सौंदर्याची निगा राखणं म्हणजे डोक्यावरच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत काळजी घेणं. बऱ्याचदा चेहरा आणि हात-पायाची काळजी घेतली जाते. मात्र पायाच्या टाचा मात्र नियमित स्वच्छ केल्या जातात असं नाही. पायात पैजण अथवा हिल्सचे फूटवेअर घालताना मग अचानक पायाच्या टाचा काळवंडल्याचे तुमच्या लक्षात येते. चालताना सतत मातीचा स्पर्श झाल्यामुळे तुमच्या पायाच्या टाचा काळ्या पडतात. कधी कधी यामागे तुमच्या शरीरातील मॅलानिनची निर्मिती कारणीभूत असू शकते. ज्यांच्या पावलांना खूप घाम येतो अशा लोकांची त्वचा दाह झाल्यामुळे काळंवडते. मात्र या सर्व समस्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे पायाची योग्य निगा राखणे. यासाठीच तुमच्या टाचा या पद्धतीने स्वच्छ करा.
टाचा स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय
पायाच्या टाचा तुम्ही घरच्या घरी नैसर्गिक घटकांनी स्वच्छ करू शकता.
हळद आणि दूध
साहित्य –
- दोन चमचे हळद
- गरजेनुसार दूध
दोन्ही घटक एकत्र करा आणि तयार पेस्ट तुमच्या टाचेवर लावा. वीस मिनीटांनी तुमचे पाय कोमट पाण्याने स्वच्छ करा. हळदीमध्ये तुमची त्वचा उजळ करणारे घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि दूधामुळे तुमच्या टाचा मऊ होतात.
बेकिंग सोडा
साहित्य –
- एक चमचा बेकिंग सोडा
- एक चमचा गुलाब पाणी
एका भांड्यात गुलाबपाणी आणि बेकिंग सोडा मिसळा. हे मिश्रण तुमच्या पायाच्या टाचांवर एखाद्या स्क्रबप्रमाणे चोळा. दहा मिनीटांनी तुमचे पाय कोमट पाण्याने धुवा. टॉवेल अथवा जाड कापडाच्या मदतीने पाय घासून स्वच्छ करा. ज्यामुळे पायावरची डेड स्किन, धुळ, माती निघून जाईल. बेकिंग सोड्यामध्ये ब्लिचिंग करणारे घटक असतात. शिवाय सोडा अॅंटि बॅक्टेरिअल असल्यामुळे तुमच्या पायाला इनफेक्शनचा धोका कमी होतो.
लिंबू आणि साखर
साहित्य –
- एक वापरलेली लिंबाची साल
- एक चमचा साखर
लिंबू वापरल्यावर साल फेकून न देता त्याचा वापर तुम्ही तुमचे पाय स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता. याासाठी वापरलेल्या लिंबाच्या सालीवर थोडी साखर घ्या आणि तुमच्या टाचांवर रगडून त्या स्वच्छ करा. पाच ते दहा मिनीटांनी तुमचे पाय स्वच्छ करा. लिंबाच्या सालीमुळे तुमच्या टाचेवरील काळेपणा दूर होतो आणि साखर एक नैसर्गिक स्क्रबर असल्यामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते.
कोरफड आणि ग्लिसरिन
साहित्य –
- एक चमचा कोरफडाचा गर
- एक चमचा ग्लिसरिन
- एक व्हिटॅमिन ई कॅप्सुल
एका भांड्यामध्ये तीनही पदार्थ एकत्र करा. मिश्रण एकजीव करून तुमच्या पायाच्या टाचेवर लावा. दहा मिनीटांनी कोमट पाण्याने पाय स्वच्छ करा.
बटाटा
साहित्य –
- एक बटाटा
बटाटा घ्या आणि तो सोलून त्याचे तुकडे तुमच्या टाचेवर रगडा. बटाट्याचा रस टाचेवर काही मिनीटे राहू द्या. दहा मिनीटांनी टाचा स्वच्छ करा आणि कोमट पाण्याने पाय धुवा. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी अससते ज्यामुळे तुमच्या त्वचेचा टोन उजळ होतो. शिवाय त्यामधील ब्लीचिंग घटकांमुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते.
घरगुती उपाय करून तुमचे केस करा डिटॉक्स, जाणून घ्या पद्धत