मेष – कामाच्या ठिकाणी वाद वाढण्याची शक्यता
आज तुमच्या वागण्यामुळे कुटुंबातील माणसे दुःखी होणार आहेत. कामाच्या ठिकाणी वाद वाढण्याची शक्यता आहे. तुमचे मत सांगण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहा. मित्रांना दिलेले वचन पूर्ण करणे कठीण जाईल. रखडलेले पैसे परत मिळणार आहेत.
कुंभ – आर्थिक संकट येण्याची शक्यता
आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. पैशांची गूंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्या. व्यावसायिक योजनांसाठी साठवलेली पुंजी खर्च करावी लागेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.
मीन – योजना आखण्यासाठी मन उत्साही राहील
नवीन कामासाठी योजना आखण्यासाठी उत्साही असाल. नियमित व्यायाम करून फिट राहा. रचनात्मक कार्यामुळे प्रसिद्ध व्हाल. उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
वृषभ – कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता
आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची साथ मिळेल. उत्पन्नांचे साधन वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये. मित्रांची भेट सुखकारक असेल.
मिथुन – आरोग्याची काळजी घ्या
आधुनिक सुखसाधनांमध्ये वाढ होईल. चल-अचल संपत्ती खरेदी करण्याची योजना आखाल. व्यावसायिक कामे वाढणार आहेत. चांगल्याय योजनांमधून यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. जोडीदारासोबत चांगले नाते तयार होईल.
कर्क – जुने नातेसंबंध मजबूत होतील
अचानक एखाद्या सुख समाचार मिळेल. मुलांची कर्तव्य पार पाडाल. पारंपरिक आणि धार्मिक कार्यातील रस वाढणार आहे. अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण होतील.
सिंह – नवीन कामाचा शोध करण्याची शक्यता
आज तुम्हाला एखादे नवे काम शोधावे असे वाटेल. जोडीदारासोबत समस्या वाढण्याची शक्यता. एखादे महत्त्वाचे काम करण्यात अडचणी येतील. रागात केलेल्या कामातील समस्या वाढणार आहेत. देणी-घेणी करताना सावध रहा.
कन्या – अचानक धनलाभ होण्याचा योग आहे
आज तुम्हाला अचानक धनलाभाचा योग आहे. एखाद्या नवीन व्यवसायाबद्दल आकर्षण वाढणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. मित्रांच्यासोबत पिकनिकला जाल.
तूळ – महत्त्वपूर्ण लाभापासून दूर राहवे लागेल
आज आळस केल्यामुळे तुम्हाला एखाद्या महत्त्वपूर्ण लाभापासून दूर राहवे लागेल. राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न आणि खर्चाच संतुलन राखावे लागेल. घाईघाईत केलेल्या कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावध रहा.
वृश्चिक – लहान-सहान समस्या येतील
आज तुमच्या जीवनात अनेक लहान मोठ्या समस्या येणार आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण जाणार आहे. घरातील लोकांशी बोलताना सावध रहा. आर्थिक समस्या येण्याची शक्यता आहे.
धनु – प्रेमाची जाणिव होईल
एकटेपण दूर होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीसोबत प्रेमाची जाणिव होणार आहे. आईच्या मदतीमुळे कुटुंबातील तुमचे स्थान मजबूत होणार आहे. कुटुंबात मंगल कार्य घडणार आहे. व्यवसायासाठी परदेशी जाण्याचा योग आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे.
मकर – व्यवसायाबाबत एखादी चांगली बातमी मिळेल
आज तुम्हाला व्यवसायाबाबत एखादी चांगली बातमी मिळेल. नियोजित कार्य पूर्ण होणार आहे. राजकारणातील सक्रियता वाढणार आहे. तुमच्या कामाच्या कौशल्यामुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना खेळात यश मिळेल. देणी घेणी सांभाळून करा.
अधिक वाचा –
जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’
आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का
राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली