Advertisement

DIY सौंदर्य

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jan 11, 2020
तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

Advertisement

तांदूळ पीठ आपण नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरत असतो. पण तांदळाच्या पिठाचा उपयोग आपलं सौंदर्य अधिक निखारण्यासाठी होतो हे तुम्हाला माहीत आहे का? तांदूळ पीठ पदार्थामध्ये चुरचुरीतपणा वाढवतं. तर सौंदर्यात उजळपणा अधिक आणण्यासाठी मदत करतं. तुम्हाला हे माहीत नसेल तर या लेखातून आम्ही तुम्हाला सौंंदर्यासाठी तांदूळ पीठाचा कसा वापर करायचा आणि तांदूळ पिठाने तुमचं सौंदर्य कसं अधिक उजळेल याबद्दल सांगणार आहोत. खरं तर प्रत्येक घरामध्ये तांदूळ हा हमखास असतोच. याच तांंदूळाच्या पिठापासून अनेक फेसपॅक बनवून आपण आपल्या सौंदर्यासाठी याचा वापर करू शकतो. या फेसपॅकमुळे हमखास तुमच्या रंगामध्ये उजळपणा येतो. तुम्हाला स्वतःला याचा वापर केल्यानंतर अनुभव येईल. सतत बाहेर असल्याने तुमची त्वचा टॅन होत असेल तर तुम्ही नक्कीच आम्ही दिलेले हे तांदळाचे फेसपॅक ट्राय करायला हवेत. जाणून घेऊया कसे तयार करायचे आणि कसे वापरायचे हे तांदळाच्या पिठाचे फेसपॅक – 

1. तांदूळ पीठ आणि गुलाबपाणी

तांदूळ पीठ आणि गुलाबपाणी

एका भांड्यात 2 टीस्पून तांदूळ पीठ घ्या आणि त्यामध्ये 4 चमचे गुलाबपाणी मिक्स  करा. आता यामध्ये 1 टीस्पून वितळवलेले तूप मिक्स करा. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता तयार झालेला हा फेसपॅक तुम्ही डाऊनस्ट्रोक करून तुमच्या चेहऱ्यावर नीट लावून घ्या. साधारण १५ मिनिट्स हा पॅक तसाच चेहऱ्यावर राहू द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. या फेसपॅकमुळे तुमच्या चेहऱ्यावर जर कोरडेपणा येत असल्याची तुम्हाला समस्या असेल तर ती निघून जाते आणि तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक उजळपणा वाढण्यास मदत मिळते. 

2. टॉमेटो, दुधी आणि तांदूळ पीठ

तांदूळ पीठ आणि टॉमटो

एक टॉमेटो आणि दुधीची भाजी घ्या आणि दोन्ही मिक्सरमध्ये एकत्र करून त्याचा रस काढून घ्या. या रसामध्ये तुम्ही 1 चमचा तांदूळ पीठ मिक्स करा. ही पेस्ट थोडी जाडसर बनवा. त्यानंतर चेहऱ्याला लावा आणि 15-20 मिनिट्स राहू द्या आणि मग चेहरा पाण्याने  स्वच्छ करून घ्या. यामुळे तुमचा चेहरा अधिक उजळेल. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही तांदळाचं पाणी टोनर म्हणूनही वापरू शकता. यामुळेदेखील तुमचा चेहरा अधिक चमकदार होण्यास आणि उजळण्यास फायदा मिळू शकतो. 

चमकदार त्वचा हवी असल्यास करा घरगुती फेसपॅकचा (Homemade Facepack) वापर

3. तांदूळ पीठ आणि बदाम तेल

तांदूळ पीठ आणि बदामाचे तेल

तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग आणि डार्क सर्कल्स वाढण्याची समस्या तुम्हाला सतावत असेल तर तुम्हाला हा फेसपॅक अगदी योग्य आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी 2 चमचे तांदूळ पिठामध्ये तुम्ही 1 चमचा गुलाबपाणी मिक्स करा, त्यात 1 चमचा बदाम तेल मिक्स करा. हे नीट मिक्स झाल्यावर चेहऱ्यावर लावा आणि साधारण अर्धा तास ठेवून धुवा. आठवड्यातून किमान तीन वेळा याचा वापर करा आणि नेहमी आपला चेहरा यामुळे ताजातवाना तुम्ही ठेऊ शकता. एका आठवड्यातच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल. 

तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये बनवायची असेल चमकदार तर करा वापरा ‘हे’ फेसपॅक

4. तांदूळ पीठ आणि चंदन पावडर

तांदूळ पीठ आणि चंदन पावडर

एका भांड्यात 1 चमचा तांदूळ पीठ,  1 चमचा चंदन पावडर आणि 1 चमचा दही मिक्स करून घ्या. हे फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि साधारण पंधरा मिनिट्सने चेहरा धुवा. हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावरील अशुद्धता दूर करतो आणि चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सची समस्यादेखील दूर करण्यसाठी फायदेशीर ठरतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अतिशय नैसर्गिक असून यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल्स नसल्यामुळे चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावरील उजळपणा वाढण्यासाठी याची मदत मिळते. 

घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो

5. बटाटा आणि तांदूळ पीठ

बटाटा आणि तांदूळ पीठ

1 चमचा तांदळाच्या पिठामध्ये उकडून मॅश केलेला बटाटा मिक्स करा. त्यामध्ये आता 1 चमचा मध आणि 1 चमचा गुलाबपाणी मिक्स करा. हे मिश्रण नीट मिक्स करून चेहऱ्यावर वरून खाली अशा पद्धतीने लावा. त्यानंतर चेहऱ्यावर व्यवस्थित स्क्रब करा आणि साधारण 10 मिनिट्सने तुम्ही चेहरा साफ करून घ्या. बटाटा हा नैसर्गिकरित्या ब्लीच म्हणून काम करतो तर त्यातील मध हे सेल्स रिपेअर करण्याचं काम करतात. तांदळामुळे चेहऱ्यावर अधिक उजळपणा येतो. 

तुमचं नववर्ष 2020 सुरू करा नव्या कोऱ्या कुल प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्ट्ससह. जे 100% अप्रतिम आणि मजेशीर आहेत. इतकंच नाही यावर आहे 20% सवलत. त्यामुळे लगेचच क्लिक करा POPxo.com/shop वर