ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
sabja seeds benefits in marathi

सब्जा खाण्याचे फायदे (Sabja Seeds Benefits In Marathi)

उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे उन्हाची काहिलीदेखील हळूहळू वाढण्यास सुरूवात झाली आहे. उन्हाळा सरू झाला की अनेक आरोग्य समस्या अचानक तोंड वर काढू लागतात. उन्हाचा त्रास सहन न झाल्याने उष्माघाताचा त्रास, उन्हाळे लागणे, अंगाववर घामोळे येणे, उष्णतेचे चट्टे अंगावर उठणे, अंगावर पित्त उठणे, तोंड येणे, कमी भुक, निद्रानाश, सनटॅन, लघवी करताना जळजळ, नाकातून आणि कानातून रक्त येणे, डोळ्यांची जळजळ, मुळव्याध अशा अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. मात्र या समस्यांवर काही घरगुती उपचार नक्कीच करता येतात. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सतत पाणी पिणे, सतत तोंड आणि हात-पाय धुणे, बाहेर जाताना स्कार्फ ,गॉगल, टोपीचा वापर करणे अशा अनेक गोष्टी आपण करतोच. मात्र शरीरातील वाढलेला उष्णतेमुळे होणारा दाह देखील कमी करणे गरजेचे असते. घरातच अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे शरीराला आतुन थंडावा मिळू शकतो. यापैकी एक घरगुती उपचार म्हणजे पाणी अथवा सरबतामधून सब्जा बीचे सेवन करणे.

सब्जाचे बी हे काळसर रंगाचे असून ते तुळशीच्या बीपेक्षा थोडे मोठ्या आकाराचे असते. पाण्यामध्ये भिजवल्यावर हे बी फुगून पांढऱ्या रंगाचे होते. पाणी, सरबतामध्ये मिसळून हे सब्जाचे बी सेवन केल्यास उष्णता कमी होते कारण ते थंड गुणधर्माचे असते. भिजवल्यानंतर सब्जाच्या बीयांमधून पोषक अॅंटी ऑक्सिडंट आणि पाचक गुणधर्म बाहेर पडतात. ज्यामुळे ते पाण्यात भिजवून खाणेच योग्य असते. सब्जाचे बी गोडसर असून भिजवल्यावर ते बुळबुळीत लागते. उन्हाळ्यात घराबाहेर पडताना अथवा भर उन्हातून घरी आल्यावर थंडगार सरबतासोबत सब्जाचे बी घ्यावे. सब्जा खाल्यानंतर पोटामध्ये थंडावा निर्माण होतो. जाणून घ्या सब्जा खाण्याचे फायदे (sabja khanyache fayde) काय आहे

besil seeds 1
सब्जा चे फायदे (Sabja Seeds Benefits In Marathi)

  • मूत्र विसर्जन करताना उष्णतेमुळे होणारा दाह कमी होतो.
  • युरिन इनफेक्शन झाल्यास सब्जाचे बी पाण्यातून घेण्याचा सल्ला दिला जातो.
  • एखाद्या विकारावर घेतलेल्या औषधांमुळे होणारी जळजळ कमी होते.
  • मधूमेहींची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • पोट स्वच्छ झाल्याने अपचन,बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास कमी होतो.
  • सब्जामध्ये भरपूर प्रथिने, लोह ,फायबर भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते.
  • सब्जा बीयांचा त्वचा आणि केसांवरदेखील चांगला परिणाम होतो.

besil seeds

सब्जाचे बी कसे सेवन करावे (How To Eat Sabja)

एका भांड्यामध्ये दोन चमचे सब्जा बी घ्या आणि त्यामध्ये या बीया भिजतील ऐवढे पाणी घाला. पंधरा ते वीस मिनीटांनी बीयांचा आकार फुगून दुप्पट होईल. तुम्ही या बीया पाणी, लिंबूपाणी, मॅंगोशेक,फालुदा, मिल्कशेक, दही अथवा सलाडसोबत तुम्ही खाऊ शकता. शिवाय उन्हाळ्यात घराबाहेर जाताना नेहमी पाण्याच्या बाटलीमध्ये सब्जाचे पाणी अथवा सरबतसोबत ठेवा. ज्यामुळे तुम्हाला उष्माघाताचा त्रास होणार नाही.

besil seeds 3

सब्जाचे बी कोणी सेवन करू नये (Who Should Not Eat Sabja)

लहान मुले आणि गर्भवती महिलांनी सब्जाचे बी सेवन करू नये. कारण सब्जाचे बी सेवन केल्यामुळे गर्भवती महिलांची ऐस्ट्रोजन या हॉर्मोन्सची पातळी कमी होते. जे गर्भाच्या वाढीसाठी मुळीच योग्य नाही. शिवाय सब्जाचे बी थंड गुणधर्माचे असल्यामुळे ते लहान मुलांनादेखील खाण्यास देऊ नये.

ADVERTISEMENT

शिवाय अतीप्रमाणात सब्जाचे बी कोणत्याही व्यक्तीने खाऊ नये. दिवसभरात दोन वेळा दोन चमचे सब्जाचे बी तुम्ही नक्कीच सेवन करू शकता मात्र त्यापेक्षा अधिक सेवन करू नये. कारण कोणताही पदार्थ अधिक प्रमाणात खाल्यास त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीराला भोगावे लागू शकतात.

You Might Like These:

पाणी पिण्याचे हे ‘11’ आश्चर्यकारक फायदे (Benefits Of Drinking Water In Marathi)

घट्ट दही तयार करण्याची घरगुती पद्धत (How to make curd at home)

ADVERTISEMENT

जिरे खाण्याचे फायदे आणि साईड ईफेक्ट्स

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम  आणि शटरस्टॉक

08 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT