ADVERTISEMENT
home / भविष्य
20 जानेवारी 2020चं राशीफळ, मेष राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल

20 जानेवारी 2020चं राशीफळ, मेष राशीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल

मेष : विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीत यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात कष्ट केल्यास संपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. वाढत्या खर्चांमुळे नवीन काम सुरू करू शकता. सामाजिक कामांमध्ये आवड वाढेल.

कुंभ : डोके दुखी होऊ शकते
खांदे किंवा डोके दुखी होऊ शकते. खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. पैशांसंबंधीच्या अडचणी दूर होतील. धार्मिक कामांमध्ये आवड वाढू शकते. आईचे सहकार्य मिळेल.

मीन : आपापसातील तणाव दूर होईल
वृद्धांच्या सहकार्यामुळे परस्परांमधील तणाव दूर होतील. कठीण समयी वडिलांचं सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळतील. आत्मविश्वासात वाढ होईल. राजकारणात आवड वाढू शकते.

वृषभ : महागडी वस्तू चोरी होऊ शकते
आज फसवणुकीचा बळी ठरू शकता किंवा महागडी वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी झाल्यानं लवकर निर्णय कठीण ठरू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. जुन्या मित्रांचं सहकार्य मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध सुमधुर राहतील.

ADVERTISEMENT

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

मिथुन : आरोग्यात सुधारणा होईल
दीर्घकाळापासून आजारी असलेल्या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होईल. घराचा शोध निश्चित बजेटमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक कामांमध्ये यश मिळेल. वादांपासून दूर राहा. सध्या प्रवास करणं टाळा.

कर्क : दुसऱ्यांच्या बोलण्यात अडकू नका
कौटुंबिक सदस्यांसोबत मतभेद वाढू शकतात. दुसरे दिशाभूल करतील, त्यात अडकू नका. व्यापारात नफा आणि नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. आरोग्य खराब होऊ शकते. मित्रांचं सहकार्य मिळेल.

सिंह : नवी संपत्ती खरेदी करण्याची योजना
नवीन संपत्ती खरेदी करण्याची योजना आखली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत खरेदीमध्ये व्यस्त राहाल. प्रतिस्पर्धी अपयशी होतील. वादांपासून दूर राहा.

ADVERTISEMENT

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : सर्दी -खोकला होऊ शकतो
सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. ताप येऊ शकतो. पार्टनरसोबतचे संबंध सुमधुर राहतील. कामाच्या ठिकाणी अडचणी कमी होतील. विद्यार्थ्यांना परीक्षेत आणि मुलाखतीत यश मिळू शकते. उत्पन्न आणि खर्चावर नियंत्रण ठेवा.

तूळ : अविवाहितांसाठी अनुकूल वेळ आहे
अविवाहितांससाठी अनुकूल वेळ आहे. जोडीदारासोबतचे नाते मजबूत होईल. सामाजिक सन्मान वाढेल. व्यावसायिक यात्रा फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली होईल.

वृश्चिक : वरिष्ठांसोबत तणाव वाढू शकतो
आज कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो. पैशांचा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कुटुंबाचं भावनिक सहकार्य मिळेल. एखाद्या संस्थेकडून सन्मान होण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडू शकते.

ADVERTISEMENT

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’)

धनु : नवे वाहन खरेदीची योजना
नवीन वाहन खरेदीची योजना आखली जाऊ शकते. जोडीदारासोबत परदेश यात्रा करण्याचा योग. सामाजिक प्रतिष्ठा आणि पैशांमध्ये वाढ होईल. पार्ट-टाईम व्यवसायाची संधी मिळू शकते. मित्रांसोबत झालेली भेट सुखद असेल.

मकर : आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
विद्यार्थ्यांना लक्ष्य प्राप्तिसाठी कष्ट घेण्याची आवश्यकता आहे. व्यवसायात घतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कौटुंबिक नात्यांमध्ये गोडवा येईल.

 

ADVERTISEMENT
14 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT