राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

पहिल्याच भेटीत तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल सगळं कळतंच असं नाही. इतकंच नाही तर काही व्यक्तींना कितीतरी वर्ष एकत्र राहूनही आपल्या जोडीदाराची आवड आणि नावड माहीत नसते. बऱ्याचदा काही व्यक्ती अशा असतात ज्या इतर लोकांबरोबर वेगळ्या वागतात आणि त्यांचा खरा स्वभाव वेगळा असतो. पण एका चांगल्या नात्यासाठी जोडीदाराचा स्वभाव जाणून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा राशीनुसार वेगळा असतो. तुमच्या जोडीदाराचा स्वभाव नक्की कसा आहे हे राशीनुसार हे जाणून घेऊया -


मेष (21 मार्च - 20 एप्रिल)


1 %282%29


या राशीचे जोडीदार स्वतंत्र विचारांचे असतात. प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती अतिशय उत्साही असतात. तसंच या व्यक्ती आपल्या जोडीदारावर वरचढ होण्याचाही प्रयत्न करतात. या व्यक्तींना आपल्या स्वातंत्रात कोणत्याही दुसऱ्या व्यक्तींनी दखल घेतलेली आवडत नाही. मग ती व्यक्ती त्यांच्या कितीही जवळची असली तरीही ही गोष्ट या व्यक्ती खपवून घेत नाहीत.


वृषभ (21 एप्रिल - 21 मे)


2 %281%29


या राशीच्या जोडीदारांसाठी कोणत्याही व्यक्तीचं बाह्यसौंदर्य जास्त गरजेचं असतं. तर आपल्या जोडीदारासाठी या व्यक्ती काहीही करू शकतात. या व्यक्ती जोडीदाराच्या प्रेमाच्या बाबतीत अतिशय भरोशाच्या आणि चांगल्या असतात. ज्या व्यक्तीवर या व्यक्ती प्रेम करतात त्यांच्याकडून यांना संपूर्ण अधिकार हवा असतो. या व्यक्तींकडून प्रेमाने काहीही करून घेणं सोपं आहे. पण यांच्या इच्छेशिवाय यांच्याकडून कोणतंही काम करून घेणं अशक्य आहे.


मिथुन (22 मे - 21 जून)


3


या राशीचे जोडीदार अतिशय बुद्धिमान आणि क्रिएटिव्ह असतात. आपल्या गोड गोड गोष्टींनी कोणत्याही व्यक्तींचं मन जिंकणं तर यांच्याकडून शिकावं. कोणत्याही प्रकारच्या बंधनात राहणं या व्यक्तींना अजिबात आवडत नाही. मग अगदी ते नवरा - बायकोचं बंधन असलं तरी. अगदी या नात्यातही त्यांना स्पेस लागते. या व्यक्तींना बदल खूपच आवडतात. प्रत्येक गोष्ट चांगली करण्याकडे यांचा कल असतो. एकटं राहणं या व्यक्तींना आवडत नाही. नेहमी नव्या लोकांना भेटणं आणि नवे मित्रमैत्रिणी बनवणं या व्यक्तींना आवडतं.


कर्क (22 जून - 22 जुलै)


4


या राशीचे जोडीदार कल्पनाशील असतात. तसंच स्वप्नातील राजकुमार अथवा राजकुमारी सत्यात असल्याप्रमाणेच या व्यक्ती वागतात. प्रेमाच्या बाबतीत सहसा या व्यक्ती नशीबवान असतात. या व्यक्तींना नेहमीच इतर लोकांकडून लक्ष वेधून घ्यायचं असतं. अन्यथा थोड्या थोड्या वेळाने रागावून बसणाऱ्यांपैकी एक आहेत. आपल्या जोडीदारासाठी आणि कुटुंबासाठी या व्यक्ती काहीही करू शकतात. प्रचंड भावूक आणि संवेदनशील असल्यामुळे या व्यक्ती खूपच दयाळू असतात आणि त्यामुळे कायम जमिनीवर पाय टेकवून राहण्याचं भान या व्यक्तींमध्ये असतं.


सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)


5
या राशीचे जोडीदारांना केवळ आपला जोडीदार खूप सुंदर लागतो. बाकी आपल्या जोडीदारामध्ये इतर गुण शोधण्याची तसदीदेखील हे घेत नाहीत. यांना आपल्या चुका लपवण्याची खूपच सवय असते. तसंच दुसऱ्यांकडून स्वतःची प्रशंसा ऐकणंही या व्यक्तींना खूप आवडतं. कधीतरी आपल्या जोडीदाराबरोबर या व्यक्ती हुकूमशहा असल्याप्रमाणे वागतात. पण प्रेमाशी प्रामाणिक असतात. आपल्या आत्मविश्वसावर समाजात आपली एक ओळख निर्माण करतात. कोणाहीसमोर वाकणं या व्यक्तींना आवडत नाही.


कन्या (23 ऑगस्ट - 23 सप्टेंबर)


6 %281%29


या राशीच्या व्यक्तींचे जोडीदार जेव्हा व्यवस्थित संतुष्ट असतात तेव्हाच एखाद्या निर्णयापर्यंत पोहचतात. या व्यक्तींना आपल्या जोडीदारांकडून बऱ्याच अपेक्षा असतात. यामुळेच या व्यक्तींना जोडीदार मिळायला थोडा वेळ लागतो आणि या राशीच्या व्यक्तींचं लग्नही उशीरा होतं. या व्यक्ती ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांची खूपच काळजी घेतात आणि कायम मनात जागा करण्याचा प्रयत्न करत राहतात. या राशीच्या व्यक्ती आपल्या फिटनेसची खूप काळजी घेतात.


तूळ (24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर)


7 %282%29


या राशीचे जोडीदार आपल्या जोडीदाराची खूपच काळजी घेतात आणि त्यांना समाधानी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. या व्यक्ती मुद्दाम कोणाचंही मन दुखवत नाहीत. यांना सेक्सी जोडीदार जास्त आवडतो. या व्यक्तींना उंच व्यक्ती आणि व्यवस्थित राहणाऱ्या व्यक्तीच जोडीदार म्हणून आवडतात. पण या व्यक्ती दुसऱ्यांच्या सांगण्यामध्ये लगेच गुंततात आणि कोणाहीवर पटकन विश्वास ठेवतात.


वृश्चिक (24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर)


8 %281%29


या राशीचे जोडीदार आपलं प्रेम मिळवण्यासाठी काहीही करू शकतात. प्रत्येक कामात शंभर टक्के योगदान देण्याचा यांचा प्रयत्न असतो आणि त्याचबरोबर आपल्या जोडीदारानेही त्याचप्रमाणे वागावं अशी यांची इच्छा असते. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी या व्यक्ती अत्यंत हुशारीने वागतात. या व्यक्तींचे यांच्या रागावर अजिबातच नियंत्रण नाही. पण असं असलं तरीही पटकन बोलून टाकणाऱ्या या व्यक्ती असून मनाने एकदम साफ आहेत. या व्यक्तींची खेळामध्ये सर्वात जास्त आवड असते.


धनु (23 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)


9 %282%29


या राशीच्या व्यक्ती आपला जोडीदार बदलत राहतात. यांना कुठलीच मर्यादा नसते. या राशीच्या व्यक्तींना मॅच्युअर व्यक्ती जास्त आवडतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आपल्या वयापेक्षा जास्त मोठे असलेले जोडीदार आवडतात. या व्यक्ती अतिशय धमाल मजा मस्ती करणाऱ्या असतात. तसंच स्वतंत्र विचाराच्या या व्यक्ती असून प्रवास करायला यांना जास्त आवडतं. एकाच ठिकाणी राहणं या व्यक्तींना आवडत नाही.


मकर (22 डिसेंबर - 20 जानेवारी)


10 %283%29


या राशीच्या जोडीदारासाठी प्रेम ही फक्त एक गरज असते. या व्यक्ती थोड्या विचित्र स्वभावाच्या असतात. आपल्यापेक्षा कमी वयाच्या जोडीदारांमध्ये यांना जास्त रस असतो. कोणत्या तरी चुकीच्या माणसाची संगत लागू नये याच विचारात या व्यक्ती असतात. आपला योग्य जोडीदार निवडण्यासाठी या व्यक्तींना खूप वेळ लागतो. या राशीच्या व्यक्तींचं मन जिंकून घेणं खूपच कठीण आहे. पण या व्यक्ती अतिशय समजूतदार आणि प्रामाणिक असतात.


कुंभ (21 जानेवारी - 19 फेब्रुवारी)


11 %283%29
या राशीचे जोडीदार प्रेमाच्या बाबतीत थोडे लाजरे असतात. प्रेमाच्या बदल्यात प्रेम आणि शत्रुत्वाच्या बदल्यात शत्रुत्व असा यांचा स्वभाव आहे. थोडे संकोची स्वभावाचे असल्यामुळे आपल्या प्रेमाची कबुली पटकन या व्यक्तींना देता येत नाही. लोकांनी आपला सन्मान करावा असं या व्यक्तींना नेहमी वाटतं.  या व्यक्ती दयाळू स्वभावाच्या असून दुसऱ्यांची मदत करण्यासाठी या व्यक्ती पुढे असतात.


मीन (20 फेब्रुवारी - 20 मार्च)


12 %282%29


या राशीचे जोडीदार जरा जास्तच भावूक आणि वेळोवेळी बदलत राहणारे असतात. या व्यक्तींना महागड्या गोष्टी खूपच आवडतात. परिस्थिती कशीही असो या व्यक्ती खर्चावर नियंत्रण ठेवत नाहीत. कलेमध्ये आवड असल्यामुळे या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात. यांची नेहमी व्यक्ती ओळखण्यात चूक होते. प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती धोका देऊ शकतात पण प्रत्येक वेळी नाही.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा - 


तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो तुमचा आवडता 'रंग'


डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव


राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली