मेष – विद्यार्थ्यांनी अभ्यासाची टाळाटाळ करू नये
विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा कंटाळा करू नका. चांगली संधी हातातून जाण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचे सहकाऱ्यांसोबत मतभेद होतील. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. बिघडलेले प्रेमसंबंध सुधारतील. अचानक एखादी आनंदवार्ता मिळाल्याने मन प्रसन्न होण्याची शक्यता आहे.
कुंभ – नवीन काम सुरू कराल
आज नवीन काम सुरू कराल. विरोधक सक्रिय होतील. एक छोटीसी चुक तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. सांभाळून रहा खर्च वाढण्याची शक्यता आहे. वादापासून दूर रहा. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन- कोर्ट कचेरीतून सुटका मिळेल
प्रॉपर्टी संबधीत विवाद तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. रखडलेले धन मिळण्याची शक्यता आहे. मुलांकडून तुम्हाला एखादी आनंदवार्ता मिळेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळेल. सामाजिक सन्मान वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात एखादे नवे प्रोजेक्ट मिळू शकते.
वृषभ – जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता
आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. घरातील एखादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. रोजच्या दिनचर्येत बदल करू नका. रचनात्मक कार्यात प्रसिद्धी मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात मित्रांची भेट होईल.
मिथुन – जोडीदाराकडून सरप्राईझ मिळेल
आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून एखादी अमुल्य भेट मिळेल. भावनिक गोष्टींमध्ये सुधारणा करा. कामाच्या ठिकाणी वाद करू नका. व्यावसायिक भागिदारी फायदेशीर ठरेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. परदेशी जाण्याची शक्यता आहे.
कर्क – व्यवसायात नवीन जबाबदारी वाढेल
विद्यार्थ्यांनी अभ्यास वेळेवर करण्याची सवय लावा. यश मिळेल. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचे कौतुक होईल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. घरासाठी उपयोगी वस्तूंची खरेदी कराल. कायदेशीर बाबींमधून सुटका मिळेल.
सिंह – वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे
आज तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करा शिवाय कोणाला पैसे उधार देऊ नका. वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे. आई, वडील, धर्मगुरू यांचे सहकार्य मिळेल. घरातील जबाबदाऱ्या पूर्ण कराल. जोडीदारासोबत नाते मजबूत होईल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे.
कन्या – गुडघेदुखी जाणवेल
आज तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. दिनक्रम बदलू नका. नवीन लोकांसोबत भेट होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील अडथळे दूर होतील. काम लवकर पूर्ण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. जोखिम घेणे टाळा.
तूळ – जोडीदाराची काळजी घ्या
जोडीदारासाठी वेळ न दिल्यामुळे नात्यात कटूपणा येण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एखादे ध्येय साध्य करण्यात यश मिळेल. विरोधकांपासून सावध रहा. चांगली बातमी मिळेल.
वृश्चिक – हवामानातील बदलांचा परिणाम होईल
आज वातावरणात झालेल्या बदलांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुम्हाला मदत करून तुमचे काम चांगले करतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले धन मिळण्याची शक्यता आहे. मित्रांची भेट सुखकर असेल.
धनु – सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू मिळेल
सासरच्या मंडळींकडून तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळेल. धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जोडीदारासोबत मौजमस्ती कराल. रचनात्मक कार्यांत प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासाचा योग आहे.
मकर- नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील
आज तुमच्यासाठी दिवस अगदी आनंदाचा असेल. जोडीदासोबत वेळ सुखाचा असेल. जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन प्रॉपर्टी खरेदी कराल. व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या विवेक बुद्धीने रखडलेली कामे पूर्ण होतील.
अधिक वाचा
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव