ADVERTISEMENT
home / मनोरंजन
हिना खानने नाईट ड्रेस घालून केला हॉट व्हिडिओ शेअर, ट्रोलर्सचे तोंड केले बंद

हिना खानने नाईट ड्रेस घालून केला हॉट व्हिडिओ शेअर, ट्रोलर्सचे तोंड केले बंद

अभिनेत्री हिना खान रोज आपल्या सोशल मीडियावर कोणता ना कोणता फोटो अथवा आपला व्हिडिओ पोस्ट करत असते. आपल्या चाहत्यांना या लॉकडाऊनच्या काळात हिनाने चांगलंचं व्यग्र ठेवलं आहे. अनेक सेलिब्रिटीजने या लॉकडाऊनमध्ये  आपल्या तब्बेतीकडे लक्ष देत सर्वात जास्त महत्त्व दिलंय ते फिटनेसला आणि यामध्ये हिनाचं नाव सर्वात पुढे घ्यावं लागेल. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंंटवर हिना सतत आपल्या वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असून आपली टोन्ड बॉडीही दाखवत असते. त्यावरूनच काही दिवसांपूर्वी असे व्हिडिओ पोस्ट न करण्याबाबत तिला काही ट्रोलर्सने सांगितले होते. मात्र आता हिनाने कोणालाही न जुमानता नाईटी घालून एका इंग्रजी गाण्यावरील तिचा व्हिडिओ पोस्ट करत ट्रोलर्सकडे आपण लक्ष देत नसल्याचाच इशारा देत त्यांचं तोंड बंद केलं आहे. 

हिना खानवर चिडले फॅन्स म्हणाले, असे व्हिडिओ टाकू नकोस

चाहत्यांना आवडतोय हिनाचा हॉट अंदाज

हिना खान ही लहान पडद्यावरील प्रेक्षकांची सर्वात आवडती अभिनेत्री आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हिनाचे अनेक चाहते आणि फॉलोअर्स आहेत आणि त्यांना  ती कधीही नाराज करत नाही. हिनाच्या कपडे घालण्यावरून ती बऱ्याचदा ट्रोल होत असते. मात्र ती तितक्याच बिनधास्तपणे पुन्हा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने आपल्या व्यक्तीगत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काळ्या हॉट नाईटीमधील आपला डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून  तिच्या चाहत्यांना तिचा हा हॉट अंदाज चांगलाच आवडला आहे. काही वेळातच तिच्या या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत. हिनाने  ही घातलेली नाईटी जितकी हॉट आहे तितकीच हिनाने स्टाईलचा विचार करत यावर स्लीपर्स घालून आपण खूपच कम्फर्टेबल असल्याचेही दाखवून दिले आहे. एका इंग्रजी गाण्यावर हिना नाचत असतानाचा हा व्हिडिओ आहे. 

हिना खानने सौंदर्याच्या बाबतीत दिली कतरिना कैफला मात

ADVERTISEMENT

हॉट फोटोही केला शेअर

याशिवाय तिने अजून एक हॉट फोटो शेअर केला असून करड्या रंगाच्या या ड्रेसमध्ये हिनाने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळच केले आहे. केस मोकळे सोडून गडद रंगाची लिपस्टिक लावलेली हिना यामध्ये खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत असून या फोटोवरही तिला अनेकांंनी कमेंट्स देत ती खूपच हॉट दिसत असल्याचे सांगितले  आहे. केवळ तिचे चाहतेच नाही तर इंडस्ट्रीतल्या तिच्या काही मित्रमैत्रिणींनीही तिला या फोटोवर कमेंट दिली असल्याचे दिसून येत आहे. हिनाला आतापर्यंत तिच्या कपडे घालण्यावरून आणि अशा वागण्यावरून बऱ्याचदा ट्रोल करण्यात आले आहे. मात्र हिना तितक्याच आत्मविश्वासाने पुन्हा ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी सज्ज असते आणि ती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सतत अॅक्टिव्ह असून सतत आपले व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. जेणेकरून जास्तीत जास्त चाहत्यांपर्यंत ती पोहचू शकेल आणि ट्रोलर्सचे तोंड बंद होऊ शकेल. हिनाची काही दिवसांपूर्वीच कुशल टंडनसह एक वेबसिरीज येऊन गेली असून तिच्या कामाची खूपच प्रशंसा झाली होती. हिना खानचे अनेक फॉलोअर्स आहेत आणि आता लवकरच त्यांना  पुन्हा एकदा हिनाला लहान अथवा मोठ्या पडद्यावर बघायची इच्छा आहे. त्यामुळे आता तिचे कोणते नवे प्रोजेक्ट असणार आहेत याबद्दल सर्वांनाच उत्सुकता असून ती याबाबत कधी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

KKK10 : करिष्मा तन्ना ठरतेय भारी, फायनलमध्ये तगडी टक्कर

22 Jul 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT