ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
hand-tanning-home-remedies-in-marathi

उन्हाळ्यात हाताचे टॅनिंग दूर करा सोप्या घरगुती उपायांनी

उन्हाळ्यात (Summer) उन्हामुळे केवळ त्वचेचा रंगच नाही बदलत तर हे हाताच्या त्वचेसाठीही नुकसानदायी ठरते. उन्हाळ्याच्या दिवसात टॅनिंगची समस्या (Tanning Problems) अनेक महिलांना त्रासदायक ठरते. पण टॅनिंग केवळ चेहऱ्याचे होते म्हणून चेहऱ्याची अधिक काळजी घ्यावी असे अनेक महिलांना वाटते. पण हाताच्या त्वचेचीही तितकीच काळजी घ्यायला हवी. उन्हाळ्यात अनेक सनस्क्रिनचा वापर करण्यात येतो. तरीही कधी कधी काळे पडलेले हात दिसायला अत्यंत वाईट दिसतात. मात्र या टॅनिंगपासून तुम्हाला सुटका काही घरगुती उपायांनी (Home Remedies For Hand Tanning) नक्कीच मिळू शकते. हाताचे टॅनिंग दूर करा सोप्या घरगुती उपायांनी.

दही, लिंबू आणि तांदळाचा फेसपॅक (Curd, Lemond and Rice Facepack)

साहित्य 

  • 1 मोठा चमचा दही 
  • 1 लहान चमचा लिंबाचा रस 
  • 1 मोठा चमचा तांदळाची पावडर 

बनविण्याची पद्धत 

  • एका बाऊलमध्ये दही, लिंबाचा रस आणि तांदळाची पावडर घ्या 
  • हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याचा लेप तयार करा 
  • हा लेप हातावर व्यवस्थित चोळा 
  • 5-10 मिनिट्स हातावर हे तसंच राहू द्या आणि नंतर हळूवार रगडून काढा 
  • त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवा 
  • नियमित असं केल्याने हाताचा काळेपणा दूर होईल 

फायदा – दह्यामध्ये ब्लिचिंग घटक असतात आणि तांदळामध्ये त्वचेसाठी एक्सफोलिएशन असते. दोन्हीचे मिश्रण त्वचेवर असणारी डेड स्किन काढून टाकण्यास मदत करते. 

ADVERTISEMENT

कॉफी स्क्रब (Coffee Scrub)

साहित्य 

  • 1 लहान चमचा कॉफी
  • अर्धा चमचा मध
  • अर्धा चमचा दूध 

बनविण्याची पद्धत 

  • एका बाऊलमध्ये दूध, कॉफी आणि मधाचे मिश्रण तयार करून घ्या 
  • आता हे मिश्रण हातावर मळून घ्या आणि मग 5 मिनिट्नंतर हातावर स्क्रब करा 
  • त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुवा 
  • या घरगुती हँड स्क्रबमुळे तुम्हाला खूपच फायदा मिळेल

फायदा – कॉफीमध्ये अँटिएजिंग घटक असतात, तसंच त्वचेची दुरूस्ती करण्याचे काम कॉफी करते

पपईपासून बनवा टॅन रिमूव्हल (Papaya Tan Removal)

साहित्य 

ADVERTISEMENT
  • 1 लहान चमचा पपईचा पल्प
  • 1 लहान चमचा पपईचे बी 

बनविण्याची पद्धत 

  • पपईचा एक तुकडा घेऊन तो मॅश करा 
  • त्यात पपईचे बी घाला आणि हे मिश्रण घेऊन हातावर स्क्रब करा 
  • नंतर पाण्याने हात स्वच्छ धुवा 

फायदा – पपईने त्वचेला डीप क्लिन करण्यात येते आणि यामुळे त्वचा अधिक चमकदार होते 

हाताचे टॅनिंग दूर करण्याचे अन्य उपाय 

टॉमेटोचा रस – टॉमेटोच्या रसामध्ये विटामिन सी चे अधिक प्रमाण असते. हे त्वचेला ब्लीच करते. त्वचेवर टॅनिंगची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही याचा प्रयोग करून घेऊ शकता 
बटाट्याचा रस – बटाट्याच्या रसामध्ये एक्सफोलिएटिंग घटक असतात. तुम्ही रोज टोनरप्रमाणे हातावर बटाट्याचा रस लावल्यास हाताचा काळेपणा दूर होण्यास मदत मिळते 
काकडी – काकडीमध्ये विटामिन सी चे अधिक प्रमाण आढळते. त्वचा ब्लीच करण्यासाठी काकडीचा फायदा मिळतो. तुम्ही काकडीचा एक तुकडा हातावर घासा. असे नियमित करा, जेणेकरून हाताचा काळेपणा निघून जाईल
कोरफड जेल – कोरफड जेलमध्ये पिगमेंटेशन समस्या कमी करणारे घटक अधिक असतात. जर तुम्ही उन्हामुळे काळे झाले असाल तर तुम्ही तुम्ही हातावर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफड जेल लावा. असं केल्यामुळे हातावरील काळेपणा काही दिवसातच कमी झालेला दिसून येईल
संत्र्याच्या सालाची पावडर – संत्र्याची साले सुकवून त्याची पावडर बनवा आणि मग ही पावडर दूध अथवा दह्यात मिक्स करून स्क्रब करा. तुमची त्वचा कोरडी असल्यास, यात कच्चे दूध वापरा आणि तेलकट असेल तर यामध्ये दह्याचा वापर करा
हाताचे टॅनिंग घालविण्याचे हे सोपे उपाय तुम्हीही घरात करून पाहा. यासाठी महागड्या पार्लरमध्ये जाण्याची तुम्हाला अजिबात गरज भासणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
07 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT