मेष : नवीन कराराचा योग
व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल. बिघडलेली कामे होतील. जोडीदारासह परदेश यात्रा होण्याचा योग आहे.
कुंभ : आईची प्रकृती खराब होण्याची शक्यता
आईची प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे. मनात नैराश्य असेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. व्यवहाराच्या प्रकरणात सावधगिरी बाळगा.
मीन : अडचणी दूर होतील
वैवाहिक संबंधात येणाऱ्या अडचणी दूर होतील. विद्यार्थ्यांना आपल्या वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यवहाराचे प्रकरण मार्गी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आईवडिलांची विशेष काळजी घ्या.
वृषभ : कामात अडचणी येतील
व्यवसायातील अनेक कामे होता-होता रखडतील. पैसे गुंतवल्यानंतर कोणताही फायदा होणार नाही. पण कर्ज घेणे टाळा. धार्मिक कार्यात रस असेल. जोडीदारासोबत संबंध अधिक घट्ट होतील.
मिथुन : मानसिक तणावातून मुक्ती मिळेल
मानसिक तणावातून मुक्ती मिळेल. आरोग्य ठीक राहील. पूर्वनिर्धारित योजना यशस्वी होतील. राजकीय प्रतिष्ठा वाढेल. आपल्या मुलाकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
कर्क : नावडत्या व्यक्तींची भेट होऊ शकते
कुटुंबातील एखाद्याप्रती विनाकारण राग वाढू शकतो. नावडत्या लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यात्रेदरम्यान सतर्क राहा. रखडलेली कामे पूर्ण होतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
सिंह : तब्येत खराब होऊ शकते
जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. निरर्थक खर्च वाढण्याची चिन्हे आहेत. कायदेशीर प्रकरणात दिलासा मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. सध्या प्रवास करणे टाळा.
कन्या : महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता
नवीन कामात भांडवली गुंतवणूकीचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. सासरच्यांकडून महागड्या भेटवस्तू मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात सुखीशांती कायम राहील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
तूळ : कटुता दूर होईल
भाऊ-बहिणीतील कटुता दूर होईल. कुटुंबात मंगल कार्याची योजना आखली जाईल. जोडीदारासोबत प्रेमसंबंध कायम राहतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. व्यावसायिक भागीदारीतून नफा मिळेल.
वृश्चिक : शिक्षणात मन लागणार नाही
विद्यार्थ्यांचं शिक्षणात मन लागणार नाही. कामाच्या ठिकाणी तणाव असेल. मानसिक तणावातून स्वतःचा बचाव करावा. प्रॉपर्टी संबंधीचे वाद मार्गी लागतील. धार्मिक कामांमध्ये मन लागेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
धनु : उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील
उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. कुटुंबात सुखसमृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होईल. परस्पर संबंधात प्रेम आणि संयम वाढेल.रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. प्रियकराला भेटून आनंद होईल.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
मकर : विद्यार्थ्यांनी आळस करू नये
आज एखाद्या विशिष्ट कारणास्तव तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवेल. आळशीपणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागणार नाही. संयम बाळगा. जोडीदाराकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल. सन्मान आणि भेट.