मेष : व्यावसायिक करार रद्द होतील
कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करार रद्द होऊ शकतात. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. कुटुंबीयांकडून भावनात्मक सहकार्य मिळेल. उधारी दिलेले पैसे मिळू शकतात.
कुंभ : कार्यालयात अडचणी वाढतील
कामाच्या ठिकाणी नवीन पद्धत स्वीकारल्यानं अडचणी वाढण्याची शक्यता. क्षमतेहून अधिक जबाबदारी वाढू शकते. निरर्थक गुंतागुंत वाढेल. मित्रांचं सहकार्य मिळेल. रचनात्मक कार्यात आवड निर्माण होईल.
मीन : धनलाभाचा योग
अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. सामाजिक सन्मान आणि धनसंपदेत वाढ होईल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. प्रियकर/प्रेयसीसोबत प्रेमपूर्ण संबंध राहतील. वाहन चालवताना सतर्कता बाळगा.
वृषभ : प्रकृती ठीक नसल्यानं त्रस्त
जोडीदारीची प्रकृती ठीक नसल्यानं तुमचं मन अस्वस्थ असेल. व्यवसायात चढ-उतार कायम असतील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. आपल्या संवाद कौशल्यानं तुम्ही लोकांना प्रभावित कराल. धार्मिक कार्यांमध्ये मन रमेल.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
मिथुन : विवाहातील अडचणी दूर होण्याची शक्यता
भावनाप्रधान असलेल्या व्यक्तीसोबत संबंध जुळतील. विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात नफा होईल.
कर्क : व्यवसायाची संधी
पार्ट टाइम व्यवसाय करण्याची संधी मिळेल. राजकीय क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कार्यालयाच्या ठिकाणी कामाप्रति उत्साह असेल. आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. नात्यांमधील कटुता दूर होईल.
सिंह : महागडी वस्तू चोरी होण्याची शक्यता
आज नात्यांमध्ये घेवाण-देवणा करू नका, संबंध खराब होण्याचा धोका आहे. महागडी वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसायात किंवा नोकरीत अधिकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. वादांपासून दूर राहा.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
कन्या : आरोग्यात होईल सुधारणा
जीवनशैलीत बदल करणा, प्रकृतीत सुधारणा होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. रखडलेली काम पूर्ण होतील. सामाजित संबंधांमध्ये समतोल व्यवहारांमुळे सन्मान वाढेल. व्यावसायिक भागीदारीमुळे लाभ होतील.
तूळ : वाद वाढण्याची शक्यता
मालमत्तेसंबंधी वाद वाढण्याची शक्यता आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. यश मिळाल्याच्या आनंदात जवळच्या माणसांचा अनादर कराल. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकारणात अधिक आवड निर्माण होऊ शकते.
वृश्चिक : दातदुखीमुळे होईल त्रास
दातदुखीमुळे तुम्ही त्रस्त असू शकता. भविष्य संबंधी चिंतामुळे मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. आर्थिक प्रकरणांमध्ये जोखीम स्वीकारू नका. दुसऱ्यांचं सहकार्य मिळवण्यात यश मिळेल.
धनु : सन्मानात वाढ होईल
आज भेटवस्तू किंवा सन्मानात वाढ होईल. व्यावसायिक योजना सफल होतील. नोकरीमध्ये पदोन्नती मिळेल. कुटुंबीयांसोबत यात्रा होण्याची शक्यता. जुन्या मित्रांसोबत भेट घडेल. जोडीदारासोबत संबंध चांगले असतील.
मकर : वडिलांचं सहकार्य मिळेल
कुटुंबीयांसोबत मनातील गोष्टी स्पष्टपणे सांगा. आपापसातील तणाव दूर होती. कठीण परिस्थितीत वडिलांचं सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल.