ADVERTISEMENT
home / आरोग्य
यासाठी करायला हवी कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ, जाणून घ्या फायदे

यासाठी करायला हवी कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ, जाणून घ्या फायदे

कडूलिंबाचे झाड म्हणजे माणसाला निसर्गाने दिलेलं वरदानच आहे. कारण या झाडाची पाने, फळे, फुले, खोड सर्वच आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. कडूलिंब हे एक औषधी झाड आहे. ज्यामुळे प्राचीन काळापासून कडूलिंबाचा आर्युवेदात औषधासाठी वापर केला जातो. कडूलिंबाची पाने टाकलेल्या पाण्याने अंघोळ करण्याची परंपराही जुनीच आहे. आजकाल वाढत असलेलं इनफेक्शन आणि आजारपण टाळण्यासाठी हा घरगुती उपाय करणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. यासाठीच जाणून घ्या कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे काय काय फायदे होतात. 

कडूलिंबाचे पाणी कसे तयार करावे

एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवावे आणि  त्यामध्ये कडूलिंबाची ताजी पाने टाकावीत. जस जसे पाणी उकळू लागेल तस तसे कडूलिंबाच्या पानांमधी औषधी अर्क या पाण्यात उतरू लागतील. जेवढे पाणी गरम करण्यासाठी ठेवले असेल त्याच्या निमपट पाणी झाल्यावर गॅस बंद करावा आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये हे कडूलिंबाचे पाणी टाकावे. कडूलिंब चवीला कडवट असल्यामुळे कडूलिंबाचे पाणी देखील कडवट चवीचे असते. सहाजिकच अंघोळ करताना ते पाणी तोंडात गेल्यास तुम्हाला ते कडू लागू शकते. मात्र या पाण्यात कडूलिंबाचा अर्क असल्यामुळे त्याने अंघोळ केल्यास तुमच्या आरोग्यावर त्याचा सुपरिणाम होतो. 

कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याचे फायदे

कडूलिंबामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीपॅरासिटीक गुणधर्म असतात. सहाजिकच कडूलिंबाच्या पाण्यामध्ये हे गुणधर्म असतात.

त्वचेच्या समस्या कमी होतात –

भारतात विशेषतः त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी हा घरगुती उपाय केला जातो. भारतात कडूलिंब मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याने कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ करणं सहज शक्य आहे. कोणत्याही फुलाच्या दुकानात तुम्हाला कडूलिंबाची पाने मिळतात. या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेची खाज, घामोळे, रॅशेस, लालसरपणा, सूज अशा अनेक त्वचेच्या समस्या दूर होतात. एका संशोधनानुसार या  पाण्यात कडूलिंबाचे अॅंटि अॅलर्जिक गुणधर्म असतात. ज्यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या पुन्हा होत नाहीत. 

ADVERTISEMENT

शारीरिक थकवा दूर होतो –

आजकाल कामाची दगदग आणि ताणतणाव याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतो. ज्यामुळे सतत अंगदुखी, थकवा जाणवतो. मात्र जर तुम्ही नियमित कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ करत असाल तर तुम्ही कायम फ्रेश राहता आणि अंगदुखी कायमची कमी होते. याचं कारण कडुलिंबामध्ये दाह कमी करणारे गुणधर्म असतात. ज्याचा चांगला परिणाम  तुमच्या स्नायूंवर होतो. शारीरिक थकवा आणि अंगदुखी कमीम करण्यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ नक्कीच करू शकता. 

instagram

इनफेक्शनपासून दूर ठेवते –

त्वचा अस्वच्छ असेल तर बाहेरील विषाणूंचे संक्रमण होण्याची शक्यता वाढते. पण कडूलिंबाचे पाणी तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ आणि शुद्ध करते. या पाण्यामुळे तुमच्या शरीरावरील रोमछिद्रे मोकळी होतात आणि त्वचा खोलवर स्वच्छ होते. ज्यामुळे तुम्हाला पिंपल्स अथवा त्वचेच्या इतर इनफेक्शनचा धोका कमी होतो. कडूलिंबामध्ये अॅंटि एजिंग गुणधर्म असल्यामुळे तुम्ही कायम फ्रेश आणि तरूण दिसता. शिवाय जीवजंतू नष्ट झाल्यामुळे तुमचे आजारपणापासून संरक्षण होते. 

ADVERTISEMENT

कोंड्यापासून सुटका होते –

कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ करताना या पाण्याने केस धुतल्यास तुमच्या केसांच्या समस्याही कमी होतात. जर तुम्हाला  वारंवार कोंडा होण्याचा त्रास होत असेल तर कडूलिंबाच्या पाण्याने केस धुवा ज्यामुळे कोंडा लवकर कमी होईल. याचं कारण कडूलिंबामध्ये अॅंटि फंगल आणि अॅंटि बॅक्टेरिअल गुणधर्म अशतात ज्यामुळे कोंडा आणि केसांच्या इतर समस्या नक्कीच कमी होतात. शिवाय यामुळे स्काल्पला थंडावा मिळतो आणि केसांची वाढ चांगली होते. 

या कारणासाठीच कडूलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा  आणि केसांचे इनफेक्शन नक्कीच टाळता येईल. 

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

कडूलिंबापासून तयार करा हे घरगुती फेस पॅक (Homemade Neem Face Packs)

कडुलिंबाचे फायदे आणि औषधीय गुण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत! (Neem Benefits In Marathi)

कडूलिंबाच्या तेलाचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे (Neem Oil Uses In Marathi)

25 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT