ADVERTISEMENT
home / Festival
होळीचं सामाजिक आणि मानवजातीसाठी असलेलं महत्त्व

जाणून घ्या होळीचं सामाजिक आणि मानवजातीसाठी असलेलं महत्त्व

होळी म्हणजे होलिकादहन, रंगांची उधळण आणि पुरणपोळीचा मस्तपैकी बेत असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण होळीचं महत्त्व एवढ्यापुरतंच मर्यादित नाही. होळी सणाबाबतचे पौराणिक आणि सांस्कृतिक दाखलेही आहेत. तसंच होळी हा सण आपल्या समाजाच्या एकजुटीसाठी आणि आरोग्यासाठीही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. आश्चर्य वाटलं असेल ना. मग कसं ते जाणून घेऊया.

होळीचं सामाजिक महत्त्व

होळीच्या निमित्ताने आपण एकत्र येतो. प्रत्येकाला रंग लावणे आणि होळीच्य शुभेच्छा देणे हे सर्व आपल्या समाजाताली घटकांना एकत्र आणून एकजूटीच वातावरण निर्माण करण्यास मदत करतं. भारतात होळी हा सण फक्त हिंदूच नाहीतर इतरही धर्माचे लोक अगदी सहजतेने साजरा करतात आणि या रंगोत्सवात आनंदाने सहभाग घेताना दिसतात. होळी ही फक्त मित्र परिवारापुरतीच मर्यादित नसते. तर होळीच्या निमित्ताने आपण आपल्या शत्रूंशी असलेलं वैर विसरून पुन्हा एकत्र येण्याची संधी आहे. तसंच या सणाच्या निमित्ताने गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव ही दूर होऊन सगळेच सण साजरा करतात. होळीला मित्र, नातेवाईक आणि कुटुंबिय एकमेंकाना भेटवस्तू आणि होळीची खास मिठाई देतात. यामुळे नात्यांमधील भावनिक बंधही दृढ होतात. तर हे झालं होळीचं सामाजिक महत्त्व. आता पाहूया मानवजातीसाठी असलेलं रंगपंचमीचं काय महत्त्व आहे.

ADVERTISEMENT

होळी आणि आपण

आपण आपल्या पूर्वजांचे आभार मानले पाहिजेत. ज्यांनी हा होळी साजरी करण्याचा पायंडा घातला. कारण होळी हा सण वैज्ञानिकरित्याही अगदी योग्यवेळी साजरा केला जातो. तेही इतकी धमाल आणि आनंदाची पर्वणी हा सण आणतो. होळी वर्षाच्या अशा वेळी येते जेव्हा लोकांना वातावरणातील बदलामुळे थोडा आळस जाणवू लागलेला असतो. कारण हिवाळा संपून उन्हाळ्याची नुकतीच सुरूवात झालेली असते. होळीच्या गाण्याच्या निमित्ताने त्यांच्यात उत्साह निर्माण होतो आणि सगळ्यांमध्ये उर्जेचं वातावरण तयार होतं.

होळीचा आरोग्यावरील सकारात्मक परिणाम

रंगांची उधळण आणि आपण

होळीत होणारी रंगांची उधळणसुद्धा आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते. शास्त्रज्ञांच्या मते लिक्वीड डाय आणि अबीर आपल्या शरीरात शोषले जातात. काहींच्या मते, रंगांमध्ये खेळल्यामुळे आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे आपल्या आरोग्य आणि सौदर्यात वाढच होते.

ADVERTISEMENT

होळी आणि वातावरणातील बदलांचा अनोखा मेळ

होळी आणि वातावरणातील बदल

होळी साजरी करण्याचं अजून एक कारण म्हणजे हिवाळा आणि उन्हाळ्याच्या बदलत्या वातावरणात आणि आपल्या शरीरातही अनेक जीवाणू तयार होतात. होलिकादहनामुळे तापमान वाढते. जेव्हा होलिकादहनाजवळ लोक परिक्रमा करतात तेव्हा आपोआप उष्णतेमुळे शरीरातील जीवाणू नष्ट होतात. तसेच वातावरणही स्वच्छ होते. होळी दहनानंतर अनेक ठिकाणी उरलेल्या राखेनेही रंगपंचमी खेळली जाते. रंगपंचमीच्या शुभेच्छा देऊ काही ठिकाणी या राखेने टिळा लावला जातो. तेही आरोग्यासाठी चांगल मानलं जातं. काही ठिकाणी होळीच्या निमित्ताने घरात आणि आसपासच्या परिसरात साफसफाईही केली जाते. ज्यामुळे धूळ आणि डास व इतर कीटाणूंची सफाई होते.

होळीचं बदलतं स्वरूप

ADVERTISEMENT

होळी सेलिब्रेशनमधील चांगले बदल

सध्या होळी पारंपारिक साजरी करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल आपल्याकडून केले जात आहेत. जे पर्यावरणासाठीही नक्कीच स्वागतार्ह आहेत. जसं रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करणे, कोरडी होळी खेळणे, होलिकादहनात कमीतकमी लाकडांचा वापर करणे. सर्व समाजघटकांना एकत्र येऊन हा सण साजरा करण्यावर भर देणे. होळीच्या निमित्ताने पाळीव किंवा भटक्या प्राण्यांना इजा होऊ नये याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत आहे.

खरंच अशाप्रकारे आपण नेहमी होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा केला तर तो आपल्या मानवजातीसाठी वरदानच ठरेल यात शंका नाही.

18 Mar 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT