मेष : कामे रखडू शकतात
देखरेखी अभावी काम रखडण्याची शक्यता आहे. घाई गेल्यास कामामध्ये नुकसान होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्यांमुळे उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होतील.
कुंभ : पैशांसंदर्भात खूशखबर
पैशांसंदर्भात आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कर्जाची फेड करण्यास यश मिळेल. व्यावसायिक यात्रा लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात यश मिळेल. जोडीदारासोबत सामाजिक समारंभात जाण्याची शक्यता आहे.
मीन : नात्यात गोडवा येईल
खासगी नातेसंबंधांना वेळ द्या, नात्यात गोडवा येईल. भागीदारी असलेल्या व्यवसायात फायदा होईल. आर्थिक प्रकरणांमध्ये सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांना आपल्या वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. आईवडिलांचं प्रेम आणि सहकार्य लाभेल.
वृषभ : वाहन खरेदीची योजना
नवीन वाहन खरेदीची योजना आखली जाऊ शकते. व्यवसायात लाभदायक करार मिळेल. परस्परासंबंधामध्ये सुरू असलेली कटुता दूर होईल. राजकारणात आवड वाढेल. रखलेली कामे पूर्ण होतील.
मिथुन : कामाचा ताण राहील
वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याचा ताण राहील. संभाषण करताना सावधगिरी बाळगा. नवीन कामात संशय कायम राहील. घरातील प्रकरणांमध्येही दबाव राहील. कामाच्या ठिकाणी आव्हान मिळू शकतील. आर्थिक समस्यांतून मुक्ती मिळेल.
(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)
कर्क : मन उदास राहील
आज संपूर्ण दिवस मन उदास राहील. एकटेपणाची भावना येईल. कर्जासाठी अर्ज करू शकता. आज काहीतरी नवीन अनुभवण्यास मिळेल. व्यावसायिक यात्रा होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत घडलेली भेट सुखद राहील.
सिंह : विश्वास दृढ होईल
अपत्याप्रति विश्वास दृढ होईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडण्याची शक्यता आहे. कार्यालयात प्रशंसा होईल. संपर्कांचा लाभ मिळेल. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या : नोकरीमध्ये पदोन्नती
विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. रखडलेले कार्य संपन्न होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. सुखसोयींमध्ये वाढ होईल. अध्यात्मात वाढ होऊ शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील.
तूळ : अचानक खर्च वाढेल
अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बजेटमध्ये गडबड होण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचं सहकार्य मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)
वृश्चिक : मन उत्साहित राहील
आज काहीतरी नवीन गोष्ट करण्यासाठी मन उत्साहित राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. जोडीदारासोबत संबंध सुमधुर राहतील.
धनु : वडिलांसोबत मतभेद वाढण्याची शक्यता
आज वडिलांसोबत मतभेद वाढण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. सामाजिक सन्मानावर परिणाम होईल, असे कोणतेही काम करू नका. पैशांसंदर्भात समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे.
(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)
मकर : डोळे जळजळण्याची तक्रार
डोळ्यांमध्ये जळजळ होण्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. अचानक धनलाभ होण्याचे संकेत आहेत. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. प्रेम संबंधात रोमान्स राहील. कायदेशीर प्रकरणांमध्ये दिलासा मिळेल.