ADVERTISEMENT
home / भविष्य
18 जून 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी दिवस प्रेमाचा

18 जून 2019 चं राशीफळ, मेष राशीसाठी दिवस प्रेमाचा

मेष – दिवस प्रेमाचा

आज तुमच्यासाठी दिवस प्रेमाचा असेल. मात्र प्रेमात त्रिकोण निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. विरोधक नमतील. सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक परिस्थितीत वाढ होईल. देणी-घेणी करताना सावध रहा.

कुंभ – मित्राच्या आजारपणामुळे निराश व्हाल

एखाद्या खास मित्राच्या आजारपणामुळे निराश व्हाल. निराश आणि दुःखी असला तरी धैर्य राखा. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्याबाबत सावध रहा.

मीन – व्यवसायात नफा होईल

व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. आर्थिक स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. मानसिक शांतता मिळेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत व्यावसायिक प्रवास कराल.

वृषभ – नवीन प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता

आज तुमचे व्यवसायातील एखादे नवे प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता आहे. नोकरीत समस्या येतील. सांभाळून रहा. विनाकारण अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबध मजबूत होतील. आरोग्याची काळजी घ्या. उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखा.

ADVERTISEMENT

मिथुन – अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे

आज तुमचे नशिब अचानक चमकण्याची शक्यता आहे. चांगल्या संधी ओळखा. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत पदोन्नती आणि व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. जोडीदारासोबत नातेसंबध दृढ होतील.

कर्क – विद्यार्थ्यांना तणाव जाणवेल

विद्यार्थ्यांना शिक्षणासंबधी तणाव जाणवू शकतो. जुन्या आठवणींनी मन निराश होण्याची शक्यता आहे. विनाकारण वाद घालू नका. नोकरीत समस्या येतील. व्यवसायात तोटा होण्याचा धोका आहे. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह – आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे

पोटाच्या समस्या त्रास देतील. मन निराश होण्याती शक्यता आहे.आत्मविश्वास कमी राहील. नोकरी करणाऱ्या महिलांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. घरात मंगल कार्य घडेल.

कन्या – कौटुंबिक वातावरण सुखाचे असेल

एखादे जुने नाते पुन्हा नव्याने जाणवू लागेल. कौटुंबिक वातावरण सुखाचे आणि आनंदाचे असेल. जुन्या मित्राच्या मदतीने बिघडलेली कामे पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. व्यवसायात भागिदारीमुळे फायदा होण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

तूळ – विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल

विद्यार्थ्यांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. मार्केटिंगच्या कामात यश मिळेल. व्यवसायातील नवीन योजना तुम्हाला उत्साहीत करतील. राजकारणात पुढे जाण्याची संधी मिळेल.सामाजिक सन्मान आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होईल.

वृश्चिक – खर्चात वाढ होण्याची शक्यता

आज तुमच्या शैक्षणिक कार्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्पन्न कमी आणि खर्च वाढू शकतो. आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य आणि सहवास मिळेल. असे कोणतेच काम करू नका ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल.

धनु – आजारपण नियंत्रित राहील

मधुमेह अथवा इतर आजार आज नियंत्रणात राहतील. दिनक्रम आणि आहार याकडे दुर्लक्ष करू नका. व्यावसायिक योजना यशस्वी होतील. आर्थिक संकट दूर होईल. प्रेमसंबध गोड होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण कराल.

मकर- जोडीदारासोबत सावधपणे वागा

जोडीदारासोबत सावधपणे व्यवहार करा. एखादी बाहेरची व्यक्ती तुमच्या नात्यात ढवळाढवळ करू शकते. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता  आहे. रचनात्मक कार्यात वाढ होईल.

ADVERTISEMENT

बारा राशींचे राशीभविष्य आणि अंकशास्त्राबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हे लेख देखील अवश्य वाचा –

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

ADVERTISEMENT
17 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT