ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
health matching is important

विवाह जुळवताना पत्रिकेपेक्षा ‘आरोग्य पत्रिका’ अधिक महत्त्वाची, घ्या जाणून

विवाह (Wedding) हा एक संस्कार मानल्या जाणार्‍या भारतीय संस्कृतीत लग्न जुळविण्याच्या वेळी मुहूर्त, जन्मपत्रिका, गुण, कुंडली (Kundli) यांना विशेष महत्त्व असते. सोबत घर, नोकरी, आर्थिक स्थिती, कुटुंब याबद्दलही माहिती घेतली जाते. लग्नयोग म्हणजे नक्की काय आणि हे जुळविण्यसाठी या गोष्टी पाहिल्या जातात. या गोष्टींसह अजून एक महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे भावी जोडीदाराचे मानसिक आणि शारीरीक स्वास्थ. पूर्वीच्या काळी लग्नापूर्वी आरोग्याबाबत साधला जाणारा संवाद, माहिती याचे प्रमाण क्वचित होते. पण 21व्या शतकात या मुद्यांबाबत जनजागृती झाली आहे. सकारात्मक बाब म्हणजे, भावी जोडपी भेटताना ब्लड ग्रुप किंवा आरोग्यनिगडीत समस्यांबाबतीत चर्चा करत आहेत. पण एचआयव्ही, एसटीडी या चाचण्यांबाबत मोकळेपणाने अद्यापही बोलले जात नाही. प्रत्यक्षात या चाचण्या करून घेण्यास उदासिनता दिसून येते. उदाहरण द्यायचं झालं तर साधारणत: 10 पैकी 2 ते 3 जण वैद्यकीय चाचणी करतात. स्ट्रेस, हृदयविकार, मधुमेह किंवा इतर आरोग्य निगडित समस्या असतील…त्याचे वेळीच निदान झाले, योग्य उपचार घेतले तर नात्यात आपसूकच एक सामंजस्यपणा, विश्वास निर्माण होतो.

आरोग्याच्या दृष्टीने चाचण्या का आहेत आवश्यक

अपत्याच्या आरोग्याच्या दृष्टीने काही चाचणी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे लग्नाआधी मुला-मुलींनी एकमेकांशी आहे ते स्पष्ट बोलावे, संवाद साधावा. कोणतीही कुंडली जुळण्यापेक्षा आरोग्याची पत्रिका जुळणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून लग्नानंतर आरोग्यविषयक समस्या टळू शकतात. कोणते आजार अनुवंशिक आहेत, कोणत्या आजारांमुळे अपत्यांवर परिणाम होऊ शकतो, वेळीच निदान केल्यास आजार पूर्ण बरे होऊ शकतात अशा मुद्यांबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. ‘लग्नापूर्वी वैद्यकीय चाचणी’ या गोष्टीकडे बदलत्या काळानुसार आणि बदलानुसार पाहणे, स्वीकारणे गरजेचे आहे असे मत ऋषिकेश कदम, संचालक, पवित्रविवाह संस्था यांनी या महत्त्वाच्या विषयावर आमच्याशी बोलताना व्यक्त केले. सध्याच्या जगात पत्रिका जुळण्यापेक्षाही आरोग्याची काळजी आणि एकमेकांचे विचार अधिक जुळणे महत्त्वाचे आहे असंच म्हटलं जातं. सध्या अनेक घरांमध्ये हीच शिकवण अगदी पहिल्यापासून दिली जाते. त्यामुळे मुलगा असो वा मुलगी असो दोघांचाही या गोष्टीचा बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. लग्न करण्यापूर्वी नक्की कोणकोणत्या चाचण्या वर आणि वधू दोन्ही पक्षांकडून करून घेणे आवश्यक आहे ते प्रत्येकाला माहीत असायला हवे. अरेंज मॅरेज असो अथवा लव्ह मॅरेज दोन्ही लग्नांमध्ये या चाचणी करून घेणे हे आवश्यक आहेच. लग्न विधी होण्याआधी हे विधी करून घ्यायला हवेत.

कोणत्या वैद्यकीय चाचणी करून घेणे आवश्यक!

* रक्तगट चाचणी (Blood Group Compatibility Test) – दोघांच्या रक्तगटात आरएच घटक समान असणं आवश्यक आहे.

* रक्त विकार चाचणी (Blood Disorder Test) –  यामुळे हिमोफीलिया किंवा थॅलेसेमिया आहे का, याची माहिती मिळते. याचा थेट परिणाम अपत्यांवर होतो. त्यामुळे दोघांनी ही चाचणी करावी.

ADVERTISEMENT

* अनुवंंशिक चाचणी (Genetic Test) – ही चाचणी केल्यामुळे भावी जोडीदाराला कोणता अनुवंशिक आजार आहे का, याची खात्री करता येईल. कोणताही आजार आढळल्यास त्यावर वेळेत उपचार करता येतो.

* एसटीडी चाचणी (STD Test) – दोन्ही जोडीदारांनी ही टेस्ट करावी. जेणेकरून लग्नानंतर लैंगिक संसर्गाला कोणी सामोरे जाणार नाही.

* एचआयव्ही चाचणी  (HIV Test) – दोन्ही जोडीदारांपैकी एका कुणाला एचआयव्ही असल्यास दुसर्‍यालाही त्याचा संसर्ग होतो. त्यामुळे ही चाचणी दोन्ही जोडप्यांनी आवर्जून करावी. 

एकमेकांना समजून घेताना या गोष्टींचाही तितकाच विचार व्हायला हवा आणि बिनधास्तपणे एकमेकांशी यावर चर्चा करून लग्न जुळवताना या चाचण्या करून घ्यायलाच हव्यात हे नक्की. भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी या गोष्टी नक्कीच आवश्यक आहेत. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT