गुलाबी थंडीत मस्त दुलई अंगावर गुंडाळून, शेकोटी भोवती गप्पा मारत गरमागरम सूप पिणं ही एक भन्नाट कल्पना असू शकते. तेव्हा यंदा थंडीत हा प्लॅन करायला काहीच हरकत नाही. मस्त सुट्टीच्या दिवशी घरात असा प्लॅन करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत काही हेल्दी सूप रेसिपीज शेअर करत आहोत. कारण गरमागरम सूप हिवाळ्यामध्ये शरीर उबदार ठेवण्यास मदत करते. या रेसिपीज आपल्यासोबत शेअर केल्या आहेत शेफ नेहा दीपक शाह, शेफ सब्यसाची गोराय आणि शेफ वरूण इनामदार यांनी…
पर्पल कॅबेज वॉलनट सूप – शेफ नेहा दीपक शाह
साहित्य –
- १/२ लहान कांदा
- २ लसणाच्या पाकळ्या
- १/४ कप अजवाइन किंवा धण्याची मुळे किंवा पात
- १ तेजपत्ता
- १/२ कप कॅलिफोर्निया अक्रोड
- २ ते ३ कप भाजीचा रस्सा किंवा पाण्याने भरलेले स्टॉक क्यूब
- १ लहान बटाटा (उकडून किसलेला)
- १ चमचा ऑलिव्ह तेल किंवा लोणी
- मीठ व काळीमिरी
- चिरलेली ताजी औषधी वनस्पती (पार्स्ली, कोथिंबीर व ओवा)
- १/४ चमचा अॅप्पल सायडर विनेगार
टॉपिंग –
- सफरचंदाचे तुकडे
- तुकडे केलेले कॅलिफोर्निया अक्रोड
- भाजलेले पिटा चिप्स
- गार्लिक चिप्स
- हर्ब्स
- चिली फ्लेक्स
कृती –
कढईमध्ये तेल किंवा लोणी गरम करा आणि त्यामध्ये तेजपत्ता, कांदा, लसूण टाकून काही मिनिटे शिजवा.
त्यामध्ये बैंगनी कोबी, मीठ, कॅलिफोर्निया अक्रोड, व्हिनेगर टाका आणि कोबी मऊ होईपर्यंत शिजवा. त्यानंतर काही मिनिटांसाठी मिश्रण झाकून ठेवा.
भाजीचा रस्सा टाका आणि पूर्णपणे मऊ होईपर्यंत १५ मिनिटांसाठी भाज्या शिजवा. किसलेला बटाटा, मसाल्यांसह मीठ, काळीकिरी व हर्ब्स योग्य प्रमाणात टाका.
या सूपला उत्तमरित्या तयार करा आणि कॅलिफोर्निया अक्रोड, गार्लिक चिप्स, डिहायड्रेटेड अॅप्पल चिप्स व ओव्यासह टॉपिंग करत गरमागरम सर्व्ह करा.
दहीचे तुर्किश वॉलनट सूप – शेफ सब्यासाची गोराय
साहित्य –
- १ कप कवच काढलेले अक्रोड
- १ चमचा ऑलिव्ह तेल
- ३ चिरलेले लहान कांदे
- ३ तुकडे केलेल्या लसणाच्या पाकळ्या
- २ संत्री, पिळून रस काढलेले
- १ चिमूटभर दालचिनी
- ४ कप भाज्या
- १/२ कप दही
- चवीसाठी मीठ व काळीमिरी
- १/४ कप बारीक केलेली पार्स्ली
कृती –
मध्यम आचेवर कढईमध्ये अक्रोड भाजून घ्या, सोनेरी तपकिरी रंग व सुगंध येईपर्यंत ढवळत राहा. भाजलेले अक्रोड थंड होण्यासाठी कढईमधून एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि दाणे बारकाईने कापून घ्या.
मध्यम आचेवर कढईमध्ये ऑलिव्ह तेल गरम करा. त्यामध्ये लहान कांदे व लसूण टाका आणि कांदे मऊ होण्यापर्यंत, तसेच रंग बदलेपर्यंत जवळपास ३ मिनिटे शिजवा. त्यामध्ये तुकडे केलेले अक्रोड, संत्र्याचा झेस्ट, संत्र्याचा रस व दालचिनी टाका आणि मिश्रण १ मिनिटापर्यंत गरम करा.
मिश्रण १ कप भाज्यांसह ब्लेण्डर किंवा फूड प्रोसेसरमध्ये भरडून घ्या. कढईमध्ये सूप तयार करण्यासाठी उर्वरित ३ कप भाज्या घ्या.
मिश्रण मंच आचेवर ४ ते ५ मिनिटे गरम करा. गरम करणे थांबवा आणि त्यामध्ये दही व चवीनुसार मीठ, काळीमिरी टाका. तुकडे केलेल्या पार्स्लीसह सुशोभित करा.
कॅलिफोर्निया वॉलनट्स मानीपुरी टुकपा – शेफ वरूण इनामदार
साहित्य –
- १ कप शिजवलेले नूडल्स
- १ चमचा शेजवान सॉस
- १ कप बारीक तुकडे केलेले सोयाबीन
- १ कप गाजर, पातळ लांब तुकडे केलेले
- ४ कप चिकनचे तुकडे
- १ चमचा काळीमिरी
- चवीनुसार मीठ
- ८ चिकन मोमोज (पर्यायी)
- १/४ कप कॅलिफोर्निया अक्रोड, तुकडे केलेले
कृती –
कढई गरम करा आणि त्यामध्ये चिकनचे तुकडे टाका.
मीठ व काळीमिरीसह गरम करा.
त्यामध्ये मोमोज, नूडल्स, भाज्या, शेज्वान सॉस टाका आणि ३ मिनिटांसाठी गरम करा.
कॅलिफोर्निया अक्रोड टाकत गरमागरम सर्व्ह करा.
अधिक वाचा –
दहीभात खाण्याचे फायदे आणि झटपट रेसिपी