त ठटरतात. कारण त्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि लगेच भुक लागत नाही. यासाठीच हलिमच्या बिया रात्री पाण्यात अथवा दुधात भिजत ठेवून त्याचे लाडू अथवा पेज बनवली जाते. सॅलेडमध्येही हलिम चांगले लागतात. आहारात हलिमचे प्रमाण वाढवल्यास त्याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्य, त्वचा आणि केसांवर होतो. केस गळणे थांबवण्यासाठी आहारातून हलिम घेणं नक्कीच एक चांगला पर्याय आहे.
अळीव बाबत तज्ञ्जांचा अनुभव
काही दिवसांपूर्वीच आहारतज्ञ्ज ऋजुता दिवेकरने तिच्या इन्स्टा पेजवर एक केस स्टडी शेअर केली होती. ज्यामध्ये तिने तिच्या टीममेंबरच्या भावाचे गळलेले केस हलिममुळे कसे परत आले हे दाखवलं होतं. त्यांच्या या टीममेंबरने तिच्या भावाला फक्त एक कप दुधातून हलिम घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र हा उपाय तिच्या भावासाठी अतिशय वरदान ठरला. कारण हा उपाय केल्याने तिच्या भावाचे गळलेले केस पुन्हा उगवले होते. यासाठी तिने शेअर केलं होतं की जर तुम्हाला तुमचे केस गळणं थांबवायचं असेल तर रात्री अथवा कमीत कमी आठ ते दहा तास हलिम पाण्यात भिजवा आणि सकाळी ते दुधातून प्या. केस गळणे थांहण्यासाठी हा अगदी सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. शिवाय या केस स्टडीमुळे अळवाचे महत्त्व चांगल्या पद्धतीने जगासमोर आलं आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –