ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
कडक उन्हामुळे त्वचा कोरडी आणि काळसर झाली असेल तर करा हे घरगुती उपाय

कडक उन्हामुळे त्वचा कोरडी आणि काळसर झाली असेल तर करा हे घरगुती उपाय

उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा आणि असह्य उकाडा. उन्हाळ्यात मुंबईतील तापमान जास्त असल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. शिवाय कामाची घाई असल्यामुळे दैनंदिन कामासाठी सतत बाहेर जावंच लागतं. अशा कडक उन्हात फिरल्यामुळे आरोग्य समस्या तर होतातच पण त्वचेच्या समस्याही निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेऊनही बऱ्याचदा सनबर्न, सनटॅन, उष्णतेमुळे त्वचा कोरडी होऊन फुटणे अशा समस्या डोकं वर काढतात. जर या गंभीर परिणामांपासून त्वचेचं संरक्षण करायचं असेल तर काही घरगुती उपाय नक्कीच करायला हवेत. 

घरातून बाहेर पडण्यापूर्वी हे कराच

उन्हाळ्यात त्वचेचं संरक्षण करण्याचा उत्तम उपाय म्हणजे घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रिन लावणं. त्यासोबत सुती आणि संपूर्ण अंग झाकतील असे आरामदायक कपडे वापरा. ज्यामुळे तुमच्या अंगातून निघणारा घाम सुती कपडे शोषून घेतील आणि तुम्हाला फार गरम होणार नाही. टोपी, गॉगल, चांगले फूटवेअर, स्कार्फ, छत्री वापरून तुम्ही तुमच्या त्वचेची निगा राखू शकता. यासोबतच काही घरगुतीउ उपाय करायला विसरू नका.

काकडीचा रस

उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी तुमच्या आहारात काकडी असणं गरजेचं आहे. मात्र या काकडीचा रस तुम्ही तुमच्या त्वचेवर लावून त्वचेवर झालेले सनटॅनचे डाग देखील कमी करू शकता. काकडीच्या रसामुळे त्वचा स्वच्छ होते आणि काळसरपणा कमी होतो. यासाठी काकडी किसून तिचा रस काढा आणि त्यात गुलाबपाणी मिसळून कापसाच्या मदतीने त्वचेवर लावा. स्वयंपाक घरातील काकडीचे फायदे (Benefits Of Cucumber In Marathi)

लिंबाचा रस

लिंबाच्या रसात क्लिंझिंग घटक असल्याने या रसामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे त्वचेसाठी उत्तम ठरतं. अॅंटि ऑक्सिडंट असल्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या कमी होतात. उन्हामुळे त्वचेवर निर्माण झालेला काळसरपणा कमी करण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. यासाठी लिंबाच्या रसात थोडं मध आणि गुलाबपाणी मिसळा आणि त्वचेवर लावा. पंधरा मिनिटांनी त्वचा स्वच्छ करा. सोबतच वाचा त्वचेसाठी लिंबाचा वापर आणि त्याचे होणारे अप्रतिम फायदे – How To Use Lemon For Face

ADVERTISEMENT

बटाट्याचा रस

बटाट्यामध्येही त्वचा मुळापासून स्वच्छ करणारे गुणधर्म असतात. त्वचेचं टेक्स्चर सुधारण्यासाठी आणि त्वचेला उजळपणा येण्यासाठी तुम्ही बटाट्याचा रस त्वचेवर लावू शकता. उन्हामुळे रापलेले हात, पाय आणि चेहरा यामुळे नक्कीच उजळून निघतो. बटाट्याच्या रसामध्ये थोडं गुलाबजल मिसळून त्वचेवर लावा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.यासोबतच ट्राय करा Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड

29 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT