होळीच्या निमित्ताने सर्वांकडेच पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि त्यासोबतच केली जाते कटाची आमटी. पण दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला काय गोड बनवायचं हा प्रश्न गृहीणीपुढे असतो. तुमच्यापुढेही हाच प्रश्न आहे का? आता चिंता नको.. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास फ्युजन रेसिपीज. या रेसिपीज आहेत होळीलाच बनणारे काही खास पदार्थ पण त्यांच्या रेसिपीजला देण्यात आला आहे ट्वीस्ट. या सणाच्या निमित्ताने पारंपारिक होळी रेसिपीज म्हणजे खास पुरणपोळी, गुजिया आणि थंडाईला द्या नवं रूप आणि घरच्यांनाही द्या आश्चर्याचा धक्का.
या हटके रेसिपीज सांगत आहेत, मास्टर शेफ अजय चोप्रा, हॉटेल व्हाईट चारकोल [The Empresa Hotel]. चला तर मग पाहूया या फ्यूजन रेसिपीज.
साहित्य – 1 /2 kg चणाडाळ
¼ kg गूळ
50 gm व्हीपड क्रीम
वेलची पावडर 1tspn
चिमूटभर नटमेग पावडर
रबडी 50 ml
चणाडाळ अर्धवट शिजवून घ्या नंतर त्यात गूळ घालून पूर्ण शिजवा. या मिश्रणातील पाणी काढून पुन्हा थोडा गूळ घालून मंद आचेवर शिजवा. आता त्यात वेलची आणि नटमेग पावडर घाला आणि चांगलं मिक्स करा. चांगली पेस्ट बनवा. नंतर त्यात व्हीप्ड क्रीम आणि रबडी घाला. चांगल घोटून घ्या आणि फ्रीजरमध्ये 15 ते 20 mts सेट करण्यासाठी ठेवा. नंतर बाहेर काढून केशर घालून सजवा.
वाचा – होळी-रंगपंचमी सणाला आणतील बहार ही मराठमोळी गाणी
साहित्य : दूध 500 ml
साखर 50 gms
थंडाई मसाला 40ml.
चायना ग्रास 3 teaspoons.
व्हीपिंग क्रीम 50 gm.
बारीक चिरलेले ड्रायफूट्स 50 gms.
केशर 2 to 3 springs.
ब्राऊनी स्पाँज 50 gms.
वाचा – बुरा न मानो, होली है! होळीच्या शुभेच्छा संदेश
चायना ग्रास पाण्यात विरघळवून घ्या. दूध एका पातेल्यात अर्ध आटेपर्यंत उकळवा. आटल्यावर त्यात साखर आणि चायना ग्रास मिक्स करा. चांगली उकळी येऊ द्या. नंतर त्यात थंडाई मसाला घाला आणि चांगल घट्ट होईपर्यंत उकळवा. एकदा हे मिश्रण घट्ट झाल्यावर गॅसवरून उतरवून थंड करून घ्या. आता यामध्ये व्हीप्ड क्रीम घाला आणि फ्रीजमध्ये ठेवा. ब्राऊनी स्पाँजवर हे थंडाई मूस सेट करा आणि परत फ्रीज करा. गारेगार मूस सर्व्ह करताना सुकामेव्याने गार्निश करा.
साहित्य – सारणासाठी
प्रून्स 50 gms.
अॅप्रिकॉट 50 gms.
खवा 100 gms
मऊ मोझरेल्ला 50 gms
वेलची पावडर 10 gms.
ब्राऊन शुगर 50 gms.
1 teaspoon बारीक चिरलेले बदाम
रबडी 50 gms
खस आणि रोझ सिरप 1tspn प्रत्येकी
केशर 2 काड्या
पारीसाठी – फायलो शीट्स (Phyllo sheets) : 4 nos.
वाचा – रंगपंचमीची संपूर्ण माहिती
साखर, वेलची पावडर आणि बारीक चिरलेले बदाम मिक्स करा. नंतर खवा भाजून घ्या आणि त्यात हे मिश्रण चांगलं मिक्स करा. प्रून्स आणि अॅप्रिकॉट साधारण आकारात कापून या मिश्रणात घाला.
फायलो शीट पसरवून त्या चौकोनी आकारात कापून घ्या. आता त्या वरील मिश्रण भरून करंजी किंवा गुजियासारखा आकार देऊन बंद करा. नंतर 160 f तापमानावर 6 ते 8 mts बेक करा. दुसरीकडे रबडी केशर, रोझ सिरप आणि खस सिरपने फ्लेवर्ड करून घ्या. नंतर या बेक्ड गुजिया फ्लेवर्ड रबडी सॉससोबत सर्व्ह करा.
सगळ्यांना होळी आणि रंगपंचमीच्या खूपखूप शुभेच्छा.
हेही वाचा –
होळीच्या दिवशी धमाल करण्यासाठी बॉलीवूडची टॉप 16 होळीची गाणी
रंगपंचमी खेळण्याआधी आणि नंतर कशी घ्याल केस आणि त्वचेची काळजी
DIY: रंगपंचमीसाठी बनवा नैसर्गिक रंग जे तुम्हाला देतील नैसर्गिक ग्लो