प्रत्येक व्यक्तीला आरोग्यासंदर्भात काहीना काही तक्रारी असतात. मधुमेह, रक्तदाब, गुडघेदुखी, मायग्रेन अशा आरोग्याच्या तक्रारी असणे हे प्रत्येक मानवजातीसाठी स्वाभाविक आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का प्रत्येक राशीनुसार आरोग्यासंदर्भात काहीना काही त्रास प्रत्येकाला असतात. म्हणूनच आज जाणून घेऊया राशीनुसार होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी. तुमच्या राशीनुसार तुम्हालाही होतात का हे त्रास ते वाचा आणि टॅग करा तुमच्या मित्रांना ज्यांना या माहितीची आहे गरज
जाणून घ्या तुमच्या बेंबीच्या आकार काय सांगतो
मेष(Aries)
मेष राशीच्या व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास कायम असतो. त्याकडे दुर्लक्ष केले की, त्यांना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मेष राशीला डोळे आणि कानांच्या समस्या होतात. कान दुखी आणि डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता त्यांना अधिक असते. सतत ताप येणे साथीच्या आजारांचा त्रास होणे हे त्यांचे सतत सुरु असते. याशिवाय हाडांचे काही त्रासही त्यांना होतात.
वृषभ ( Taurus)
वृषभ राशीच्या व्यक्तींना एखाद्या गोष्टीची एलर्जी पटकन होऊ शकते. नाक, घशाचे विकार होण्याची शक्यता त्यांना अधिक असते. सूज येण्याचे त्रास त्यांना अधिक होतात. ताण-तणावाचा त्रास त्यांना अधिक होते. मानसिक ताणाकडे वृषभ राशीच्या व्यक्तींनी दुर्लक्ष करु नये कारण त्याचा अधिक त्रास त्यांना होऊ शकतो. वृषभ राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या ताण-तणावाकडे दुर्लक्ष करु नये कारण त्याचा त्रास त्यांना जास्त होऊ शकतो.
मिथुन ( Gemini)
मिथुन राशीच्या व्यक्तींना सतत सर्दी, पडसं,खोकला, शिंका होण्याचा त्रास होतो. एखाद्या व्यक्तीला याचा सतत त्रास होत असेल तर ती व्यक्ती ही मिथुन राशीची आहे हे ओळखावे. खांदे दुखी, सांधेदुखीचा त्रास त्यांना अधिक होतो. या व्यक्ती काहीही केले की लगेच थकतात. त्यांची एनर्जीही लगेच कमी होते.
सिंह ( Leo)
सिंह राशीच्या व्यक्ती या भरपूर पाणी पितात तरी देखील या व्यक्ती लगेच नरम पडतात. या व्यक्तींचा डाएट हा फारचांगला असला तरी त्यांना काही त्रास होतात. या व्यक्तींना अपचनाचा त्रास होण्याची जास्त शक्यता असते. ह्रदय रोगाशी संदर्भात काही त्रास होण्याची यांना दाट शक्यता असते. सिंह राशीच्या लोकांना उशीरा मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या व्यक्तीचा कोटा हा मुळीच चांगला नसतो. पचनासंदर्भात यांना अनेक त्रास असतो. या व्यक्तींचे वजन लगेच वाढते. हे वजन कमी करणे यांच्यासाठी कठीण असते.या लोकांनी कितीही चांगला आहार घेतला किंवा यांचे पोट कितीही साफ असले तरी अशा लोकांना वरच्या वर पचनासंदर्भात त्रास होतोच.मज्जारज्जू संदर्भातील त्रासही होण्याची शक्यता असते.
2021 मध्ये लग्न करायचा असेल विचार तर यावर्षी आहेत 50 मुहूर्त
तूळ ( Libra)
तूळ राशीच्या व्यक्ती या फारच फुडी असतात. सतत चमचमीत खाणं यांना खूप आवडतं. गोड पदार्थ हे यांच्या आवडीचे पदार्थ त्यांच्याशिवाय यांना मुळीच जमत नाही. पौष्टिक खायला आवडत नसल्यामुळे अशा व्यक्तींची प्रतिकारशक्ती ही फार कमी असते. त्यामुळे या राशीचे लोक वरचेवर आजारी पडतात. त्वचेसंदर्भातील तक्रारीही या राशीच्या लोकांना जाणवतात. आरोग्याच्या तक्रारीमुळे यांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो.
वृश्चिक ( Scorpio)
सगळ्या गोष्टींचे सतत टेन्शन घेणारी रास म्हणजे वृश्चिक रास. ही रास बरेचदा खाते ते केवळ ताण-तणावामुळे. या व्यक्ती किती खातात याचा अंदाज त्यांना मुळीच येत नाही. त्यामुळे पोटासंदर्भातील आणि मूत्राशयासंदर्भातील अनेक आजारांना ते बळी पडतात. नाकाशी संबधित अनेक विकार त्यांना होतात.
धनु( sagittarius)
धनु राशीच्या व्यक्ती या नेहमी चार्ज असतात. त्यांना सतत काहीना काही करायचे असते.फिटनेस बाबतीत त्यांचा इतका उत्साह असतो की, त्यामध्ये त्यांचे वजन कधी वाढते त्यांचे त्यांनाच कळत नाही. हे वजन कमी करता करता त्यांना आणखी काही त्रास होऊ लागतात. मांड्या आणि कंबरेचे त्रास या लोकांना जास्त होतात.त्वचाविकाराचाही त्रास या लोकांना असतो.
मकर (Capricorn)
मकर राशींच्या लोकांचा खाणे हा आवडीचा विषय. खात राहणे या लोकांना खूप आवडते. पण तरीही त्यांच्यामध्ये कॅल्शिअमची कमतरता असते. त्यामुळे अशा लोकांना हाडांसंदर्भात त्रास होण्याची शक्यता असते. हात पाय दुखणे, सांधेदुखी ही या लोकांना अगदी हमखास जाणवते. केस आणि नखांसंदर्भातही या लोकांना त्रास असतात.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या व्यक्ती या चहा आणि कॉफी पिण्यास माहीर असतात. या राशीच्या लोकांना नवं काही खायला अजिबात आवडत नाही. तेच तेच खायला त्यांना आवडते. या राशीच्या लोकांना पायासंदर्भात त्रास असतात. पायाचा घोटाल लचकणे तो फ्रॅक्चर होण्याची शक्यता या राशीच्या लोकांना अधिक असते. रक्ताभिसरणासंदर्भातील आजारही या लोकांनी होतात.
मीन (Pisces)
सतत मीठ खाणे या लोकांना आवडते. जर या लोकांनी मीठ खाणे आणि अति दारु पिण्याची सवय सोडली तर त्यांना आरोग्याच्या फारशा तक्रारी जाणवणार नाहीत. कफ होण्याची शक्यता यांना अधिक असते. सांधेदुखीचा त्रासही यांना वरचेवर होतो.
हा आहे प्रत्येक राशीनुसार होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी. राशीनुसार तुम्हालाही हे त्रास होतात का हे आम्हाला कळवा.
कसे जाईल 2021 हे वर्ष, कोणत्या राशींसाठी आहे लाभदायक घ्या जाणून (Rashi Bhavishya 2021)