घरात मुलगी जन्माला येणं ही एक भाग्याची गोष्ट आहे. निसर्गाने स्त्रीकडे प्रजननशक्ती दिलेली आहे. कारण स्त्री ही घराचा कणा असते. एक स्त्री घर आणि समाज अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या सांभाळू शकते. यासाठीच घर आणि समाजात प्रत्येक स्त्रीला सन्मानाची आणि आदराची वागणूक मिळणं गरजेचं आहे. मात्र दुर्देवाने समाजात असं चित्र दिसत नाही. राष्ट्रीय कन्या दिन कधी असतो, हेही बरेच जणांना माहीत नसतं. यंदा 2022 मध्ये राष्ट्रीय कन्या दिन 24 जानेवारी रोजी आहे. मग हा येणारा कन्या दिन साजरा करा आणि पाठवा राष्ट्रीय कन्या दिन सुविचार (Daughters Day Quotes In Marathi), कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Daughters Day Quotes In Marathi), जागतिक कन्या दिन शुभेच्छा (Happy Daughters Day Wishes In Marathi), आई आणि मुलीसाठी शुभेच्छा संदेश (Daughters Quotes In Marathi From Mother), बाबा आणि मुलीसाठी शुभेच्छा संदेश (Daughters Quotes In Marathi From Father).
Happy Daughters Day Quotes In Marathi | जागतिक कन्या दिन शुभेच्छा
जागतिक कन्या दिवस असो वा राष्ट्रीय कन्या दिन (National Girl Child Day) असो. तुम्हाला हे जागतिक कन्या दिन सुविचार (Happy Daughters Day Quotes In Marathi) नक्कीच उपयोगी पडतील.
1.मुली या देवाघरच्या पऱ्या असतात – J lee
2. मुली म्हणजे भूतकाळातील गोड आठवणी, वर्तमान काळातील आनंदी क्षण आणि भविष्य काळातील आशा आणि आश्वासन असतात – अनामिक
3. तुमच्या मुलींचा आदर करा. कारण त्या आदरणीय आहेत – Malala Yousafzai
4. मुली या निसर्गाने दिलेली एक अनमोल भेटवस्तू आहेत. – Laurel Atherton
5. मुली नेहमी तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालतात म्हणून त्यांच्यासाठी आदर्श पालक व्हा – Elizabeth George
6. जेवढं मुलींना तुमच्याबद्दल माहीत होत जातं तितक्या तुमच्या मुली मजबूत होत जातात – अनामिक
7. माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व आहे – Whitney Houston
8. प्रत्येक मुलीमध्ये देवाने त्याचे दिव्य गुण दिलेले असतात – Russell M. Nelson
9. मुलगी ही तिच्या आईसाठी दैवी खजिना असते – Catherine Pulsifer
10. मुलीवर वडीलांऐवढं प्रेम दुसरं कुणीच करू शकत नाही – Michael Ratnadeepak
11. जर मुलींची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल.
12. मुली एक नाहीतर दोन दोन घरांचं भाग्य असतात.
13. निसर्गाची सर्वात सुंदर रचना म्हणजे मुली आहेत.
14. मुलं भाग्याने होतात पण मुली सौभाग्याने होत असतात.
15. मुलींवर करा प्रेम, कारण त्याच तुमच्यावर करतात उपकार.
Happy Daughters Day Wishes In Marathi | जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आजकाल सोशल मीडियाचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश देण्याची पद्धत रूढ होत आहे. तसंच कन्या दिनानिमित्त गिफ्ट्स ही दिले जातात. यंदाचा कन्या दिन साजरा करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही शुभेच्छा संदेश (Happy Daughters Day Wishes In Marathi) शेअर करत आहोत.
1. एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (National Girl Child Day Status)
2. पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
3. वंशाचा दिवा मुलगा असेल…पण’ती’च नसेल तर दिवा कसा लागेल. कन्या दिनाच्या शुभेच्छा
4. मुली नेहमीच स्पेशल असतात, कारण त्यांच्याशिवाय घराला शोभा नाही. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
5. लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
6. लेक वाचवा, देश घडवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
7. लेक असते ईश्वराचं देणं, तिच्या पाऊलखुणांनी सुखी होईल आमचं जिणं. कन्या दिनाच्या शुभेच्छा
8. जशी सायलीची कळी, सोनचाफ्याची पाकळी तशी माझी…जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
9. स्वागत तुझे मी असे करावे, अचंबित हे सारे जग व्हावे, तुझ्या गोड हास्याने जीवन माझे फुलूनी जावे. कन्या दिनाच्या शुभेच्छा
10. प्रत्येक क्षण आता आनंदाने सजला, तुझ्या रूपाने माझ्या घरी सौख्याचा चरणस्पर्श झाला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
11. सुगंध, प्रेम आणि मुली, हे जिथले असतात तिथे थांबत नाहीत. त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम करा आणि त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
12. प्रत्येक कुटुंबाचं कुळ वाढवतात मुली, पण तरीही का पायाखाली तुडवल्या जातात मुली, मुलींना प्रेम द्या आणि कुटुंबही वाढू द्या. कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
13. घरामध्ये जणू संगीत असतं प्रत्येक क्षणी, जेव्हा मुली पैंजण घालून घरभर चालतात. घरामध्ये प्रसन्नता ही मुलींमुळे असते, कारण त्यांच्यामुळे घरांमध्ये असतो प्रकाश. डॉटर्स डे च्या शुभेच्छा.
14. मुलीला हसताना पाहिलं, तेव्हा मी विचारलं काय झालं. तर म्हणाली बाबांनी मला आज त्यांचा मुलगा म्हटलं आहे. जागतिक कन्या दिवस शुभेच्छा
15. उमलणाऱ्या कळ्या म्हणजे मुली, आईबापांचं दुःख समजणाऱ्या मुली, घराला देतात घरपण मुली, मुलं आज असतील तर येणारं भविष्य आहेत मुली. राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा.
Daughters Quotes In Marathi From Mother | मुलीसाठी शुभेच्छा संदेश
आई आणि मुलीचं नातं हे एक खास नातं असतं. आईचं आपल्या प्रत्येक बाळावर समान प्रेम असतं.मग ती मुलगी असो वा मुलगा. तुम्ही एका मुलीची आई असाल तर हे शुभेच्छा संदेश (Daughters Quotes In Marathi) खास तुमच्यासाठी आहेत.
1. माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
2. तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
3.माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा कन्या दिनाच्या शुभेच्छा
4. इवले इवले हात हलवत मिचकावत होतीस डोळे, तुला कुशीत घेताच स्वर्गसुख मज झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा
5. तू फक्त नाहीस मुलगी तू आहेस श्वास माझा, उद्या जगावर राज्य करशील स्वप्न नाही आहे विश्वास माझा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
6. तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले. कन्या दिनाच्या शुभेच्छा
7. लेक लाडकी या घरची होणार राणी सासरची. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा.
8. माझी लेक माझी सखी परमेश्वराकडे एकच मागणं कधी नको होऊस तू दुःखी. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
9. मुलगा तोपर्यंत माझा आहे जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. पण तु माझी तोवर आहेस जोवर माझं आयुष्य संपत नाही. कन्या दिनाच्या शुभेच्छा (daughters day messages in marathi)
10. लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची. कन्या दिनाच्या शुभेच्छा
11. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
12. लाडाची लेक सोनुली माझी, आता होणार लवकर मीही आजी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
13.भाग्यवान असतात ते लोक ज्यांच्या घरी मुली जन्माला येतात. कन्या दिनाच्या शुभेच्छा
14. एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
15. मुलीचा जन्म म्हणजे आनंदाची उधळण. कन्या दिनाच्या शुभेच्छा
16. हॅपी डॉटर्स डे डीअर, तू आम्हाला नेहमीच अवर्णनीय आणि मोजता येणार नाही असा आनंद दिला आहेस
17. माझ्या गोड मुलीला जागतिक कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, मला तुझी आई असल्याचा खूप खूप अभिमान वाटतो.
18. प्रिय परी, तुला कन्या दिनाच्या खूप शुभेच्छा, तू माझ्यासाठी जणू देवाकडून मिळालेली भेट आहेस
19. कन्या दिवसाच्या शुभेच्छा माझ्या राजकन्येला, मला आशा आहे की, तू अशीच प्रेमळ आणि गोड राहशील सदैव.
20. माझ्या परीराणीला, राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या आईच तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे.
Daughters Quotes In Marathi From Father | बाबांकडून कन्या दिवस शुभेच्छा
बाबा आणि मुलगी हे एक अनोखं आणि खास नातं असतं. कारण असं म्हणतात की वडिलांचं त्यांच्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम असतं. प्रत्येक मुलीलादेखील तिच्या बाबाशिवाय दुसरं कुणीच जास्त आवडत नाही. बाबाच्या कुशीत जितकं सुरक्षित वाटतं तितकं इतर कोणासोबत वाटत नाही. यासाठीच तुमच्या लाडक्या सोनपरीला या कन्यादिनाला हे शुभेच्छा संदेश (Daughters Quotes In Marathi) जरूर द्या.
1. प्रिय सोनु, थोडेच दिवस घरात राहिलीस पण आयुष्याभराच्या आठवणींची साठवण करून गेलीस… राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझा लाडका बाबा.
2. मुलगा जर माझ्या वंशाचा दिवा आहे तर तु माझ्या दिव्याची वात आहेस. कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, तुझा बाबा
3. छोटी छकुली अशी असावी प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा
4. नशिबवान असतात जे लोक ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. कन्या दिनाच्या शुभेच्छा
5. काही झालं तरी मुलीचं पहिलं प्रेम तिचा बाबाच असतो. कन्या दिनाच्या शुभेच्छा बेटा
6. मुलगी जेव्हा घरी जन्माला येते साऱ्या घरात आनंद आणते. कन्या दिनाच्या शुभेच्छा
7. सोड सारी चिंता आनंदात रहा बाळा, तुला रडताना पाहून तुझ्या बाबाचा लागत नाही डोळा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
8. एक तरी मुलगी असावी, छोटूशी पण नखरेल भारी, नाना मागण्या पूरवताना तिच्या बाबाची अशी तारांबळ उडावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
9. लेक अशी असावी की तिच्यासोबत चालताना बापाची कॉलर ताठ असावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
10. बाबाची लाडकी लेक गोडूंली, मोठी झाली सासरी चालली… कसा जगू आता मी तान्हुल्या, बाबाची लाडकी लेक गोडूंली. तुझा बाबा
11. मुलगी आपल्या बापाची लाडकी परीच असते. कन्या दिनाच्या शुभेच्छा
12. जगातील अनमोल रत्न म्हणजे फक्त कन्यारत्न. कन्या दिनाच्या शुभेच्छा
13. एक तरी लेक असावी कच्ची-पक्की पोळी प्रेमाने भरवण्यासाठी. कन्या दिनाच्या शुभेच्छा
14. देव्हारातील चंदन तू, मला मिळालेलं वरदान तू. कन्या दिनाच्या गोड गोड शुभेच्छा
15. लेकीची पसंती कळताच बाबाचं काळीज धडधडतं. चिमुकली घरटं सोडून जाणार म्हणून आतल्या आत बिचारं रडतं. कन्या दिनाच्या शुभेच्छा.
16. मुलीला चंद्रासारखं बनवू नका, ज्यामुळे प्रत्येकजण निरखून बघेल, तिला सूर्यासारखं बनवा म्हणजे प्रत्येकाची नजर झुकेल.
17. मुलींना पृथ्वीवर फक्त प्रेम वाटण्यासाठी पाठवलं गेलं आहे, त्या परी आहेत, त्या अप्सरा आहेत. सर्वांच्या लाडक्या आहेत.
18. मुलगा हा अविवाहीत असेपर्यंत तुमचा असतो. पण मुलगीही आयुष्यभर तुमचीच असते. हे प्रत्येक पिता अभिमानाने सांगू शकतो.
19. हॅपी डॉटर्स डे 2021, तू माझी सर्वात गोड आणि आवडती आहेस, माझी गोडुली.
20. आम्ही दोघेही आईबाप नशीबवान आहोत की, आम्हाला तुझ्यासारखी मुलगी आहे. जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा परी.
कन्यादिनाप्रमाणेच महिला दिन साजरा करण्यासाठी तुमच्या लाडक्या लेकीला द्या या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आणि सुविचार
अधिक वाचा:
आई असते जीव तर बाबा आयुष्याचा आधार….